गीता भावसार 

गीता भावसार 

My dear friend, philosopher and guide and much more....नावाप्रमाणेच दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशवाट दाखवणार्या, उणंपुरं वर्ष झालं असेल प्रत्यक्ष भेटून...आधी फक्त तुमच्या लेखनातून भेट ....पण असे वाटते की कायमचे मैत्र आहे तुमच्याशी.....जेव्हा जेव्हा आपण भेटतो ....किती निरनिराळ्या विषयांवर चर्चा होते.....प्रत्येक भेटीत नवे काही तरी घेऊन येते मी....
मनातली कोणतीही गोष्ट तुमच्या पाशी मोकळी करता येते.....आणि त्यावरचे solution सुद्धा मिळते....एकच व्यक्ती इतकी सर्व गुणसंपन्न कशी असू शकते?याचे आश्चर्य वाटत राहते  तुमच्याकडे पाहून.....पाककलेपासून  ते चित्रकला,मानसशास्त्र, संगीत....या सगळ्या गोष्टीतली तुमची experty कमाल आहे.....कुठल्याही परिस्थिती किंवा व्यक्ती कडे कसे positively पहावे आणि चांगल्या च गोष्टी कशा शिकाव्यात हे तुमच्या कडून शिकण्यासारखे आहे.....आपली अत्यंत आवडती वस्तू सुद्धा सहज देऊन टाकण्याची तुमची व्रुत्ती स्तिमित करते....आजसुद्धा शुभेच्छा द्यायला आल्यावर gift तुमच्या कडून मिळाले....

पुस्तकं आणि साडी खरेदीला प्रोत्साहन देणार्या (यांच्या choice ला तोड नसते), सकारात्मक विचार करायला शिकवणार्या,अत्यंत संयमाने समोरच्याच्या चुकांत सुधारणा करणार्या ,सगळ्या गोष्टी तल्या व्यवस्थितपणात टोक गाठलेल्या......अष्टपैलू,दिलदार, हसतमुख, मनमोकळ्या,उत्कृष्ट लेखिका,मुलांची आवडती मावशी, अपूर्वची लाडकी ममा, आमच्या आदर्श दीपाताई.......केव्हाही भेट झाली तरी एक खाऊ आणि गिफ्टसची भरलेली पिशवी यांच्या कडे तयार असते द्रौपदीच्या अक्षय पात्रासारखी....कोणतीही गोष्ट आपलेपणाने ,सहज समोरच्याला देण्यात त्यांचा हातखंडा आहे.मागे एकदा टी.वी .खराब झाला तेव्हा मल्हार खूप सहजतेने म्हणाला.... "दीपामावशीला सांग मल्हार चा टी.वी. खराब झालाय ती लगेच आणून देईल"  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला माणूस....
तुमच्या कडून आणखी खूप खूप गोष्टी शिकायला मिळोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास आयुरारोग्य लाभो....आणि नवनवीन विषयावरच्या लेखनाची मेजवानी मिळत राहो.
गीता भावसार