प्रेम करावं…

सर्जनशीलता, कल्पकता, संवेदनशीलता,
उत्साह, चैतन्य, ताजेपणा,
अफाट सकारात्मक ऊर्जा
भरभरून लाभते
म्हणूनच –
पहाटे पहाटे झोंबणार्‍या गारव्यावर,
वैतागलेल्या चटकवणार्‍या माध्यान्हावर,
थकून परतणार्‍या सांजवेळेच्या दिनकरावर,
फेसबुकवरच्या येणार्‍या लाईक्सवर,
व्हॉट्सअपवर येणार्‍या अनगिनत मेसेजेसवर,
हातातल्या डायरीवर, हिरव्या शाईच्या पेनवर,
कधी भेटीदाखल मिळालेल्या पार्करवर,
कम्प्युटरच्या शिस्तशीर स्क्रिनवर
जगभरातल्या साहित्यावर, कलांवर
चित्रांवर, शिल्पांवर आणि
संगीताच्या सुरावटींवर
आपणच लिहिलेल्या मनोगतावर
प्राण्यांवर, पक्ष्यांवर, निसर्गावर,
आपल्याला आवडणार्‍या माणसांवर
आणि
न आवडणार्‍याही माणसांवरही
प्रेम करावं!!!
दीपा २३ ऑक्टोबर २०१६

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *