Movie Reviews

अरे गा रे मेरे संग मेरे साजना…… 0

अरे गा रे मेरे संग मेरे साजना……

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews, Vyakti Chitra

अरे गा रे मेरे संग मेरे साजना…… मला तो नेमका कधी आवडायला लागला माहीत नाही. पण जेव्हा त्याला बघितलं तेव्हा तो परका कधी वाटलाच नाही. अतुट विश्‍वासाचं नातं त्याच्याशी जोडलं गेलं. माझा मित्र असेल...

Read More
माकड 0

माकड

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

माकड काल रात्री ‘माकड’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यगृहात संपन्न झाला. धनू (धनंजय सरदेशपांडे) माझा अकरावीत असल्यापासूनचा मित्र! आम्ही नाटकांत एकत्रित कामं केली, एकमेकांच्या...

Read More
झिपर्‍या – सुन्न करणारा एक अनुभव! 0

झिपर्‍या – सुन्न करणारा एक अनुभव!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

झिपर्‍या – सुन्न करणारा एक अनुभव! ‘झिपर्‍या’ चित्रपट सुरू झाला आणि आपण ‘दिवार’, ‘जंजिर’ वगैरेसारखा एखादा हिंदी चित्रपट तर बघत नाही ना असा मनात विचार चमकून गेला. समोरच्या पडद्यावर...

Read More
मंत्र – प्रीमियर शो – city pride, kothrud 0

मंत्र – प्रीमियर शो – city pride, kothrud

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Articles by Others, Blog, Movie Reviews

मंत्र – प्रीमियर शो – city pride, kothrud मंत्र हा चित्रपट रविवारी बघितला. सौरभ गोगटे हा आयटी मधला तरुण एके दिवशी सगळं सोडून चक्क मुंबईत अभिनय करण्यासाठी पोचला. त्याची दिल्या घरी तू सुखी राहा ही...

Read More
आपला मानूस! 0

आपला मानूस!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Articles by Others, Blog, Movie Reviews

आपला मानूस! ‘आपला मानूस’ आपल्या माणसांबरोबर बघितला. ‘आपला मानूस’ हा अजय देवगण निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘काटकोन त्रिकोण’ या डॉ. विवेक बेळे लिखित...

Read More
फिश करी 0

फिश करी

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

फिश करी काल रात्री नेटफ्लिक्सवर सहा महिन्यांपूर्वी (ऑगस्ट २०१७) प्रदर्शित झालेला ‘फिश करी’ हा बंगाली चित्रपट बघितला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या सगळ्या आघाड्या प्रतीम गुप्ता यानं...

Read More
आमच्या प्रतिमाच्या – आम्ही दोघी!!! 0

आमच्या प्रतिमाच्या – आम्ही दोघी!!!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

आम्ही दोघी गौरी देशपांडे हे नाव स्वतःचं अस्तित्व आणि स्वातंत्र्य जपू पाहणार्‍या प्रत्येक स्त्रीच्या मनात ठसलेलं आहे. गौरी खरंच प्रत्येकीच्या मनामनात जाऊन बसलेली आहे. तिच्या ‘पाऊस आला मोठा’ या कथेवर आधारित...

Read More
पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनंथम! 0

पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनंथम!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनंथम! भारतातल्या तामिळनाडू राज्यातल्या कोईम्बतुरमधल्या अरुणाचल मुरुगनंथम या तरुणानं भारतातले २३ राज्यात आणि १०६ देशांमध्ये आपली सॅनिटरी पॅड बनवण्याची मशीन तयार केली आणि पोहोचवली आणि अतिशय...

Read More
न्यूड सिनेमा – ना भिडणारा, ना सुन्न करणारा 0

न्यूड सिनेमा – ना भिडणारा, ना सुन्न करणारा

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

न्यूड सिनेमा – ना भिडणारा, ना सुन्न करणारा न्यूड चित्रपटाबद्दल बरंच काही ऐकलं होतं. त्यामुळे काल आसावरी आणि मी हा चित्रपट बघितला. चित्रपटगृहात मोजून २० प्रेक्षक! हरकत नाही, दर्दी प्रेक्षक कमीच असतात अशी...

Read More
थिएटर फ्लेमिंगो आणि ओझं!!! 0

थिएटर फ्लेमिंगो आणि ओझं!!!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Book Reviews, Events, Movie Reviews

थिएटर फ्लेमिंगो आणि ओझं!!! मिणमिणता दिवा…..कधी विझेल तो त्याचा नेम नाही……..दहा बाय दहाची खोली आणि त्या खोलीत एका कोपर्‍यात बसलेला साध्याशा कपड्यातला तरूण….बहुतेक हा गावाकडला...

Read More
कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे। – एक तरोताजा अनुभव! 0

कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे। – एक तरोताजा अनुभव!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Events, Movie Reviews

कारवां गुज़र गया, गुबार देखते रहे। – एक तरोताजा अनुभव! मी होकार दिला होता, एक नवा अनुभव घेण्यासाठी! त्याप्रमाणे मला सकाळी सकाळी एक फोन आला. मला सायंकाळी साडेसात वाजता सनसिटीतल्या ‘गार्डन इन’...

Read More
तीन पैशांचा तमाशा 0

तीन पैशांचा तमाशा

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Events, Movie Reviews

तीन पैशांचा तमाशा २५ जून १९७८ या दिवशी म्हणजे बरोबर ४० वर्षांपूर्वी बालगंधर्वला ‘तीन पैशांचा तमाशा’ हे पुलंचं नाटक झालं होतं. हे नाटक बघण्यासाठी नगरहून स्वागत थोरात Swagat Thorat नावाचा एक...

Read More
तीन पैशांचा तमाशा – नाटकाची प्रॅक्टिस! 0

तीन पैशांचा तमाशा – नाटकाची प्रॅक्टिस!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

तीन पैशांचा तमाशा – नाटकाची प्रॅक्टिस! जोनाथन स्विफ्ट याच्या संकल्पनेतून १७२८ साली जॉन गे यानं ‘बेगर्स ऑपेरा’ सादर केला आणि त्या काळात धमाल उडवून दिली होती. त्यानंतर ३०० वर्षांच्या...

Read More
हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा – एक थरार !!! 0

हॅस अर्नेस्टो टॅग गव्हेरा – एक थरार !!!

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Events, Movie Reviews

चे गव्हेरा एक वादळ, एक बेभान व्यक्तिमत्व, एक प्रेरणा, एक बंडखोरी….असं काही म्हटलं की समोर येतो मिलिटरीचा युनिफॉर्म चढवलेला, ओठात चिरूट शिलगवलेला, बेदरकार चेहर्‍याचा तो – हो तोच तो ‘चे...

Read More
सिनेमा सिनेमा 0

सिनेमा सिनेमा

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

सिनेमा सिनेमा या दोन दिवसांत पाच चित्रपट बघितले. त्यातले दोन मराठी होते. पहिला तेजस देओस्कर दिग्दर्शित ‘अजिंक्य’! यात संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शासकीय नोकरीत असलेला आणि...

Read More
डोर 0

डोर

Posted by on Apr 15, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

डोर रिश्ते भरोसे चाहत यकीन उन सब का दामन अब चाक है समझे थे हातों मे है जमीन मूठ्ठी जो खोली बस खाक है दिल मे ये शोर है क्यूँ इमान कमजोर है क्यूँ नाजूक ये डोर है क्यूँ केसरियॉं बालम हे गाणं कुठेही लागलं की...

Read More
हाफ तिकीट 1

हाफ तिकीट

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

हाफ तिकीट झोपडपट्टीतली दोन भावंडं, एकाचं वय आठ वर्षं आणि दुसर्‍याचं पाच ते सहा…..वडिलांना कुठल्याशा कारणानं तुरुंगवासात जावं लागलंय आणि यामुलांची आई दिवसभर शिलाईकाम करून पैसे कमवतेय आणि नवर्‍याला...

Read More
गुलाबजाम 0

गुलाबजाम

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

गुलाबजाम मध्यंतरी ‘फिश करी’ हा बंगाली चित्रपट बघितला होता आणि खूप आवडलाही होता. त्यानंतरचे दिवस प्रवास आणि काम यात कसे गेले कळलंच नाही. आज अपूर्वने ‘गुलाबजाम’ लावून दिला. मी हळूहळू त्यात गुंतत गेले. कथानकाचा...

Read More
मंटो 0

मंटो

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

मंटो हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद चिखते चिल्लाते नारोंके बिच कई सवाल थे मै किसे अपना मुल्क कहूँ, लोग धडाधड क्यों मर रहे थे इन सब सवालोंके मुख्तलिफ जवाब थे एक हिंदुस्थानी जवाब, एक पाकिस्तानी जवाब एक...

Read More
टेक केअर गूड नाईट 0

टेक केअर गूड नाईट

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

टेक केअर गूड नाईट अ‍ॅमेझॉन प्राईमवर आत्ताच ‘टेक केअर गूड नाईट’ हा ७ ऑक्टोबर २०१८ या दिवशी प्रदर्शित झालेला चित्रपट बघितला. सायबर क्राईमचं प्रमाण कशा रीतीनं वाढतं आहे आणि त्याच्याविरुद्ध लढायचं असेल तर...

Read More
काजव्यांचा गाव 0

काजव्यांचा गाव

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

काजव्यांचा गाव धनंजयच्या  आग्रहानुसार नुकतंच प्रदीप वैद्य लिखित, दिग्दर्शित ‘काजव्यांचा गाव’ हे नाटक सुदर्शनला बघितलं.‘काजव्यांचा गाव’ हे इर्मसिव्ह थिएटर प्रकारातलं नाटक. अशा नाटकांमध्ये स्टेज वेगळं आणि...

Read More
नाळ – हे दरवयतं !!!  0

नाळ – हे दरवयतं !!! 

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

नाळ – हे दरवयतं !!! नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज निर्मित ‘नाळ’ प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले. ‘आई मला खेलायला जायचंय, जाऊ दे ना वं’ हे गाणं सध्या सगळेच गुणगुणताहेत. त्यातच वैभवचं (वैभव...

Read More
महेशिंते प्रथिकारम 0

महेशिंते प्रथिकारम

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews, Reviews

महेशिंते प्रथिकारम राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘महेशिंते प्रथिकारम’ हा २०१६ साली प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट काल रात्री फेसबुक दोस्त डॉ. प्रशांत पाटील यांच्या आग्रहामुळे बघितला. या चित्रपटाची...

Read More
अस्तु….असो…..! 0

अस्तु….असो…..!

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

अस्तु….असो…..! आत्ताच डॉ. मोहन आगाशे निर्मित ‘अस्तु’ बघितला. बघायला जरा उशीरच झाला हेही लक्षात आलं…..पण झाला खरं उशीर! सुमित्रा भावेंची कथा, पटकथा आणि सुमित्रा भावे आणि सुनील...

Read More
संगीत देवबाभळी 0

संगीत देवबाभळी

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Events, Movie Reviews

संगीत देवबाभळी आसावरीनं तिच्या कुटुंबीयांसोबत ‘देवबाभळी’ या नाटकाचं माझंही तिकिट काढलं आणि मी काल बालगंधर्वला नाटक बघण्यासाठी पोहोचले. नाटकाचा विषय काय, त्यातले कलाकार कोण काहीच ठाऊक नव्हतं. हे एक संगीत नाटक...

Read More
एक्स्पायरी डेट- व्यक्ती आणि ड्रामालय 0

एक्स्पायरी डेट- व्यक्ती आणि ड्रामालय

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Events, Movie Reviews

एक्स्पायरी डेट- व्यक्ती आणि ड्रामालय २०१९ च्या नववर्षात बाणेर इथं ‘ड्रामालय’ नावाचं कलादालन सुरू झालंय आणि हे सुरू करणारा धाडसी तरूण आहे संजय मोरे ठाकूर! बालाजी सुतार यांच्या सध्या गाजत असलेल्या...

Read More
गजेंद्र अहिरेचा डिअर मोली!!! 0

गजेंद्र अहिरेचा डिअर मोली!!!

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

डिअर मोली सभोवताली सर्वत्र कोवळं पोपटी ताजं गवत….समोर पहुडलेला शांत जलाशय….पाण्याचे तरंग देखील आपला आवाज येणार नाही ना याची काळजी घेत असावेत, असं शांत, निःशब्द वातावरण आणि त्या चित्रातलाच एक भाग...

Read More
फायरब्रँड 0

फायरब्रँड

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews, Reviews

फायरब्रँड आजच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला प्रियंका चोप्रा निर्मित ‘फायरब्रँड’ हा चित्रपट बघितला. कौटुंबिक न्यायालय….सुनंदा नावाची वकील...स्त्रियांना न्याय मिळवून देण्यात नेहमीच यश...

Read More
सर, तुम्ही गुरुजी व्हा! – त्र्यंबक वडसकर 0

सर, तुम्ही गुरुजी व्हा! – त्र्यंबक वडसकर

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Book Reviews, Events, Movie Reviews, Reviews

सर, तुम्ही गुरुजी व्हा! १६ मार्च २०१९ ला सकाळी ९ वाजता रेल्वेनं मी आणि धनू (धनंजय सरदेशपांडे) परभणीच्या रेल्वेस्थानकावर पोहोचलो. आम्हाला घेण्यासाठी त्र्यंबक वडसकर, नागेश आणि परभणी वेधचे संयोजक श्री मधुकर...

Read More
बदला! 0

बदला!

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

बदला! 8 मार्च 2019 या दिवशी गौरी खान आणि शाहरूख खान निर्मित बदला हा ओरिओल पाऊलो लिखित आणि दिग्दर्शित इनव्हिजिबल गेस्ट या स्पॅनिश चित्रपटावर आधारित रहस्यमय, थरारक चित्रपट प्रदर्शित झाला आणि बघू बघू म्हणता...

Read More
समाजस्वास्थ्य – 0

समाजस्वास्थ्य –

Posted by on Apr 14, 2019 in Articles by Me, Blog, Movie Reviews

समाजस्वास्थ्य – ९ एप्रिल २०१७, रविवार. २९ मार्चपासून शारीरिक स्वास्थ्य हरवलेली मी….कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहीये. पण जमेल तशी, जमेल त्या विषयानुसार करण्याचा हा प्रयत्न….! २९ मार्चपासून...

Read More
फोबिया 0

फोबिया

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

राधिका आपटे हिची प्रमुख भूमिका असलेला ‘फोबिया’ हा चित्रपट नुकताच बघितला. मानसिक विकारावर आधारित असलेला हा चित्रपट अतिशय सुरेख असून राधिका आपटे हिनं अप्रतिम अभिनय केला आहे. पवन कृपलानी दिग्दर्शित हा चित्रपट २७ मे २०१६ या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सायकॉलॉजिकल थ्रिलर असं म्हणता येईल. काही जण या चित्रपटाची तुलना राम गोपाल वर्माच्या ‘कौन’ या चित्रपटाशी करतात. पण ‘कौन’ मध्ये चित्रपटातून नेमका प्रश्‍न लक्षात येण्याऐवजी उर्मिला मातोंडकरचं दिसणंच केवळ लक्षात राहिलं होतं. इथं मात्र तसं होत नाही. दिग्दर्शकाची प्रचंड मेहनत आणि राधिका आपटेनं अतिशय समजून केलेली भूमिका या चित्रपटात जाणवते.

