तू येणार असलास की….

तू येणार असलास की….
करतोसच गाजावाजा
तुझं येणं मुळी गुपित राहतच नाही
तुझ्या येण्यानं
क्षणात सारा आसमंत
भिजरा भिजरा होऊन जातो
मलाही फुटते पालवी
अन हिरवे पंख
तुझं झिमझिमणं कधी हळुवार
तर कधी आवेगानं कोसळणं
मुसळधार
ती लय, तो नाद, ते संगीत
सारं वातावरणच सिंफनीमय
मी तुला टिपते, कधी झेलते
तर कधी चिंब होऊन
साठवते तनामनात
तुझ्या येण्यानं
कितिक गोष्टी अंकुरतात
बहरतात, फुलतात
सृजनाच्या ओढीनं
मला अलिंगन देतात
घट्ट
मीही बनते धरित्री
त्या तृप्तीचा –
तुझ्यामाझ्या नात्याचा
दरवळतो मग
मृदगंध सर्वत्र
-दीपा ३१ जुलै २०१६, दुपारी १ वाजून ३० मिनिटं

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *