कविताही वेगळीच

या वेळचा पाऊस खूप वेगळा होता,
मुसळधार तरीही सुखावणारा, तृप्त करणारा
या वेळचा हिरवटलेला आसमंतही वेगळा होता,
अनेक रंगांमध्ये न्हालेला, टवटवीत
या वेळची माझी कविताही वेगळीच आहे,
तुझ्या-माझ्या मैत्रीचं मोल टिपणारी
सृष्टीतल्या अमूल्य खजिन्यासारखी!
-दीपा २२ ऑक्टोबर २०१६.

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *