जिनियस संवाद

जिनियस संवाद

तारीख
-
स्थळ
औरंगाबाद

15 oct नगर आणि 16 oct औरंगाबाद असा खूप धावतपळत प्रवास झाला. अच्युत गोडबोले आणि मी लिहिलेल्या जीनियस प्रकल्पाविषयी अहमदनगरला तिथली  शाळा, उदय एजन्सीचे वाल्मिक देशपांडे आणि सर्व वर्तमानपत्रांचे पत्रकार या सगळ्यांबरोबर  खूप छान गप्पा झाल्या. किरणनं वेळात वेळ काढला. 
औरंगाबादला त्रिशूल, जयश्री आणि राधाचा आणि परीक्षितचा मस्त पाहूणचार घेत जय भवानी आणि काही शाळांच्या निमंत्रणामुळे भेटी दिल्या. सर्वच शाळा प्रमुखांचे आभार. मात्र वाकळे मॅडमनं केलेलं स्वागत कधीच विसरता येणार नाही. माझी कॉलेज मैत्रीण पाथ्रीकर भेटली आणि पुन्हा कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. कुमारवयीन मुलामुलींशी गप्पा मारायला तर मला नेहमीच आवडतं. मुलांमुलींशी बोलताना वेळ कसा गेला कळलंच नाही.
जीनियस साठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर हे अनिसचे सक्रिय कार्यकर्ते तर आहेतच पण जीनियस महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा पण त्यांनी केला आहे. या प्रवासात त्यांचा उत्साही पुढाकार होता आणि आहे. औरंगाबाद नंतर लगेच कोल्हापूर दौरा झाला. त्याबद्दल नंतर सांगेनच. पण जीनियस लिहिताना खूप मजा आली आणि आता जीनियसविषयी शेकडो/हजारो मुलांशी संवाद साधताना खूप आनंद मिळतो आहे.

दीपा देशमुख 

कार्यक्रमाचे फोटो