आसावरी कुलकर्णी

आसावरी कुलकर्णी

प्रिय दीपा तुस्सी ग्रेट हो!!! आज कॅनव्हास खऱ्या अर्थाने वाचून पूर्ण झालाय. माझ्यासाठी ही अलीबाबाच्या गुहेची सफर होती. प्रत्येक पानागणिक एक नवा खजिना समोर येत गेला. यातल्या लिओनार्डो दा व्हिंची, व्हान गॉग आणि पिकासो यांची फक्त तोंडओळख होती. बाकी सगळेच मला नवीन होते (हा हन्त हन्त ! या ऐश्वर्याच्या बाबतीत किती करावी खंत?) पण कॅनव्हासने या सगळ्यांना माझे फॅमिली मेंबर करून टाकलंय. हे सगळंच विश्व माझ्यासाठी नवीन होतं आणि म्हणूनच पूर्ण समाधान झाल्याशिवाय पुढे जायचं नाही हे पुस्तक वाचताना मनाशी पक्कं ठरवलं होतं. 
आज आत्ता पुस्तक पूर्ण वाचून झालंय. आणि तू कृताज्ञभाव व्यक्त करताना माझा उल्लेख केला आहेस. It was the cherry on the top for me! (माझं नाव अजरामर झाल्याचा फील आला!!!) मी कुठलंही पुस्तक वाचताना आधी पूर्ण कंटेंट वाचते. म्हणजे आपण मनाची कोरी पाटी ठेवून वाचतोय असं मला वाटतं. मनोगत, अभिप्राय, प्रस्तावना हे सगळ आधी वाचलं की आपलं वाचन थोडं बायस्ड होतं असं मला वाटतं. त्यामुळेच हे सगळं पुस्तक वाचून झाल्यावर वाचायला मला आवडतं.
दीपा, तुम्ही या सर्व झपाटलेल्या वेड्या व्यक्तिमत्वांचा केलेला गाढा अभ्यास मनाला भिडला. कॅनव्हास हा माझ्यासाठी खूप समृध्द करणारा अनुभव ठरला. थोडक्यात माझा हा प्रवास सुफल आणि संपूर्ण झालाय. waiting for more enriching experiences in future. Proud to be your friend dear. Hats off to Achyut and Deepa, both of you. "The Creators of CANVAS"
आसावरी कुलकर्णी