About Me

About Me

About me

मी दीपा ,

मला लिहायला आवडतं. मनातल्या भावना व्‍यक्‍त करण्यासाठी  मला हे माध्यम आवडतं. त्यामुळे लहानपणापासून मी लिहायला लागले, ते कधी स्वत:शी संवाद साधण्यासाठी तर कधी इतरांशी संवाद साधून मला उमगलेलं, समजलेलं, आवडलेलं सांगण्यासाठी. लिहिण्याबरोबरच वाचन करणंही मला खूप आवडतं. आपला सच्चा मार्गदर्शक, मित्र मला ही पुस्तकंच वाटतात. पुस्तकांबरोबर कधी प्रवास करायला आवडतो.

कधी निसर्ग, पशु-पक्षी, तर कधी प्रवासातली माणसं, तर कधी इतिहास सांगणाऱ्या वास्तू सगळ्यांना जाणून घ्यायला आवडतं. निसर्गातल्या संगीताबरोबरच माणसानं निर्माण केलेलं संगीत आवडतं. त्यात भारतीय संगीत असतं, तर कधी पाश्चिमात्य संगीतही असतं. विश्वाशी तादात्म्य पावता येतं ते केवळ संगीतामुळेच असं वाटतं. चित्रकला आवडते, शिल्पकला आवडते आणि कलेबरोबरच जगण्याला दिशा देणारा वैज्ञानिक दृष्टिकोनही भावतो. नव्‍हे तो अंगीकारून जगण्याचा प्रयत्न करते. चांगले चित्रपट बघायला आवडतात, नाटकं आवडतात आणि वेगळ्या वाटेनं जात सामाजिक भान जपणारी माणसंही आवडतात.

या सगळ्यांतूनच मला माझी एक वाट सापडलीय आणि त्या वाटेवरून चालताना मला जे दिसलं, जाणवलं, भावलं, आवडलं तेच इथे मी शेअर केलंय, करतेय. माझी ओळख माझ्या कामातून, लिखाणातून, कृतीतून, जगण्यातून व्हावी, असं मला वाटतं.

Deepa Deshmukh
Author and Activist

  • Degree in commerce, ‘Sangeet Visharad’ in music, Diploma in Social Work and completed a course in counselling. (Rational Emotive Behavioural Therapy).
  • Authored following books
    • ‘Canvas’, a book that revisits not only the lives of worlds famous painters and sculptors but also the history of different painting styles that shaped the modern art. 
    • ‘Symphony’, a book on western music its musicians.
    • ‘Genius’, a book series of 12 books based on worlds famous scientists, a bestseller according to the survey presented at Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan held at Pimpri-Chinchwad, Pune in 2015.
    • ‘Bhartiya Genius’, a book series based on scientists, mathematicians, architects and inventors consisting of parts 1, 2 and 3.
    • ‘Tantradnya Genius’, a book series based on 12 worlds famous inventors consisting of parts 1, 2 and 3.
    • ‘Tumche Amche Superhero’, a book series for adolescent readers. The series consists of 7 books based on the lives of eminent renowned personalities such as Padmashree Dr. Arvind Gupta, Dr. Anand Nadkarni, Dr. Prakash Amte, Dr. Anil Awchat, Achyut Godbole, Dr. Dnyaneshwar Mule and Dr. Ravi Bapat.
    • ‘Pathfinders’, a two-part book series based on the real life heroes who chose unconventional path for the betterment of the society.
    • ‘Narayan Dharap’, a book on the life and work of well-known author.
    • ‘Gujgoshti’, a fictional book consisting of many stories inspired by some real characters.
    • Translated the well-known children’s magazine ‘Chandoba’ in Marathi for four years.
  • Has contributed to various magazines like ‘Milun Saryajani’, ‘Arthapurna’, ‘Purush Uwach’ and has also published various columns in newspapers.
  • Worked as the coordinator of the Mahatma Gandhi Seva Sangh, Pune.
  • Served for ‘Adiwasi Sahaj Shikshan Pariwar’ as project chief in field of education at Maswan in Thane district in 15 villages and 78 tribal areas.
  • Actively participated in the Narmada Bachao Andolan with Medha Patkar.
  • Has been coordinator for ‘Nirman’, an organisation for youth and ‘Kumar Nirman’ for children. The organisations were founded by Dr. Abhay Bang and Dr. Rani Bang.
  • Also worked as content creator and trainer for ‘Pratham’, an organisation which works at national and international level in the stream of education.
  • Possesses a deep interest in music, drama, literature and painting.
  • Participated as a speaker at the 2018 Bal Kumar Sahitya Sammelan at Shevgaon. 
  • Inaugurated the Bal-Kumar Sahitya Sammelan held at Ambejogai in 2018.
  • Awarded with ‘Sadashiv Amrapurkar smruti Gaurav Puraskar’ by Think Global Foundation for her contribution to arts, science and society in 2016.
  • Awarded with ‘Dnyaneshwar Mule Friends Puraskar’ in 2017.
  • Awarded by Akhil Bharatiya Balkumar Sahitya Sanstha Pune For Contribution in Science for book ‘Tantradnya Genius’ in 14 November 2019.
  • Special Excellence Award for Literature by Rotary Club, Pashan Pune in 2020.
  • Special Excellence Award in Marathi Literature by Kshitij Foundation in 2021.
  • Actively participation in various ‘vyakhyanmala’, a series of expert speeches throughout Maharashtra on various topics such as art, literature, science and books.
  • Upcoming Books: Grantha, Architecture, Directors.

दीपा देशमुख
लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती

  • वाणिज्य शाखेतली पदवी, संगीत विशारद, सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशन (रॅशनल इमोटिव्ह बिहेविअरल थेरपी) विषयातला कोर्स.
  • ‘कॅनव्हास’ (चित्र-शिल्पकला यावर आधारित), ‘सिंफनी’ (पाश्चिमात्य संगीतावर आधारित) 550 ते 600 पानी  पुस्तकं प्रकाशित. 
  • ‘जीनियस’ (जगप्रसिद्ध वैज्ञानिकांवर 12 पुस्तिका), 2015 मध्ये पिंपरी चिंचवड इथे झालेल्या सर्व्हेक्षणानुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जीनियस ‘बेस्ट सेलर’. ‘भारतीय जीनियस’ (वैज्ञानिक, गणिती, वास्तुशिल्पी आणि तंत्रज्ञ – भाग 1, 2 आणि 3) ‘तंत्रज्ञ जीनियस’ (भाग 1, 2 आणि 3)
  • जीनियस मालिका ऑडीओ स्वरुपात बुक गंगा वेबसाईट वर लेखिकेच्या आवाजात उपलब्ध.
  • किशोरवयीन मुलांसाठी ‘तुमचे आमचे सुपरहिरो’ या मालिकेतली डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. आनंद नाडकणी, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि डॉ. रवी बापट यांचं आयुष्य आणि कार्य यावर आधारित 7 पुस्तकं प्रकाशित.
  • पाथफाइंडर्स (भाग 1 आणि भाग 2 ),
  • नारायण धारप: एका गूढ, अद्भुत चित्तथरारक जगाची सफर  
  • स्त्री प्रश्नांविषयी भाष्य कारण ‘गुजगोष्टी’ कथासंग्रह अॅमझॉन किंडल वर नुकताच प्रकाशित. 
  • मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘चांदोबा’ या मासिकाचा 4 वर्षं मराठीतून अनुवाद.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या कम्युनिटी रेडीओ वर लेखक आपल्या भेटीला आणि जीनियस मालिकेतल्या २४ जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांवर कार्यक्रम प्रसारित.
  • ‘मिळून सार्‍याजणी’, ‘अर्थपूर्ण’, ‘पुरूष उवाच’सारख्या अनेक मासिकांमधून, दिवाळी अंकांमधून आणि विविध वर्तमानपत्रांतून सातत्यानं लेखऩ. तसंच शिक्षण, पर्यावरण़, अपंगत्व आणि महिलांच्या प्रश्नांसंबंधी विविध विषयांवरच्या विशेषांकाचं संपादन.
  • मुलाखती, पुस्तक परीक्षण आणि मुखपृष्ठ तयार करणे. (मुसाफिर, मनात, नॅनोदय, थैमान चंगळवादाचे, गणिती, झपुर्झा भाग 1, 2 आणि 3 आणि कॅनव्हास या पुस्तकांची मुखपृष्ठ निर्मिती)
  • महात्मा गांधी सेवा संघ या अपंगत्वावर काम करणार्‍या संस्थेत समन्वयक म्हणून कार्यरत.
  • सामाजिक क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातल्या मासवण भागात आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेत शिक्षण विभाग प्रमुख म्हणून आदिवासींसाठी 15 गावात 78 पाड्यांवर काम.
  • नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्याबरोबर सक्रिय सहभाग.
  • डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने युवांसाठी सुरू असलेल्या ‘निर्माण’ आणि कुमारवयीन मुलासांठीच्या ‘कुमार निर्माण’ या उपक्रमात समन्वयक म्हणून कामाचा अनुभव.
  • ‘प्रथम’ या शिक्षणावर काम करणार्‍या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेत कंटेट क्रिएटर आणि ट्रेनर म्हणून कामाचा अनुभव.
  • नाटक, दिग्दर्शन आणि अभिवाचन अशा कार्यक्रमांचं सादरीकरण.
  • संगीत, नाट्य, साहित्य आणि चित्रकला यात खोलवर रस.
  • इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ‘लिओनार्डो-दा-विन्ची’ धडा समाविष्ट.
  • विज्ञान, कला, साहित्य या विषयांवर महाराष्ट्रभर व्याख्यानाद्वारे प्रचार आणि प्रसार.
  • 2014 यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे स्त्री सक्षमीकरणाबद्दल विशेष सन्मान.
  • 2016 चा थिंक ग्लोबल फाऊंडेशन या संस्थेकडून कला, विज्ञान आणि सामाजिक कार्य यातल्या योगदानाबद्दल स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार प्राप्त!
  • 2017 सालचा स्त्री-सक्षमीकरणाबद्दल ज्ञानेश्वर मुळे फ्रेंड्स पुरस्कार प्राप्त.
  • 2018 साली शेवगांव इथल्या बाल-कुमार साहित्य संमेलनात ‘वैज्ञानिक येती घरा’  विषयावर वक्ता म्हणून सहभाग.
  • 2018 साली आंबाजोगाई इथं संपन्न झालेल्या बाल-कुमार साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त.
  • 14 नोव्हेंबर 2019, बालदिनाचं औचित्य साधून बालगंधर्व पुणे इथे अ. भा. बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्यातर्फे विज्ञान विभागातला पुरस्कार ‘तंत्रज्ञ जीनियस’ ला प्राप्त!
  • 2020  सालचा रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण तर्फे साहित्यातील योगदानाबद्दल विशेष गुणवत्ता पुरस्कार प्रदान.
  • 2021 सालचा क्षितिज फाऊंडेशन तर्फे दिला जाणारं साहित्यातला विशेष गुणवत्ता पुरस्कार प्राप्त