About me

  • वाणिज्य शाखेतली पदवी, संगीत विशारद, डिप्लोमा इन सोशल वर्क, आरईबीटी (रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी अँड कौन्सिलिंग स्किल्स) कोर्स.deepa
  • मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘चांदोबा’ या मासिकाचा ४ वर्षं मराठीतून अनुवाद.
  • अर्थपूर्ण, मिळून सार्‍याजणी यांसारख्या अनेक मासिकांमधून, दिवाळी अंकांमधून आणि विविध वर्तमानपत्रांतून सातत्यानं लेखऩ, तसंच शिक्षण, पर्यावरण़, अपंगत्व आणि महिला स्वयंसहायता गट अशा विविध विषयांवरच्या विशेषांकाचं संपादन.
  • किशोरवयीन मुलांसाठी ‘तुमचे-आमचे सुपरहिरो’ या मालिकेत अरविंद गुप्ता, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अनिल अवचट आणि अच्युत गोडबोले या पुस्तकाचं लेखन.
  • शिल्प-चित्र कलेवर आधारित ‘कॅनव्हास’ या पुस्तकाचं लेखन.
  • जीनियस मालिकेतल्या ७२ युगप्रवर्तक जीनियस व्यक्तींपैकी पहिल्या १२ वैज्ञानिकांवरची १२ पुस्तकं प्रसिध्द
  • मुलाखती, पुस्तक परीक्षण आणि मुखपृष्ठ निर्मिती.
  • सामाजिक क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातल्या मासवण भागात आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेत ‘शिक्षण विभाग प्रमुख’ म्हणून १५ आदिवासी गावांतल्या ७८ पाड्यांतल कामाचा अनुभव.
  • डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने युवांसाठी सुरू असलेल्या ‘निर्माण’ उपक्रमात समन्वयक म्हणून, तर ‘प्रथम’ या शिक्षणावर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेत कंटेट क्रिएटर आणि ट्रेनर म्हणून कामाचा अनुभव.