Movie Reviews

काजव्यांचा गाव

काजव्यांचा गाव

धनंजयच्या आग्रहानुसार नुकतंच प्रदीप वैद्य लिखित, दिग्दर्शित ‘काजव्यांचा गाव’ हे नाटक सुदर्शनला बघितलं. ‘काजव्यांचा गाव’ हे इर्मसिव्ह थिएटर प्रकारातलं नाटक. अशा नाटकांमध्ये स्टेज वेगळं आणि प्रेक्षक वेगळे असे भाग नसतात. सगळं काही एकमेकांत मिसळून गेलेलं असतं. प्रेक्षकांमध्येच नाटक घडतं म्हणा, किंवा प्रेक्षकच नाटकाचा एक भाग बनतात असं म्हणा. 

नाटक बघताना महेश एलकुंचवारांच्या 'वाडा चिरेबंदी'ची आठवण येत होती. नाटक संपल्यावर प्रदीप वैद्य आणि इतर सर्व कलाकारांना भेटलो आणि मनात लुकलुकणार्‍या असंख्य काजव्यांना बरोबर घेऊन अपूर्व आणि मी घरी परतलो. 

दीपा देशमुख, पुणे. पुढे वाचा

अव्यक्त प्रेमाची तिसरी कसम!

अव्यक्त प्रेमाची तिसरी कसम!

लहानपणी कधीतरी बघितलेला, त्या वेळी न समजलेला ‘तिसरी कसम’ हा चित्रपट आज पुन्हा बघितला. सध्या फणीश्वरनाथ रेणू या साहित्यिकाचा अभ्यास करताना त्यांच्या ‘मारे गये गुलफाम’ या साहित्यकृतीवर आधारित 'तिसरी कसम' चित्रपट बनवलेला असल्यानं तो बघण्याचा मोह झाला. हा चित्रपट विख्यात गीतकार शैलेंद्र यांनी १९६६ साली निर्माण केला होता. बासू भट्टाचार्य यांचं दिग्दर्शन होतं. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपती पुरस्कारानं, राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं. मात्र तिकीट खिडकीवर हा चित्रपट दणकून आपटला. खरं तर यात राजकपूर आणि वहिदा रहेमान हे त्या वेळचे लोकप्रिय कलाकार होते.  पुढे वाचा