Articles by Me

फोबिया 0

फोबिया

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

राधिका आपटे हिची प्रमुख भूमिका असलेला ‘फोबिया’ हा चित्रपट नुकताच बघितला. मानसिक विकारावर आधारित असलेला हा चित्रपट अतिशय सुरेख असून राधिका आपटे हिनं अप्रतिम अभिनय केला आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित हा चित्रपट २७ मे २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सायकॉलॉजिकल थ्रिलर असं म्हणता येईल. काही जण या चित्रपटाची तुलना राम गोपाल वर्माच्या ‘कौन’ या चित्रपटाशी करतात. पण ‘कौन’ मध्ये चित्रपटातून नेमका प्रश्‍न लक्षात येण्याऐवजी उर्मिला मातोंडकरचं दिसणंच केवळ लक्षात राहिलं होतं. इथं मात्र तसं होत नाही. दिग्दर्शकाची प्रचंड मेहनत आणि राधिका आपटेनं अतिशय समजून केलेली भूमिका या चित्रपटात जाणवते.

Read More
बरेली की बर्फी 0

बरेली की बर्फी

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

आयुष्यमान खुराणा आणि राजकुमार राव दोघंही उत्तम अभिनय करणारे गुणी अभिनेते! याच महिन्यात त्यांचा ‘बरेली की बर्फी’ प्रदर्शित झालाय. ‘दम लगा के हैशा’मधलं कौटुंबिक वातावरण आणि ‘क्वीन’, ‘तन्नू वेड्स मन्नू’ या चित्रपटातली कंगना राणावतची व्यक्तिरेखा असा मालमसाला वापरून किंवा उचलेगिरी करून ‘बरेली की बर्फी’ चित्रपट तयार झालाय. कथेत काहीही नावीन्य नाही, मैत्रीची स्वार्थी व्याख्या, हसू येणार नाही असे विनोद….चित्रपटाच्या शेवटी अचानक त्याग, निस्वार्थीपण आठवून केलेला शेवट…..! ज्यांना चित्रपटगृहात जाऊन पैसे घालवण्याची हौस असेल, त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा.

Read More
ट्रॅप्ड 0

ट्रॅप्ड

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

‘ट्रॅप्ड’ हा संपूर्ण चित्रपट शौर्य या एकाच व्यक्तिरेखेभोवती फिरतो. चित्रपटाचं कथानक खूप वेगळं आहे. मुंबईत एकाच ऑफीसमध्ये काम करत असलेले शौर्य आणि नुरी एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण तिचं लग्न आधीच ठरल्याचं कळताच शौर्य तिला आपण एका दिवसांत घर मिळवून आपण लगेच लग्न करू असं आश्‍वासन देतो. ती त्याला होकार देते. शौर्य धडपड करत एका एजंटकडून ‘स्वर्ग’ नावाच्या अनेक मजली इमारतीत एक फ्लॅट त्याच्या बजेटमध्ये मिळवतो. एक छोटीशी बॅग घेऊन त्या फ्लॅटमध्ये राहायला येतो. त्या इमारतीतले बहुतांश सगळेच फ्लॅट्स काही कायदेशीर बाबींमुळे रिकामे असतात. त्या इमारतीच्या रखवालदाराला ऐकायला अतिशय कमी येत असतं.
सकाळी नुरीला भेटण्यासाठी (लग्न करण्यासाठी…अन्यथा तिला ट्रेन पकडून लग्नासाठी तिच्या गावी जावं लागणार असतं.) पटकन तयार व्हायला लागतो. तेव्हा त्या घरात लाईट नाही आणि पाणीही नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. तसाच गडबडीत निघतो आणि मोबाईल घरातच राहिलाय म्हणून तो बेडरूममध्ये वळतो. नुरीचा फोन असतो, ती त्याची वाट बघत असते. ‘आपण निघालोच’ असं सांगून तो निघतो पण त्या धावपळीत मुख्य दाराची चावी दारालाच बाहेर राहते आणि दार लॉक होतं.
इथूनच सगळा थरार सुरू होतो.

Read More
मि. अँड मिसेस अय्यर 0

मि. अँड मिसेस अय्यर

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

लिखाण असो, चित्रपट-नाटक माध्यम असो, संगीत असो, चित्र-शिल्पकला असो, या सगळ्या माध्यमांमधून माणसातल्या माणुसपणाचा संदेश सतत बिंबवला पाहिजे. या अस्वस्थतेतून काल रात्री ११.३० वाजता यू-ट्यूबवर ‘मि. अँड मिसेस अय्यर’ हा चित्रपट बघितला. एक उत्कृष्ट चित्रपट बघितल्यावर चित्रपटाचा गाभा, त्यातली व्यक्त-अव्यक्त भाषा, त्यातले कलाकार, त्यातलं संगीत, चित्रपटाचं दिग्दर्शन सगळं काही एकरूप, एकजीव झाल्याचं समाधान मिळालं.
ऑस्कर विजेते, भारतरत्न सन्मानित सत्यजीत रे या असामान्य दिग्दर्शकाच्या हाताखाली तयार झालेल्या अपर्णा सेन हिचा हा चित्रपट! अपर्णा सेन हिनं बंगाली, हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलाच, पण तिचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजले. तिच्या प्रत्येक चित्रपटानं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिकं पटकावली.

Read More
मनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’ 0

मनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

माझी पिढी आताच्या पिढीशी कशी जोडून आहे हे तर या मुरांब्यात दिसतंच, पण आताच्या मुलांचे प्रश्‍न, त्यांची नाती, कामाच्या संधी आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, त्यात स्वतःचे अहंकार, बदलत्या काळानुसार लिंगभेद न करता, समानता मानत असतानाही स्त्रीचं आपल्यापेक्षा वरचढ असणं न रुचणं, आम्ही खूप बेफिकीर आहोत, आम्हाला कशाचंच काही वाटत नाही असा आव आणणारी पण मनातून हादरलेली तरुणाई, स्वतःलाच ‘स्व’ न सापडणं, गोंधळलेल्या मनाची चलबिचल हे सारं सारं वरूण नार्वेकर या दिग्दर्शकानं अचूक टिपलंय. कथा, पटकथा आणि संवाद हे सगळं त्याचंच! अप्रतिम! आणि त्याला सचिन खेडेकर, चिन्मयी सुर्वे, अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांनी सुरेल साथ दिलीये.
आलोक देशमुख (अमेय वाघ) या तरूणाचा इंदूबरोबर झालेला ब्रेकअप पासून या चित्रपटाचं कथानक वेग घेऊ लागतं. खरं तर वेग हा शब्द योग्य नाहीच इथं. छानपैकी घोळवत घोळवत हे कथानक हळुवारपणे पुढे सरकतं.

Read More
अनुपमा 0

अनुपमा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

हृषिकेश मुखर्जींचा ‘अनुपमा’ हा चित्रपट १९६६ या वर्षी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला राष्ट्रीय रजत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सत्यकाम, चुपके चुपके, आनंद, अभिमान, गुड्डी, गोलमाल, आशीर्वाद, बावर्ची, किसी से ना कहना, नमक हराम सारखे एकसे एक चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी प्रेक्षकांना दिले. त्यानी जवळजवळ ४२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. हृषिकेश मुखर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन पदवी प्राप्त केली. त्यांनी काही काळ गणित आणि विज्ञान हे विषयही शिकवले. एक कॅमेरामन म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर काही काळ फिल्म एडिटिंगचं काम केलं. तसंच बिमल रॉय यांच्या हाताखालीही त्यांनी काम केलं. अनुपमा हा चित्रपट बिमल रॉय यांनाच समर्पित करण्यात आला आहे. भारत सरकारनं त्यांना ‘पद्मविभुषण’ आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं.
‘सत्यकाम’मध्ये जसा धर्मेंद्र आवडला, तसाच तो ‘अनुपमा’मध्येही तितकाच भावला. अगदी प्रेमातच पडले त्याच्या. दिसायला देखणा, कवी मनाचा, स्वाभिमानी, मूल्यं जपत जगणारा, कुठल्याही मुलीच्या हृदयात प्रेमाचे अंकुर फुलवू शकेल असा……!

Read More
अनुभव 0

अनुभव

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुभव’ या संजीवकुमार आणि तनुजा यांच्या भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटातलं हे गाणं मला इतकं आवडतं, इतकं आवडतं की ऐकल्यानंतर अनेक दिवस त्या गाण्यातून बाहेरच येता येत नाही. गीता दत्तचा मधाळ आवाज वेडं करतो, धुंद करतो, आस लावतो……केवळ या गाण्यासाठीच आज पुन्हा एकदा ‘अनुभव’ बघितला. निर्मिती, पटकथा, दिग्दर्शक सबकुछ बासू भट्टाचार्य यांच्या या चित्रपटानं राष्ट्रीय चित्रपटांचा सर्वश्रेष्ठ पुरस्कारही त्या वेळी मिळवला. हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. यातली अतिशय सुंदर गाणी गुलजारनं लिहिली तर कनू रॉय यांचं खूपच अनोखं संगीत यातल्या गाण्यांना लाभलं. ही गाणी मन्नाडे (फिर कोई फूल खिला) आणि मुझे जाँ न कहो मेरी जान (गीता दत्त) यांनी गायिली म्हणजे चार चॉंदच लागले की!

Read More
सत्यकाम 0

सत्यकाम

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

सत्यकाम!
हृषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेला १९६९ साली प्रदर्शित झालेला अतिशय उत्कृष्ट कथानक असलेला हा चित्रपट! या चित्रपटातली धर्मेंद्रची भूमिका त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतली अप्रतिम भूमिका! या चित्रपटात धर्मेंद्र, संजीवकुमार, शर्मिला टागोर, अशोक कुमार, डेव्हिड, असरानी, बेबी सारिका यांच्या भूमिका आहेत. नारायण सान्याल यांच्या ‘सत्यकाम’ नावाच्याच कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला होता. १९६६ साली धर्मेद्र आणि शर्मिला टागोर यांच्या जोडगोळीचा ‘अनुपमा’ हा चित्रपट खूपच गाजला होता. त्यामुळे हीच जोडी पुन्हा सत्यकामसाठी निवडण्यात आली. ‘आनंद’, ‘बावर्ची’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘खुबसुरत’ असे अनेक चित्रपट काढणार्‍या हृषिकेष मुखर्जींना मात्र ‘सत्यकाम’ हा त्यांचा आवडता चित्रपट वाटत असे. या चित्रपटानं राष्ट्रीय स्तरावरती अनेक पुरस्कार मिळवले. यातली गीतं कैफी आझमी यांनी लिहिली. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. संजीवकुमारसह सर्वांचाच अभिनय ‘वा’ असाच!
‘सत्यकाम’चं कथानक इतकं अप्रतिम आहे की त्याला चांगल्या दिग्दर्शनाची, चांगल्या अभिनेत्यांची गरजच पडू नये. अर्थात चांगला दिग्दर्शक चांगल्या कथानकाला कसा न्याय देऊ शकतो यासाठी हा चित्रपट जरूर बघायलाच हवा. पडद्यावर सुरुवातीलाच महात्मा गांधींचं वाक्य बघायला मिळतं. गांधीजी म्हणत, ‘सत्य आणि प्रेम या दोन गोष्टीच माझ्यासाठी परमेश्‍वरासमान आहेत’. आणि ‘सत्यकाम’ ही गोष्टही विवेक, निर्भयता, सत्य, प्रेम यांची गोष्ट!

Read More
लॉयन 0

लॉयन

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

गार्थ डेव्हिस दिग्दर्शित ‘लॉयन’ बघितला. चक्क खंडवा, कोलकता, भारत ही सगळी दृश्यं पाहून चित्रपट ऑस्ट्रेलियन आहे का हिंदी हेच क्षणभर कळेनासं झालं. सुरुवातीपासूनच चित्रपटानं पकड घेतली. कथानक, दृश्यं, पात्रं, परिस्थिती सगळ्यांनी मनाचा ताबा घेतला…..आजही शहराशहरांमधल्या फूटपाथवर झोपणारी माणसं, रस्त्यावर भीक मागत फिरणारी, बालपण हरवलेली शेकडो/हजारो मुलं, माणसाच्या रुपात असलेली जनावरं सगळं बघून मनाचं आक्रंदन सुरू झालं. डोळ्यातून अश्रू न जुमानता बाहेर पडू लागले.

Read More
ऑस्करच्या प्रतीक्षेत -‘अरायव्हल’ 0

ऑस्करच्या प्रतीक्षेत -‘अरायव्हल’

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

ऑस्करसाठी ८ नामांकनं मिळवलेला आणि टेड चिआंग या विज्ञान लेखकानं लिहिलेल्या ‘स्टोरी ऑफ युवर लाईफ’ या अतिशय गाजलेल्या कादंबरीवरचा ‘अरायव्हल’ हा ५ महिन्यांपूर्वी ्प्रदर्शित झालेला चित्रपट आज बघायचाच असं ठरवलं आणि बघितला. या चित्रपटात अॅमी अॅडम्स आणि जेरेमी रेनर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे एक सायन्स फिक्शन आहे. पृथ्वीवर परग्रहवासीयांचं आगमन, त्या घटना आणि नायिकेच्या आयुष्यातल्या घटना क्रमसुसंगत नाहीत, त्या का नाहीत, वेळ याकडे आपण कसे बघतो आणि परग्रहवासी कसे बघतात, परग्रहवासी आणि मानव यांच्यातला संवाद अशा अनेक गोष्टीचा उहापोह या चित्रपटात केलाय.
चित्रपट संपल्यावर काही वेळ त्या चित्रपटाचा अर्थ लावण्यात गेला. डोक्याला ताण द्यावा लागला. इन्टर्नसारखा हा चित्रपट साधा, सरळ, सहजपणे उलगडेल असा नव्हता.

Read More
इन्टर्न 0

इन्टर्न

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

रॉबर्ट डिनेरो हा अतिशय लोकप्रिय असलेला अभिनेता – त्यानं ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या १९७६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात धूम मचवली होती. अतिशय सहजसुंदर अभिनय हे त्याचं वैशिष्ट्य! त्याची मुख्य भूमिका असलेला 2015 साली प्रदर्शित झालेला ‘इन्टर्न’ हा चित्रपट नुकताच बघितला. ‘अनुभव कधीच जुना होत नाही’ हे या चित्रपटाचं मुख्य सूत्र!

Read More
आमीर खानचा बहुचर्चित ‘दंगल’!!!! 0

आमीर खानचा बहुचर्चित ‘दंगल’!!!!

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

आमीर खानचा सत्य घटनेवर आधारित बहुचर्चित ‘दंगल’ हा चित्रपट अखेर आज ई-स्क्वेअर इथं अपूर्वसह बघितला. हरियाणा राज्यातल्या एका छोट्याशा गावातल्या महावीर सिंह फोगाट यानं आपल्या मुलींना आंतराष्ट्रीय स्तरावर रेसलिंगमध्ये (पहेलवान) सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या मुलींचे परिश्रम या चित्रपटात चित्रित केले आहेत. ‘लगान’, ‘चक दे इंडिया’ याच पठडीतला हा तिसरा चित्रपट! ‘दंगल’ने एकाच आठवड्यात ३०० कोटींचा बिझिनेस केल्याचं बोललं जातं.

Read More
अलिगढ 0

अलिगढ

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

त्तर प्रदेशातल्या अलिगढ विद्यापीठात घडलेल्या – सत्य घटनेवर आधारित ‘अलिगढ’ हा हंसल मेहता दिग्दर्शित चित्रपट लावला. २६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘अलिगढ’ हा हिंदी चित्रपट समलिंगी संबंध आणि मनोज बाजपेयी याचा नितांत सुंदर अभिनय यानं अतिशय उत्कृष्ट असा झाला आहे. हा चित्रपट संथ असला तरी तो हळूहळू चढत जातो आणि एक अस्वस्थ वेदना कायमची देऊन संपतो. काही चित्रपट हे फक्त कथानकापुरते न उरता ते आपल्याला त्या घटनाक्रमात खेचून घेतात आणि ते जगणं, ती वेदना जगायला लावतात.

Read More
एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी 0

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट बघितला. खरं तर मला क्रिकेट हा खेळ अजिबात आवडत नाही. दोन ते तीन लोक सक्रिय असतात आणि बाकी सगळे निष्क्रिय! त्यात बघणारे हजारो, लाखो लोक दिल की धडकन थामके वगैरे बसलेले असतात. त्यापेक्षा मला खो-खो, लंगडी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फूटबॉल, कबड्डी वगैरे खेळ आवडतात. मला काय आवडतं किंवा आवडत नाही हे इथंच थांबवते. पण चित्रपट होता, क्रिकेटचा भारतीय सर्वात लोकप्रिय कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्यावरचा! त्यामुळे क्रिकेटवरचं भाष्य तोंडून सहजपणे निघून गेलं.
चित्रपट बघायला सुरूवात केली. ट्रेलर आणि गाणी काही वेळा बघितली होती. त्यातली हिरोईन आवडली होती आणि धोनीचं काम करणारा सुशांतसिंग राजपूत हाही! त्याला पवित्र रिश्ता मालिकेपासून बघत होतेच! बरं झालं त्यानं ती मालिका सोडली आणि त्यानंतर ‘पीके’ मध्ये अनुष्का शर्माबरोबर त्याचं एकदम आल्हाददायक दर्शन झालं. त्यातलं त्याच्यावर चित्रित केलेलं गाणं, ‘बिन कुछ कहे, बिन कुछ सुने हाथो मे हाथ लिए, चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे…’ हे गाणं खूप आवडलं. अजूनही आवडतं. वातावरण एकदम गुलाबी होऊन जातं!

Read More
सैराट 0

सैराट

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

नागनाथ मंजुळे निर्मित, दिग्दर्शित आणि कथित चित्रपट सैराट आज बघितला. अजय-अतुलची यड लागलंया आणि झिंगाट ही गाणी आणि संगीत लोकांना ठेका धरायला लावणारं तर आहेच, पण येड लावणारही आहे. २९ एप्रिल २०१६ या दिवशी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित मराठी चित्रपटानं एकाच आठवड्यात ३२ कोटी रूपयांचा बिझिनेस केला. सध्या अनेक पोस्ट फिरताहेत, की संस्कारांना जपा. आई-वडिलांच्या कष्टाची आठवण ठेवा. इतक्या लहान वयात प्रेम नसतं, त्या आकर्षणापोटी आपले आई-वडील गमवू नका वगैरे वगैरे. कुठल्या संस्कृतीचे गोडवे गाणार आहोत आपण? मुलगी १८ वर्षाची झाली की कायद्यानं सज्ञान असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र तिच्या आयुष्याचे निर्णय तिला घेता येऊ नयेत किंवा तिनं ते घेऊच नयेत अशी व्यवस्था आम्ही करून ठेवतो. या चित्रपटाविषयी इतक्या उलटसुलट प्रतिक्रिया कानावर पडत होत्या की मनात कुठलाच पूर्वग्रह नको म्हणून सैराटच्या फेसबुकवरच्या असोत, वा व्हाट्सअपवरच्या असोत – जाणीवपूर्वक एकही पोस्ट वाचली नाही. खरं तर सैराट बघितल्यापासून आज सारखी स्वतःशीच चिडचिड होते आहे.
जातीबाहेर लग्न केलं की दैनंदिन जगणं किती अवघड होतं हेही सांगणारे अनेक असतात. पण तसं पाहिलं तर एकाच घरात राहणार्‍या रक्ताच्या नात्याच्या लोकांचं आपसांत किती पटतं हो! जाती-धर्माच्या भिंती कोसळून पडण्यासाठी आंतरजातीय-आंतरजातीय विवाह हे झालेच पाहिजेत हेही सैराटच्या निमित्तानं सांगावं वाटतं.

Read More
मिस्टर अँड मिसेस 55 0

मिस्टर अँड मिसेस 55

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

गुरुदत्त निर्मित आणि दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेस 55’ या चित्रपटाची गाणी लहानपणी अनेकदा ऐकली होती. औरंगाबादला शहागंज याभागातल्या ‘नरिमन’ नावाच्या दुकानातून माझ्या भावानं या चित्रपटाची एलपी रेकॉर्ड विकत आणली होती. यातली सगळीच गाणी एकसेएक होती. त्यातही ‘उधर तुम हसीं हो, इधर दिल जवॉं है’ हे गाणं मला इतकं आवडलं होतं की गाणी सुरु असताना त्या रेकॉर्डची पिन उचलून तेच तेच गाणं मी 50 वेळा तरी ऐकत असे. नंतर पुढे केव्हातरी कॉलेजला असताना हा चित्रपट दूरदर्शनवर बघितला तेव्हा तो खूपच आवडला. गुरुदत्त आणि मधुबाला यांच्यावर चित्रित केलेलं हेच गाणं आठवणीत राहिलं. आज हा चित्रपट पुन्हा बघितला आणि आजही तो आपल्याला तितकाच भावत असल्याचं जाणवलं.

Read More
बहारे फिर भी आयेगी 0

बहारे फिर भी आयेगी

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

१० ऑक्टोबर १९६४ या दिवशी गुरुदत्तनं स्वतःचं आयुष्य संपवलं आणि त्याचा अर्धवट राहिलेला ‘बहारे फिर भी आयेगी’ हा चित्रपट शाहीद लतिफ यानं पूर्ण केला. नाव जरी शाहीदचं असलं तरी प्रत्यक्षात अब्रार अल्वी आणि गुरुदत्तचा भाऊ आत्माराम यांनी दोघांनी मिळून हा राहिलेला चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र साहिब, बीबी और गुलाम च दिग्दर्शन करणारा आणि त्याबद्दल फिल्म फेयर अवार्ड मिळवणारा हाच का तो दिग्दर्शक अब्रार अल्वी असा प्रश्न मनात निर्माण होतो.
असं म्हटलं जातं की १०-१२ रीळपर्यंत चित्रिकरण झाल्यानंतरही गुरुदत्त अस्वस्थ होता. त्याच्या मनासारखं झाल्याचं समाधान त्याला मिळत नव्हतं. यात त्यानं चित्रित केलेल ‘वो हँसके मिले हमसे, हम प्यार समझ बैठे’ बघायला आणि ऐकायला खूपच आनंद मिळतो. माला सिन्हावर चित्रित झालेलं हे गाणं बघताना त्यात गुरुदत्त अदृश्यपणे जाणवत राहतो. त्याचा छायाप्रकाशाचा प्रभाव या गाण्यावर दिसतो आणि अशा वेळी हटकून रेम्ब्रा या चित्रकाराची आठवण होते. या चित्रपटातली ‘कोई कहदे’, ‘आपके हसीन रुख पे आज नया नूर है’, ‘दिल तो पहलेसे मदहोश है’ आणि ‘बदल जाये अगर माली’ ही सगळीच गाणी श्रवणीय असून संगीतकार ओ. पी. नय्यर आहेत. ओ. पी. नय्यरच्या उत्कृष्ट गाण्यांमध्ये या गाण्यांचा समावेश करता येईल.

Read More
साहिब, बीबी और गुलाम 0

साहिब, बीबी और गुलाम

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

बलराज साहनीनंतर गुरुदत्तनं मनावर मोहिनी घातली. त्याचा कागज के फुल आणि प्यासा बघितला. दोन्ही अनुभव सुन्न करणारे! त्यातला गुरुदत्त वेगळाच होता, जरा धीरगंभीर, संयमी आणिक काय काय…..त्यालाच डोळ्यासमोर ठेवून साहिब, बीबी और गुलाम बघायला सुरुवात केली… १९ व्या शतकाच्या अखेरची कलकत्त्यामधली गोष्ट….कधी काळी शानदार, वैभवानं नटलेल्या जमीनदार चौधरीच्या हवेलीला कळा आलेली आणि तिची पडझड झालेली. तिला आता पूर्णच जमीनदोस्त करण्यासाठी अनेक मजूर कामाला लागलेले आणि ते सगळं दश्य त्यांच्यावर देखरेख करत असलेला ओव्हरसिअर बघतोय….त्या हवेलीच्या परिसरात फिरत असतानाच तो भूतकाळात हरवतो आणि तीच हवेली त्याला नव्या नवरीसारखी अतिशय सुरेख दिसायला लागते. त्या हवेलीत सगळीकडे धांदल सुरू असतानाच समोरून कामाच्या शोधात खेडेगावातून आलेला एक तरूण हातात कपड्यांचं बोचकं घेऊन तिथं प्रवेश करतो. तो भाबडा तरूण शहरातलं झगमगतं वातावरण आणि त्यातही हवेलीतली चहलपहल बघून चकित होतो. त्याच्याकडे पाहून मीही तितकीच चकित झाले. अरे, हा तर गुरुदत्त! पण पूर्वी बघितलेल्या दोन्ही चित्रपटांपेक्षा हा एकदम वेगळा! एकदम हटके! त्याच्या त्या भाबड्या रुपाच्या प्रेमात कोणीही पडावं असा!

Read More
प्यासा 0

प्यासा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

गुरुदत्तनं ‘प्यासा’ या चित्रपटात तर अनेक वेगवेगळी तंत्र आणि शैली वापरली. गुरुदत्त या चित्रपटात एक अभिनेता म्हणून, संगीतकार म्हणून, गीतकार म्हणून आणि छायाचित्रणकार म्हणूनही आपल्याला पदोपदी दिसतो. ‘प्यासा’ हा चित्रपट छायाचित्रणासाठी एकदा, दिग्दर्शनासाठी एकदा, अभिनयासाठी एकदा, गीतांसाठी एकदा, संगीतासाठी एकदा अशा अनेक गोष्टींसाठी एकदा – एकदाच नव्हे तर अनेकदा पाहावा आणि अनुभवावा असा चित्रपट आहे.
‘टाईम’ च्या सर्व्हेक्षणात जगभरातल्या १०० सर्वश्रेष्ठ चित्रपटांमध्ये ‘प्यासा’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर जाऊन बसला. असं म्हटलं जातं की भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी हा चित्रपट बघितला, तेव्हा त्यांना देखील आपले अश्रू आवरता आले नव्हते!

Read More
कागज के फूल 0

कागज के फूल

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

२ जानेवारी १९५९ साली प्रदर्शित झालेला आणि फिल्म फेअर ऍवार्डनं पुरस्कृत केलेला हा गुरूदत्त दिग्दर्शित कागज के फूल हा चित्रपट त्या वेळी मात्र एक आठवडाभरही हा चित्रपट चालला नाही. इतक्या सुंदर कलाकृतीचं भरभरून यश बघणं गुरुदत्तच्या नशिबी नव्हतं. आज मात्र जगभरातल्या १३ नामांकित विश्‍वविद्यालयांमधून हा चित्रपट अभ्यासासाठी ठेवलेला आहे. २० वर्षांनी या चित्रपटानं लोकांना जाणीव झाल्यावर आणि या चित्रपटाचं महत्त्व पटल्यावर अक्षरशः डोक्यावर घेतलं. राजकपूर या दिग्दर्शक आणि अभिनेत्यानं तर म्हणूनच ठेवलं होतं. की कागज के फूल या चित्रपटाचं कलामूल्य लोकांना उशिरा कळेल. हा चित्रपट काळाच्या आधीच प्रदर्शित झालाय आणि तसंच झालं. गुरुदत काळाच्या पुढचा विचार करणारा कलावंत होता. त्याच्या कलेचं मूल्य त्या काळातल्या लोकांना समजणंच शक्य नव्हतं. चुकीच्या वेळी तो जन्मला आणि त्याचं मोल जगाला फार उशिरा समजलं.
कागज के फूल हा चित्रपट मनाला बेचैन करून सोडतो. गुरुदत्तच्या वेदनांनी आपल्या हदयात जाऊन कधी जागा घेतली आपल्यालाही कळेनासं होतं हेच खरं!

Read More
दो बिघा जमीन 0

दो बिघा जमीन

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट खरोखरच हिन्दी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो. भारतातल्या १० उत्कृष्ट चित्रपटात ‘दो बिघा जमीन’ ची गणना होते. पण हा चित्रपट गल्ला भरू नसल्यानं त्या वेळी फारसा चालला नाही. या चित्रपटानं भारतीय सिनेमात नवयर्थाथवादाची सुरुवात केली. खरं तर हा चित्रपट म्हणूच नये. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी – कशा अवस्थेत आजही जगतोय याचं डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं वास्तव आज ६० वर्षांनतर तसंच बघायला मिळतं आहे. एकीकडे या चित्रपटातून परस्परातलं प्रेम, माणुसकी, परिश्रम, आशावाद, मूल्यांवरची अढळ श्रद्धा हे सगळं दिसत असतानाच आजही गरीब, दलित वर्गाची दयनीय अवस्थाही बघायला मिळते. भारतीय शेतकर्‍याच्या भीषण अवस्थेचं चित्रण या चित्रपटात आहे. यात रोजच्या पोटाचा प्रश्‍न निर्माण झाल्यानं गावाकडून शहराकडे धावणार्‍या मनुष्याचं जगणं बघायला मिळतं. पण त्याचबरोबर शहरात जाऊनही त्याच्या हाती काहीच लागत नाही. मिळतं ते फक्त बकाल जीवन! त्याचं सुख संपल्यातच जमा होतं. सुखाची स्वप्नंही तो बघू शकत नाही कारण ती स्वप्नं बघायलाही त्याच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही, इतका तो त्या घाण्याच्या बैलासारखा कामाला जुंपला जातो. त्या वेळी बिमल रॉयनं या चित्रपटाच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्‍न आजही ६० वर्षानंतर उत्तराच्या शोधात तसेच उभे आहेत हेच खरं!

Read More
सीमा 0

सीमा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

१९५५ साली अमिय चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेला एक क्लासिक चित्रपट म्हणजे बलराज साहनी आणि नुतन यांच्या अभिनयानं नटलेला ‘सीमा’! आज ६० वर्षांनतरही हा चित्रपट मनाला तितकाच भिडतो. त्याचं कथानक, त्यातली मूल्यं, त्यातला मानवतावाद, त्यातली गाणी, त्यातलं संगीत त्यातल्या पात्रांचा अभिनय काय काय सांगावं?

‘सीमा’ हा चित्रपट मी लहानपणापासून कितीतरी वेळा बघितला, पण त्याची जादू आजही तसूभरही कमी होत नाही. तो मनावर तितकाच परिणाम साधत राहतो. गौरी असलेल्या नुतनच्या सुखदुःखाशी प्रेक्षकाला समरस करून सोडतो. बलराज साहनीसारखा आर्दशवादी माणूस शोधण्यासाठी आपण सगळेच आतुर असतो. नुतनमधली बंडखोर, हट्टी मुलगी, आपल्या सगळ्यांमध्येच असते. त्यामुळे तिचं पळून जाणं, खोट्या आरोपाविरुद्ध न्यायासाठी बंड करणं, रागामुळे तोडफोड करणं, ‘मी वाईट आहे तर आहेच वाईट’ म्हणून ओरडणं हे सगळं बरोबरच वाटायला लागतं. त्याच क्षणी आपल्याही चेहर्‍यावर जणू काही ती आपलीच प्रतिकृती असावी इतकं साम्य वाटतं. तिसरी-चौथीत असताना हा चित्रपट मी पहिल्यांदा बघितला. तेव्हा तो सगळाच कळला असा भाग नव्हता, पण आवडला होता. त्यानंतर १० वीत असताना मी ‘सीमा’ बघितला, तेव्हा थोडा कळला आणि खूप आवडला. मग ३५ च्या वयात पुन्हा हाच सिनेमा बघितला, तेव्हा त्यातले अनेक कंगोरे कळत गेले, आणखीनच आवडला आणि आज पुन्हा पाहतानाही त्यातली ताकद कळत गेली.

Read More
अनुराधा 0

अनुराधा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

‘अनुराधा’ हा चित्रपट मी अनेकदा बघितलाय. काल परत एकदा बघितला. १९६० साली हृषिकेष मुखर्जींनी दिग्दर्शित आणि प्रदर्शित केलेला आणि पंडित रवीशंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अनुराधा’ या चित्रपटाचं बलराज सहानी आणि लीला नायडू यांनी अक्षरशः सोनं केलंय. आपल्या मूल्यांना प्राधान्य देणारा एक डॉक्टर आणि संगीत हेच जगणं मानणारी अतिशय संवेदनशील गायिका असलेली तरुणी यांच्यातल्या हळुवार प्रेमाची कहाणी यात आहे. बलराज सहानी आणि लीला नायडू यांचं प्रेम इतकं तरलपणे फुलत जातं, की बघणारा त्या प्रेमाचा साक्षीच नव्हे, तर त्याचा हिस्सा होऊन जातो.

Read More
garam hava 0

garam hava

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

हर सिनेमे तुफान
वहॉं भी था यहॉं भी
हर घरमे चिता जलती थी
लहराते थे शोले,
हर शहरमे शमथान
वहॉं भी था, यहॉं भी
गीता की कोई सुनता,न कुरान की सुनता
हैरान था इमान
वहॉं भी था, यहॉं भी

Read More
वेध – व्यापक ऊर्जेचं व्यासपीठ 0

वेध – व्यापक ऊर्जेचं व्यासपीठ

Posted by on Sep 14, 2017 in Articles by Me, Blog

कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे

जीवनाच्या वाटेवरी सुख पेरीत जावे

कोणीतरी कोणासाठी नीत्य गीत गावे

त्या गीताच्या बोलांनी आयुष्य हे फुलावे

कोणीतरी कोणासाठी मुक्त हास्य व्हावे

त्या हास्याच्या मोहराने आसमंत भारावे

कोणीतरी कोणासाठी……………….

Read More
‘कोण कोणाला मारीत भोंगा’ -प्रतिक्रिया 0

‘कोण कोणाला मारीत भोंगा’ -प्रतिक्रिया

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

काही दिवसांपूर्वी लोकमतच्या ‘मंथन’ या पुरवणीतला ज्ञानेश्वर मुळे यांचा ‘कोण कोणाला मारीत भोंगा’ हा निशःब्द करणारा लेख वाचला. तो वाचून मनात अनेक विचार आवाजच करायला लागले. जेव्हा जेव्हा मी घराबाहेर...

Read More
राही तू रूक मत जाना…. 0

राही तू रूक मत जाना….

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

राही तू रूक मत जाना…. १२ भारतीय जीनियसच्या ३ संचाचं प्रकाशन १२ नोव्हेंबर २०१६ या दिवशी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड, पुणे इथल्या सभागृहात पार पडलं. खरं तर माझ्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक वेळी इतके...

Read More
Thanks-Diwali and Birthday 2016 0

Thanks-Diwali and Birthday 2016

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

माझे फेसबुकवरचे सर्व मित्र-मैत्रिणी, ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिक, माझ्यावर प्रेम करणारे निर्माणी, चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मित्र-मैत्रिणी, प्रथम संस्थेतले सहकारी, बुकगंगा आणि इतर प्रकाशक मित्र,अनेक...

Read More
माझे गाव माझे जगणे- अरुण शेवते 0

माझे गाव माझे जगणे- अरुण शेवते

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

‘ऊनसावलीचा खेळ आयुष्यभर चालू असतो. या खेळात आपण कधी दमतो, तर कधी सुखावतो. अशा वेळी आपलं गाव आपल्या सोबत असतं…’ – माझे गाव माझे जगणे १९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता अक्षरधारा आणि...

Read More
उत्तर हवंय 0

उत्तर हवंय

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

‘लेकीला उत्तर हवंय’ हे पुस्तक म्हणजे मुलींना येणार्‍या अनुभवांचा संग्रह आहे. हे पुस्तक अनु गुप्ता नावाच्या एका या कार्यकर्त्यानं त्याच्या फिल्डवरच्या अनुभवातून लिहिलंय. या पुस्तकाचा मराठीतून अनुवाद सविता दामले यांनी अतिशय सोप्या शब्दांत आणि रंजकपणे केलाय. या पुस्तकात मुलीच्या आणि मुलाच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्यात होणारे शारीरिक बदल तर टिपले आहेतच, पण या बदलाच्या वेळात त्यांना ज्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, ते प्रसंग अनु गुप्तानं ठिकठिकाणी जाऊन अगदी लहान गावापासून ते शहरापर्यंतच्या मुलामुलींना बोलतं करून लिहिले आहेत. आई-वडिलांचं अज्ञान, कुठल्याच गोष्टींची माहिती नसणं, मनात उडालेला गोंधळ, अपराधीपणाची भावना आणि मनातल्या अनेक प्रश्‍नांची उत्तर न मिळणं अशा कितीतरी गोष्टींचा विचार हे पुस्तक लिहिताना केला गेला आहे. साधी, सुबक रेखाटनं आणि त्यातून मुला-मुलींचा आपल्याशी होणारा किंवा स्वतःशीच होणारा संवाद या पुस्तकात वाचायला मिळतो.

Read More
इन्किलाब विरुद्ध जिहाद 0

इन्किलाब विरुद्ध जिहाद

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

मला स्वतःला कुठल्याही कार्यक्रमाला वेळेत पोहोचायला आवडतं. विशेषतः पुस्तक प्रकाशनाचा असेल तर आणखीनच वेळेच्या आधी! कारण त्यामुळे कार्यक्रम सुरू होण्याआधी पाच-दहा मिनिटं कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर तिथलं...

Read More
एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी 0

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

धोनी चित्रपट सुरू झाला आणि मी त्यात रमून गेले. मराठी, तेलगू, तमीळ आणि हिंदी या चार भाषेत हा चित्रपट असून ३० सप्टेंबरला म्हणजे नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटानं दोनच दिवसांत ४५ कोटींचा बिझिनेस केलाय. या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होतंय. खरं तर जेव्हा ती व्यक्ती अस्तित्वात असते आणि जेव्हा तिची भूमिका तुम्हाला वठवायची असते, तेव्हा लोक तुलना करणार….तुम्ही थोडे जरी कमी पडलात की सगळंच संपलं. निर्माता, दिग्दर्शक सगळ्यांच्याच दृष्टीनं हा खूपच मोठा जुगार! असं असताना सुशांतसिंग राजपूतनं ही भूमिका स्वीकारून ती यशस्वीपणे निभावलीये. असंही म्हटलं जातंय की प्रत्यक्षात धोनी नसेल, तितका विनयशील, नम्र असा सुशांतसिंगने धोनी रंगवलाय!

Read More
About Mati, Pankh aani Akash- एक नितांत सुंदर अनुभव! 0

About Mati, Pankh aani Akash- एक नितांत सुंदर अनुभव!

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

भारतीय परराष्ट्र सेवेत सचिवपदी (सर्वोच्च पदी) असलेल्या ज्ञानेश्‍वर मुळेंनी नम्रपणे ‘आपण जे वागतोय त्यात विशेष ते काय’ असा उलटा प्रश्‍न श्रोत्यांना केला. आपल्याला असंच वागता येतं, यापेक्षा वेगळं वागता येतच नाही असंही सांगितलं. घर, कुटुंब, शाळा, शिक्षक, कोल्हापूरचं शाहू महाराजांनी निर्माण केलेलं शैक्षणिक वातावरण या सगळ्यांविषयी त्यांनी विस्तारानं सांगितलं आणि या सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्यावर कसे झाले हेही सांगितलं. आपल्यातलं कुतूहल आपल्याला सतत पुढे जाण्याची, नवं शिकण्याची, मर्यादा तोडण्याची प्रेरणा देत होतं असंही ते म्हणाले. याच गोष्टीमुळे आपण विदेशसेवेचा पर्याय निवडला आणि तो किती योग्य ठरला याचं कारण सांगताना ते म्हणाले, गावाच्या, राज्याच्या, देशातल्या सीमा तोडल्यानं माझा स्वतःचा दृष्टिकोन व्यापक झाला. तसंच शासकीय काम रुक्ष नसतं तर आपण करू ते काम रोचक आणि सर्जनशीलतेनं कुठेही करू शकतो असंही ते म्हणाले.

Read More
नंदू माधव, हरिश्‍चंद्राची फॅक्टरी आणि गप्पा! 0

नंदू माधव, हरिश्‍चंद्राची फॅक्टरी आणि गप्पा!

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

२६ सप्टेंबर २०१४ या दिवशी अचानक सकाळी या मित्राचा फोन आला, आज माझ्या ‘टपाल’ या चित्रपटाचा प्रिमियर शो आहे, येतेस? आनंदानं होकार देत सिटी प्राईड कोथरूड इथं गेले आणि हा चित्रपट बघितला. एक छोटीशी गोष्ट, पण एखाद्याचं आय्ाुष्य किती ढवळून टाकू शकते….किती खळबळ माजवून टाकू शकते….एका लहानशा मुलाचं भावविश्‍व एकीकडे, तर दुसरीकडे मूल नसलेल्या एका जोडप्याची व्यथा….एकीकडे गावाची सुखदुःखं जाणून त्यांना आपल्या परीनं मदत करणारा पोस्टमास्तर, तर दुसरीकडे गावाची न बदललेली मानसिकता….या चित्रपटानं खूप अस्वस्थता आली….रडायलाही आलं खूप…..त्रास झाला पुन्हा आठवताना…..त्यातला पोस्टमास्तर – नंदू माधव – डोळ्यासमोरून हलत नव्हता…आणि गावातला त्याचा कोणीही नसलेला तो लहानसा मुलगाही! दोघांचाही अभिनय अप्रतिम! मन थोडं आणखी मागे गेलं….असंच एकदा काहीतरी कामानिमित्त पुण्याला येणं झालं आणि शफाअत खान लिखित नंदू माधवची भूमिका असलेलं शोभायात्रा नाटक बालगंधर्वला बघण्याची संधी मिळाली. त्यातली त्याची महात्मा गांधींची केलेली भूमिका अद्यापही स्मरणात आहे. नंतर कितीतरी वर्षं तो बापट माझ्या कानाशी जोरात ओरडायचा आणि माझ्या चेहर्‍यावर हसू पेरायचा. नाटक संपल्यावर नंदूला मेकअपरूममध्ये जाऊन भेटलेही होते आणि त्यानंही खूप प्रेमानं विचारपूस केली होती.

Read More
धागा धागा सुखाचा 0

धागा धागा सुखाचा

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

आजही रेडिमेडचा जमाना असला तरी माझे साडीवरचे ब्लाऊज, गाऊन्स, पंजाबी ड्रेसेस, साडीचा फॉलपिको करणं हे मी स्वतः स्वतःचं अजूनही करते. आज माझ्याकडे शिलाई मशीन नाही, पण मी जेव्हा मुंबईला अंधेरीला माझ्या शोभना गोडबोले या मैत्रिणीकडे जाते, (तिलाही हे सगळं उत्कृष्टरीत्या येतं) तेव्हा मला ब्लाऊज शिवायचेत सांगितलं की दुपारी, रात्री ती तिची इम्पोर्टेड मशीन काढून माझ्यासमोर ठेवते आणि माझं काम आमच्या गप्पांच्या साक्षीनं सुरू होतं. आज फेसबुकवरची मैत्रीण सायली राजाध्यक्ष हिची साड्यांची निवड, त्यातली रंगसंगती, तिचं स्वतःचं साडीमधलं क्रिएशन बघते तेव्हा तिचा खूपच अभिमान वाटतो.
आज हे सगळं आठवताना या सगळ्या गोष्टीतला आनंद कळतोय. या गोष्टींनी नकळत मला स्वावलंबनाचे धडे दिले. प्रत्येक कामातला आनंद काय असतो, कुठलंच काम कमी दर्जाचं नाही हेही नकळत शिकवलं. निर्णयक्षमता दिली आणि कलेचं एक सुंदर दालन उघडं करून दिलं.

Read More
चष्मेबद्दूर – तेरा मेरा साथ रहे 0

चष्मेबद्दूर – तेरा मेरा साथ रहे

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

नववी-दहावीत गेल्यानंतर बरोबरीच्या अनेक मैत्रिणींना चष्मा लागला. काळ्या चौकोनी फ्रेममधला तो चष्मा त्या जेव्हा नाकावरून सरकवत तेव्हा खूप वाईट वाटे. चष्मा असला की माणूस हुशार वाटायला लागतो. (खरं तर मुळातच त्या हुशार होत्या, चष्मा असला काय नसला काय) असा माझा समज पक्का होत चालला होता. आपण त्या गटातले नाहीत या भावनेतून जास्तच वाईट वाटत असे.

Read More
वडिलांबरोबर भाजी आणायला जाणं … 0

वडिलांबरोबर भाजी आणायला जाणं …

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

लहानपणी वडिलांबरोबर (वडलांना आम्ही दादा म्हणत असू) आठवडी बाजारात भाजी आणायला जात असे, त्यांच्याबरोबर भाजी आणायला जाणं म्हणजे रविवार आला की घरातले सगळे पळ काढत, त्या गर्दीत, गोंधळात जायची गरजच काय? किती पैसे...

Read More
दुखभरे दिन बिते रे भैया, अब सुख आयो रे रंग जीवन मे नया लायो रे 0

दुखभरे दिन बिते रे भैया, अब सुख आयो रे रंग जीवन मे नया लायो रे

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

मी खरंच परदेशी जाईन का माहीत नाही, पण आपल्या अस्तित्वाची ओळख सांगणारा पासपोर्ट मला महत्वाचा वाटत होता. पासपोर्ट काढणं आणि हे पोलीस व्हेरिफिकेशन…..या सगळ्या प्रक्रियेतून जाताना पासपोर्ट अधिकारी (ज्ञानेश्‍वर मुळे, अतुल गोतसुर्वे) आणि यंत्रणा, पोलीस यंत्रणा (महेश भागवत – या तिन्ही अधिकार्‍यांविषयी बोलावं तितकं कमीच आहे.) यांच्या चमत्कारयुक्त कामाच्या झपाट्यामुळे आता या प्रक्रियेविषयीची भीती, सगळा ताण दूर झाला हे नक्की. माझं मन मात्र तेव्हापासून गातंय,
दुखभरे दिन बिते रे भैया, अब सुख आयो रे
रंग जीवन मे नया लायो रे

Read More
प्रत्येक भारतीयाकडे पासपोर्ट …….सत्यात उतरणारं स्वप्न 0

प्रत्येक भारतीयाकडे पासपोर्ट …….सत्यात उतरणारं स्वप्न

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

आता पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे ज्ञानेश्वर मुळे आणि police verification प्रक्रिया ज्यांनी सोपी केली ते आय पी एस अधिकारी महेश भागवत त्यांनाही तितकंच Thank You आहे.

Read More
19 June 2016- Datar classes, Pune function 0

19 June 2016- Datar classes, Pune function

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

या क्लासेसमधलं वातावरण हे व्यावहारिक पातळीवरचं जाणवलंच नाही, तर एका मोठ्या वैश्‍विक कुटुंबाकडे नेणारं असंच वाटलं. पालक आणि शिक्षक यांनीही आपली मनोगतं प्रातिनिधिक स्वरुपात व्यक्त केली. अनेक पालक पूर्वी क्लासेसचे विद्यार्थी होऊन गेले होते, आणि आता त्यांची मुलंही या क्लासचा हिस्सा बनली होती. विज्ञान हा आपल्या आयुष्याचा कसा महत्वाचा भाग आहे, कला आयुष्याला कशी समृद्ध बनवते आणि संपूणर्र् समाजाला समजून घेणं म्हणजे काय अशा अनेक गोष्टींची शिकवण मित्र होऊन देणारे पळशीकर सर मुलांसमोर एक आदर्श असल्याचं चित्र मला बघायला मिळालं.

Read More
१२ जून २०१६ आणि पुलंचा आशय निर्मित कार्यक्रम! 0

१२ जून २०१६ आणि पुलंचा आशय निर्मित कार्यक्रम!

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

पुलंच्या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारची सहजता होती, कुठलीही पोज नव्हती. लहान मुलगा जसा खेळण्याचा आनंद घेतो तसे पुलं! तोच आनंद त्यांच्या संगीतरचनेत दिसतो. ते म्हणत, आनंद हा ऍनॅटिकली बघायचाच नसतो. त्याची चिकित्सा करायची नसते. कविता आणि संगीत या दोन्हीवर सारखं प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे पुल! त्यांच्या लिखाणात संगीत होतं. अंतू बर्वा वाचतानाही वाचकाला त्यातलं संगीत ऐकू येतं. त्यांना साउंड फार छान कळायचा. म्हैसचं कथाकथन ऐकताना २५ पात्रांचे वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकायला येतात. त्यांच्या लिखाणात आणि कथाकथनातही संगीत होतं. त्यांच्या कुठल्याही गाण्यात चमत्कृती नाही. गूढता नाही. कारण त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वच तसं नव्हतं. ललित गद्यातली लय त्यांच्याकडै बघताना कळते. बेगम अख्तरीबाईंवरचा त्यांचा लेख ‘जाने क्यू तेरे बात पे रोना आया’ हा सहा पानी अप्रतिम लेख आहे. नुसती तज्ज्ञता बघू नका रे, त्यातली रसज्ञता बघा असं ते म्हणायचे.

Read More
बुद्धपोर्णिमा आणि नाणेघाट 0

बुद्धपोर्णिमा आणि नाणेघाट

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

हा डोंगर चढा किंवा खडा म्हणूया. लहान मुलांसारखी पटापट गप्पा मारत चाललेली ही मंडळी बघून मी मला लागलेला श्‍वास, दम विसरून जात होते. बघता बघता आम्ही वर पोहोचलो.
चंदाचा प्रकाश, प्रचंड तुफानी वारा, अंगाला वाजणारी बोचरी थंडी आणि थोडंही हाललो तर कागदासारखे उडून जाऊ अशी परिस्थिती! आम्ही त्या टोकावरच्या चिंचोळ्या जागेत सगळे कसेबसे दाटीवाटीनं बसलो. सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलं होतं. वय वर्ष २५ पासून ६५ पर्यंतचे तरूण जोरजोरात आरडाओरडा करत होते.

Read More
इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस- महेश भागवत 0

इन्स्पेक्टर जनरल ऑफ पुलीस- महेश भागवत

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

महेश भागवत सध्या हैद्राबाद इथं आयजी म्हणून कार्यरत आहेत. ते एक कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. याचं कारण त्यांनी लोकांसाठी केलेली कामं! कॉलेज जीवनात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पाणी पंचायत आणि नर्मदा बचाव आंदोलन यामध्ये काम केल्यानं आजही त्यांच्यातला हाडाचा कार्यकर्ता सदोदित जागा असतो. चळवळीनं काय दिलं तर सर्वसामान्य लोकांमध्ये राहून नम्रता अंगी बाळगून काम कसं करायचं हे शिकलो असं त्यांनी सांगितलं. काम करताना संयम, वैज्ञानिक दृष्टिकोन यांची जोड बरोबर असते. काम करताना आपल्या सहकार्‍यांचा विश्‍वास संपादन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट ते मानतात. त्यांनी हाती घेतलेलं काम ते यशस्वी करून सोडतात. नक्षलवाद्यांची संख्या कमी करता येईल यावर सतत मनन आणि चिंतन करून त्यांनी त्यावर अनेक उपाय योजले. तसंच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘प्रशासन आपल्या दारी, पोलीस आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला.

Read More
प्राजक्ता -निरोप 0

प्राजक्ता -निरोप

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

कधी तुझ्यात दडलेला एक रसिक
अनेक किश्श्यामधून आमच्यासमोर येतो…
इतरांना समृद्ध करण्याचा वसा उचलेला तू
किती जणांची पुस्तकं सढळ हातानं वाटत असतोस….
कधी तुझ्यातला पालक आम्हाला आधार देत राहतो,
कधी तुझ्यातला मित्र आम्हाला हसत जगण्याची रीत सांगतो,
…..इतक्या सगळ्यांना एकत्र गुंफून तू जी किमया केली आहेस….
खरंच मित्रा शब्दच नाहीत…..

Read More
माती, पंख आणि आकाश 0

माती, पंख आणि आकाश

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

आज अमेरिकेमध्ये भारतीय दूतावास आणि कॉन्सुलर जनरल ऑफ इंडिया हे पद भूषवित असलेल्या ज्ञानेश्‍वर मुळेंकडे बघताना जाणवतं की त्यांचा महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्हयातल्या एका छोट्याशा खेड्यापासून सुरु झालेला हा प्रवास इतका सहजसाध्य नव्हता. पण त्यांनी कुठेही त्या गोष्टींचा फार बाऊ केलेला आढळत नाही. आपल्या त्या वेळच्या कष्टाला, प्रयत्नांना त्यांनी ग्लोरिफाय केलं नाही. पूर्ण पुस्तक वाचल्यावर ज्ञानेश्‍वर मुळे नावाची व्यक्ती अधिकारानं, पदानं आणि प्रतिष्ठेनं मोठी असली तरी आपल्यासाठी मात्र ती गावाची ओढ असलेली, माणसातलं माणूसपण शोधणारी, जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी असलेली आणि आपल्या देशावर अपरिमित प्रेम करणारी व्यक्ती म्हणूनच लक्षात राहते.

Read More
गरम हवा 0

गरम हवा

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

जो दूरसे तुफान का करते है नजारा
उनके लिये तुफान वहॉं भी है, यहा भी
धारेमे जो मिल जाओगे बन जाओगे धारा
ये वक्त का ऐलान वहॉं भी है, यहॉं भी

Read More
अनुराधा 0

अनुराधा

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट अतिशय तरलतेनं आपल्या मनापर्यंत पोहोचतो. यातली प्रत्येक नाती अतिशय ताकदीनं आपल्यासमोर उभी राहतात, की जणूकाही ती आपल्याच आसपास असावीत. आजोबा आणि नात, डॉक्टर आणि रुग्ण, नवरा आणि बायको, प्रियकर आणि प्रेयसी ही सगळी नाती इतकी अलवारपणे उमलतात की त्या व्यक्तिरेखा जिवंत होत जातात. बलराज सहानीचा आदर्शवाद त्याच्या दिसण्यातून, हालचालीतून, डोळ्यातून आतपर्यंत भिनला गेल्याचं कळतं. लीला नायडूचं सात्विक सौदर्ंय आणि सहजसुंदर अभिनय तिच्या प्रेमात कायमचं पाडतो. शैलेंद्र यांची गीतं आणि पं. रवीशंकर यांचं संगीत हे प्रत्येक प्रसंगाचा एक भागच बनून जातं. लता मंगेशकर, महेंद्र कपूर आणि मन्नाडे यांनी आपल्या आवाजानं अंतःकरणाला भिडणारे त्या त्या गाण्यांतले भाव सादर केलेत.

Read More
सीमा 0

सीमा

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

हिंदी चित्रपटसृष्टीला बलराज साहनी या कलाकारानं आपल्या आयुष्याची २५ वर्षं दिली आणि १२५ चित्रपटांत काम केलं. माणसातलं नष्ट होत चाललेलं माणूसपण, त्याची र्‍हास होत चाललेली मूल्यं, सामाजिक भेदाभेद या सगळ्या गोष्टींना पुन्हा बदलणारा सशक्त ताकदीचा कलाकार म्हणून बलराज साहनीकडे बघावं लागतं. दलित, शोषित, वंचित आणि उपेक्षित वर्गाचं प्रतिनिधित्व या कलाकारानं केलं. शिक्षणानंतर आपलं आयुष्य पत्रकारितेत या माणसानं झोकून दिलं. रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन विद्यापीठात त्यांनी हिदीं विषय शिकवण्याचं कामही केलं. वर्ध्याला म. गांधीच्या आश्रमातही काही काळ वास्तव्य केलं. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लंडनची बीबीसीमधली नोकरी सोडून स्वातंत्र्यलढ्यात हा माणूस उतरला. लंडनमध्ये राहिलेला, तिथे बीबीसीमध्ये नोकरी केलेला, डाव्या विचारसरणीचा, शेक्सपिअरची नाटकं आपल्या समर्थ अभिनयानं जिवंत करणारा, बर्नार्ड शॉच्या नाटकात काम करणारा, इतका मोठा कलाकार असूनही साधेपणानं सामान्य जीवन जगणारा, अतिशय संवेदनशील व्यक्ती असलेला बलराज साहनी मला इतका भावतो की बस्स! तसंच तो मलाच काय, पण कोणालाच कधीच परका वाटू शकत नाही हेही तितकंच खरं! हा चित्रपट मी कथानक सांगितलं असलं तरी प्रत्येकानं जरूर बघावा!!! कारण त्यातल्या अनेक जागा, अनेक प्रसंग आयुष्याचं खूप मोठं तत्वज्ञान सांगून जातात.

Read More
दो बिघा जमीन 0

दो बिघा जमीन

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के
मौसम बिता जाये, मौसम बिता जाये
अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा
कौन कहे इस और तू फिर आये ना आये
मौसम बिता जाये, मौसम बिता जाये

Read More
प्यासा 0

प्यासा

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

काय म्हणायचं या गुरुदत्त नावाच्या माणसाला? वेदनेचा वाटसरू की दुःखाचा पुजारी? एखादा माणूस इतका संवेदनशील कसा काय असू शकतो? ‘प्यासा’ बघितल्यावर पुन्हा तेच बधिरपण मनावर पसरलं. कागज के फूल बरा, इतकं ‘प्यासा’नं सतावलं आणि गुरुदत्तबद्दल विचार करताना तो माणूस म्हणून, अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून सगळयाच पातळीवर कमालीचा पारदर्शी दिसतो. या बेगडी, दुटप्पी जगात राहणं त्याच्यातल्या कलावंताला अशक्य झालं असावं.

Read More
कागज के फूल 0

कागज के फूल

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

२ जानेवारी १९५९ साली प्रदर्शित झालेला आणि फिल्म फेअर ऍवार्डनं पुरस्कृत केलेला हा गुरूदत्त दिग्दर्शित कागज के फूल हा चित्रपट त्या वेळी मात्र एक आठवडाभरही हा चित्रपट चालला नाही. इतक्या सुंदर कलाकृतीचं भरभरून यश बघणं गुरुदत्तच्या नशिबी नव्हतं. आज मात्र जगभरातल्या १३ नामांकित विश्‍वविद्यालयांमधून हा चित्रपट अभ्यासासाठी ठेवलेला आहे. २० वर्षांनी या चित्रपटानं लोकांना जाणीव झाल्यावर आणि या चित्रपटाचं महत्त्व पटल्यावर अक्षरशः डोक्यावर घेतलं. राजकपूर या दिग्दर्शक आणि अभिनेत्यानं तर म्हणूनच ठेवलं होतं. की कागज के फूल या चित्रपटाचं कलामूल्य लोकांना उशिरा कळेल. हा चित्रपट काळाच्या आधीच प्रदर्शित झालाय आणि तसंच झालं. गुरुदत काळाच्या पुढचा विचार करणारा कलावंत होता. त्याच्या कलेचं मूल्य त्या काळातल्या लोकांना समजणंच शक्य नव्हतं. चुकीच्या वेळी तो जन्मला आणि त्याचं मोल जगाला फार उशिरा समजलं.
कागज के फूल हा चित्रपट मनाला बेचैन करून सोडतो. गुरुदत्तच्या वेदनांनी आपल्या हदयात जाऊन कधी जागा घेतली आपल्यालाही कळेनासं होतं हेच खरं!

Read More
बहारे फिर भी आयेगी 0

बहारे फिर भी आयेगी

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

गुरुदत्त, तू आपल्याबरोबर आणलेली बहार घेऊन गेलास. खरंच मित्रा, तुझी वेळच चुकली. तू वेळेआधी आलास आणि वेळेआधीच निघून गेलास…..!

Read More
मिस्टर अँड मिसेस 55 0

मिस्टर अँड मिसेस 55

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me

1955 साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर अँड मिसेस 55’ या चित्रपटाची कथा खूपच हलकीफुलकी असून अब्रार अल्वी यांनी लिहिलेली होती. यात प्रितमकुमार (गुरुदत्त) नावाचा एक कार्टुनिस्ट बेरोजगार असतो आणि त्याला पदोपदी आपल्या जॉनी नावाच्या मित्राकडून (जॉनी वॉकर) पैसे उसने घ्यावे लागत असतात. एके दिवशी त्याची भेट एका श्रीमंत घरातल्या इंग्रजाळलेल्या वातावरणात राहत असलेल्या अनिता (मधुबाला) नावाच्या तरुणीशी होते. अनितावर तिची फेमिनिस्ट आत्या – सीतादेवी (ललिता पवार) हिचा खूपच प्रभाव असतो. सीतादेवी पुरुषद्वेष्टी असते. तिच्या भावाला आपल्या बहिणीचा हा स्वभाव ठाऊक असल्यानं आपल्या मृत्यूपत्रात त्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलीनं लग्न केलं तरच त्याची संपत्ती तिला मिळेल असं तो लिहून ठेवतो. सीतादेवी एका सुसंस्कृत, शिकलेला पण गरीब असा तरूण शोधायच्या कामी लागते आणि तिला नेमका प्रितमकुमार सापडतो. ती त्याच्याबरोबर अनिताशी लग्न करण्याचा एक करार करते आणि लग्न झाल्यावर जेव्हा वाटेल तेव्हा घटस्फोट घेण्याचा अधिकारही आमचा असेल असं सांगून त्याला महिना 250 रुपये देण्याचं मान्य करते. प्रितमकुमार आणि अनिता यांचं नोंदणी पद्धतीनं लग्न होतं, मात्र अटीप्रमाणे त्यांना एकत्र राहणं तर सोडाचं पण बोलायचंही नसतं. प्रत्येक महिन्याला प्रितमकुमारकडे ठरल्याप्रमाणे 250 रुपयांचे चेक्स पोहोचत राहतात. या विचित्र लग्नाचा शेवट कसा होतो आणि काय गमतीजमती घडतात याचा अंदाज आपल्याला असला, तरी पडद्यावर हा चित्रपट बघणं हा खूपच सुखद अनुभव आहे.

Read More
वास्तवाचं भान आणि चटके देणारा – सैराट 0

वास्तवाचं भान आणि चटके देणारा – सैराट

Posted by on Nov 17, 2016 in Articles by Me, Blog

जाती-धर्माच्या भिंती कोसळून पडण्यासाठी आंतरजातीय-आंतरजातीय विवाह हे झालेच पाहिजेत हेही सैराटच्या निमित्तानं सांगावं वाटतं.

Read More
खिलते है गुल यहॉं…. किशोर कुमार-1 0

खिलते है गुल यहॉं…. किशोर कुमार-1

Posted by on Jan 13, 2016 in Articles by Me

किशोर कुमार हा माझा लहानपणापासूनच अतिशय आवडता गायक! लता मंगेशकर किंवा आशा भोसले अशा गायिकांची गाणी गुणगुणायच्या ऐवजी मी मेल सिंगरचीच त्यातही किशोरकुमारची गाणी गुणगुणायची. त्याचं ‘जीवनसे भरी तेरी आँखे’ असो, की...

Read More

कऱ्हाड – धारेवाडी -9-10 jan 2016

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Blog

९ आणि १० जानेवारी असं कऱ्हाड जवळ ९ तारखेला धारेवाडी आणि १० तारखेला सकाळी कऱ्हाड इथं कल्पना चावला विज्ञान केंद्र इथे आमचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या प्रवासाची व्यवस्था सारंग ओंक या विज्ञानवेडया तरुणानं...

Read More
कॅनव्हास – शोध सृजनाचा- समारोप 0

कॅनव्हास – शोध सृजनाचा- समारोप

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Canvas

  रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा सुरेश भट यांच्या प्रसिद्ध गझलेच्या या ओळींप्रमाणेच ‘कॅनव्हास’ या पुस्तकातल्या कलावंतांचं व्यक्तिमत्त्व होतं....

