शशांक

शशांक

अनेक महान चित्रकार,शिल्पकारांविषयी रंजक माहिती असणारे 'कॅनव्हास ' वाचल्यानंतर दीपा देशमुख या लेखिकेचा फॅन झालो होतो.अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी संयुक्तपणे लिहिलंय हे पुस्तक.नंतर परदेशी संगीतकारांवरील 'सिंफनी', भारतीय जिनियस,आमचे सुपरहिरो,तंत्रज्ञ जिनीयस वाचल्यानंतर लेखिकेला भेटण्याची इच्छा वाढली होती.

फेसबुकवरचा संवाद सुरु होताच.परवाच वैभव जोशींची 'उभा जन्म कैदेत काढेन मी,तुझ्यासारखा पिंजरा पाहिजे' हि कविता फेसबुकवर शेअर केल्यानंतर ती नेमकी जोशींच्या वैभवची कविता आहे की देशमुखांच्या वैभवने लिहिली आहे यावरुन आमचा संवादही झाला होता. फार अभ्यासपुर्ण बोलणार्‍या,लिहिणार्‍या दीपाजी तितक्याच हसतमुख,नम्र आहेत !