Read More
कॅनव्हास – मनोगत 0

कॅनव्हास – मनोगत

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Canvas

कला म्हणजे काय? म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अतिशय विचार करायला लावणारा गहन प्रश्‍न! खरंच, कोणतीही कला आपलं जगणं व्यापून टाकू शकते का? कला म्हणजे अगदी अंतर्मनातून स्फूरलेले सृजनात्मक विचार! कला म्हणजे तल्लीन...

Read More

लॉक ग्रिफीन

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Blog

नक्की वर्षं आठवत नाही, पण मुंबईहून पुण्याला आपल्याला ‘बाळ्या’ या मित्राबरोबर जायचं आहे असं अच्युत गोडबोले यांनी मला सांगितलं. त्याच्याबद्दल सांगताना तो आयआयटीपासूनचा मित्र असून त्यानं आयआयटीत असताना किती धमाल...

Read More

कॅम्प फायर – धुंद करणारा स्वच्छंद अनुभव!

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Blog

काही दिवसांपूर्वी बुक गंगा इंटरनॅशनलचा नव्या रुपातला उद्घाटनाचा कार्यक्रम मंदार जोगळेकर यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी कडकडीत उन्हाळा असूनही ऐन वेळी विना निमंत्रण येऊन पावसानं सगळ्यांचीच फिरकी...

Read More

नटसम्राट

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Blog

नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही सार्‍याच चांदण्यांची जगतास जाण नाही ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा पहिलाच दिवस, पहिलाच शो इ-स्क्वेअरला बघून आले. हा सिनेमा बघायला जाताना मनाशी ही गोष्ट नक्की होती, की...

Read More
हॅपी विमेन्‍स डे 2011 0

हॅपी विमेन्‍स डे 2011

Posted by on Jan 12, 2016 in Articles by Me, Blog, My Stories

स्‍टेट बँकेच्‍या पाय-या चढायच्‍या म्‍हटलं की माझी पावलं जड होतात….एक एक पाऊल हत्तीरोग झाल्‍यासारखं बँकेत जायला नकार देतो…..बाकी बँकांपेक्षा एसबीआयचा अनुभव वाईटच. सगळे कर्मचारी म्‍हणजे यंत्रासारखे...

Read More
सोबत 0

सोबत

Posted by on Jan 11, 2016 in Articles by Me, Blog, My Stories

ही नोकरी म्‍हणजे सतत फिरतीची होती…आज पुणे, उद्या मुंबई, तर परवा सांगली. इंटरव्‍ह्यूच्‍या वेळी अशी फिरतीची नोकरी ती करु शकेल ना, हाच प्रश्‍न वारंवार विचारण्‍यात आला. नंतर मला फिरतीवर नको, टेबलवर्क द्या...

Read More
डेंग्‍यू प्रवास 0

डेंग्‍यू प्रवास

Posted by on Jan 11, 2016 in Articles by Me, Blog, My Stories

1 स्‍वाईन फ्ल्‍यू ते डेंग्‍यू…. 30 ऑगस्‍टचा रविवार, विद्याताईं (बाळ) कडे अपूर्व आणि मी चार वाजता भुरभु-या पावसात पोहोचलो. आधी खूप दिवसांच्‍या साठलेल्‍या गप्‍पा फास्‍ट फॉरवर्डमध्‍ये ऐकून आणि ऐकवून...

Read More
नटसम्राट 0

नटसम्राट

Posted by on Jan 11, 2016 in Articles by Me, Blog

नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही सार्‍याच चांदण्यांची जगतास जाण नाही ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा पहिलाच दिवस, पहिलाच शो इ-स्क्वेअरला बघून आले. हा सिनेमा बघायला जाताना मनाशी ही गोष्ट नक्की होती, की...

Read More
युवा साहित्य संमेलन पारनेर, अहमदनगर – दत्ता बाळसराफ 0

युवा साहित्य संमेलन पारनेर, अहमदनगर – दत्ता बाळसराफ

Posted by on Jan 11, 2016 in Articles by Me, Blog

पारनेर, अहमदनगर इथे एक दिवसीय युवा साहित्य संमेलन महाविद्यालय आणि पत्रकार संघ यांच्या वतीनं संपन्न झालं. त्यात ‘आजचा युवक’ या विषयावर जो परिसंवाद झाला, त्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे दत्ता बाळसराफ...

Read More

एसएम जोशी हॉल-गझल कार्यक्रम

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me, Blog

मनाशी गुणगुणत होते आणि त्या वेगावर गाडीही ताल धरत धावत होती. पाऊस धारा अवखळ, अन् वार्‍याची सळसळ भिजलेल्या मातीला मृदुगंधाचा दरवळ………… हो, वैभवची ही कविता मनाशी गात मी एसएम जोशी...

Read More
कॉ. गोविंदराव पानसरे पुरस्कार- कॉ. मुक्ता मनोहर 0

कॉ. गोविंदराव पानसरे पुरस्कार- कॉ. मुक्ता मनोहर

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me, Blog

३ जून २०१५ या दिवशी पुणे महानगरपालिका युनियनचं काम करणार्‍या कॉ. मुक्ता मनोहर यांना कॉ. गोविंदराव पानसरे पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. अच्युत गोडबोले यांनी काही वर्षांपूर्वी ‘लोकायत’च्या एका कार्यक्रमात...

Read More
मी हिजडा…मी लक्ष्मी! 0

मी हिजडा…मी लक्ष्मी!

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me, Blog

‘हिजडा’ हा शब्द मोठ्यानं उच्चारणंही ज्या समाजाला नकोसं वाटतं. तो शब्द आपल्या जगण्यातला एक भाग बनवणार्‍या लक्ष्मीचं आत्मकथन म्हणजेच ‘मी हिजडा…मी लक्ष्मी!’ हे मनोविकास प्रकाशननं प्रसिद्ध केलेलं...

Read More
मसान-चित्रपट 0

मसान-चित्रपट

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me, Blog

मसान या चित्रपटात दुष्यंत कुमारची अप्रतिम गजल आहे. बस्स, आत्ताच अनुराग कश्यपचा हा चित्रपट बघितला. यात विकी कौशल, रिचा चड्ढा, श्वेता त्रिपाठी, संजय मिश्रा यांनी अतिशय ताकदीचा सहज सुंदर अभिनय केला आहे. वाराणसी...

Read More
शीख धर्माची/ गुरु नानकजींची शिकवण- काळाची गरज 0

शीख धर्माची/ गुरु नानकजींची शिकवण- काळाची गरज

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me, Blog

ब-याच दिवसांनी दोघं जीवलग मित्र भेटले. काही वेळातच त्‍यातल्‍या एका मित्रानं दुस-याच्‍या डोळ्यात धूळ टाकून त्‍याची पैशाची बॅग पळवली. पोलीस तपासानंतर हा दुसरा चोर मित्र  सापडला. तो आपल्‍या मित्राच्‍या पैशांवर...

Read More

खिलते है गुल यहॉं….

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me

किशोरकुमार हिन्दी चित्रपटसृष्टीतला एक यशस्वी पार्श्‍वगायक, कवी, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, पटकथालेखक अशा सगळ्याच क्षेत्रात त्यानं ठसा उमटवणारी मुशाफिरी केली. हिन्दीशिवाय अनेक प्रादेशिक भाषांमधून...

Read More
आवडलेली कविता : जुनी आणि नवी 0

आवडलेली कविता : जुनी आणि नवी

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me, Blog

माझ्या लहानपणी आमच्या घरात खूप पुस्तकं असायची आणि वडील चांगल्या मूडमध्ये असले की अनेक नामवंत साहित्यिक आणि कवी यांचे किस्से आणि कविता ऐकवत. त्यांच्यामुळे पुस्तकं वाचण्याची गोडी खूप लहान वयातच लागली. तिसरीत...

Read More

प्रभाकर भोसले

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me, Blog

खूप दिवसांपासून प्रभाकर भोसले यांना भेटायला जायचं होतं…..आज ती भेट झाली! अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांत मदत करताना हळूहळू त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ करायला लागले. त्यानिमितान फोटोशॉप, कोरल ड्रॉ...

Read More
सिनेमे सुलगते है अरमॉं’……अनिल विश्‍वास 0

सिनेमे सुलगते है अरमॉं’……अनिल विश्‍वास

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me

सिनेमे सुलगते है अरमॉं’ हे तलत महेमूदनं गायलेलं बैचेन करणारं गीत असो, वा ‘दूर हटो ऐ दुनियावालो’ हे प्रखर देशभक्तीपर गीत असो अनिलदांच्या संगीतस्पर्शानं त्यातलं माधुर्य वाढणारंच आहे. आज शंभर वर्ष होऊन गेली, पण...

Read More
थिंक महाराष्ट्र: एका मुसाफिराची आनंदयात्रा! 0

थिंक महाराष्ट्र: एका मुसाफिराची आनंदयात्रा!

Posted by on Jan 10, 2016 in Articles by Me

औरंगाबादला संपन्न झालेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या एका कार्यक्रमात सुमारे ८ वर्षांपूर्वी अच्युत गोडबोले या व्यक्तीची ओळख झाली आणि त्यांचा झपाटून टाकणारा उत्तुंग असा प्रवास हळूहळू माझ्यासमोर...

Read More