Read More
बरेली की बर्फी 0

बरेली की बर्फी

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

आयुष्यमान खुराणा आणि राजकुमार राव दोघंही उत्तम अभिनय करणारे गुणी अभिनेते! याच महिन्यात त्यांचा ‘बरेली की बर्फी’ प्रदर्शित झालाय. ‘दम लगा के हैशा’मधलं कौटुंबिक वातावरण आणि ‘क्वीन’, ‘तन्नू वेड्स मन्नू’ या चित्रपटातली कंगना राणावतची व्यक्तिरेखा असा मालमसाला वापरून किंवा उचलेगिरी करून ‘बरेली की बर्फी’ चित्रपट तयार झालाय. कथेत काहीही नावीन्य नाही, मैत्रीची स्वार्थी व्याख्या, हसू येणार नाही असे विनोद….चित्रपटाच्या शेवटी अचानक त्याग, निस्वार्थीपण आठवून केलेला शेवट…..! ज्यांना चित्रपटगृहात जाऊन पैसे घालवण्याची हौस असेल, त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा.

Read More
ट्रॅप्ड 0

ट्रॅप्ड

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

‘ट्रॅप्ड’ हा संपूर्ण चित्रपट शौर्य या एकाच व्यक्तिरेखेभोवती फिरतो. चित्रपटाचं कथानक खूप वेगळं आहे. मुंबईत एकाच ऑफीसमध्ये काम करत असलेले शौर्य आणि नुरी एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण तिचं लग्न आधीच ठरल्याचं कळताच शौर्य तिला आपण एका दिवसांत घर मिळवून आपण लगेच लग्न करू असं आश्‍वासन देतो. ती त्याला होकार देते. शौर्य धडपड करत एका एजंटकडून ‘स्वर्ग’ नावाच्या अनेक मजली इमारतीत एक फ्लॅट त्याच्या बजेटमध्ये मिळवतो. एक छोटीशी बॅग घेऊन त्या फ्लॅटमध्ये राहायला येतो. त्या इमारतीतले बहुतांश सगळेच फ्लॅट्स काही कायदेशीर बाबींमुळे रिकामे असतात. त्या इमारतीच्या रखवालदाराला ऐकायला अतिशय कमी येत असतं.
सकाळी नुरीला भेटण्यासाठी (लग्न करण्यासाठी…अन्यथा तिला ट्रेन पकडून लग्नासाठी तिच्या गावी जावं लागणार असतं.) पटकन तयार व्हायला लागतो. तेव्हा त्या घरात लाईट नाही आणि पाणीही नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. तसाच गडबडीत निघतो आणि मोबाईल घरातच राहिलाय म्हणून तो बेडरूममध्ये वळतो. नुरीचा फोन असतो, ती त्याची वाट बघत असते. ‘आपण निघालोच’ असं सांगून तो निघतो पण त्या धावपळीत मुख्य दाराची चावी दारालाच बाहेर राहते आणि दार लॉक होतं.
इथूनच सगळा थरार सुरू होतो.

Read More
मि. अँड मिसेस अय्यर 0

मि. अँड मिसेस अय्यर

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

लिखाण असो, चित्रपट-नाटक माध्यम असो, संगीत असो, चित्र-शिल्पकला असो, या सगळ्या माध्यमांमधून माणसातल्या माणुसपणाचा संदेश सतत बिंबवला पाहिजे. या अस्वस्थतेतून काल रात्री ११.३० वाजता यू-ट्यूबवर ‘मि. अँड मिसेस अय्यर’ हा चित्रपट बघितला. एक उत्कृष्ट चित्रपट बघितल्यावर चित्रपटाचा गाभा, त्यातली व्यक्त-अव्यक्त भाषा, त्यातले कलाकार, त्यातलं संगीत, चित्रपटाचं दिग्दर्शन सगळं काही एकरूप, एकजीव झाल्याचं समाधान मिळालं.
ऑस्कर विजेते, भारतरत्न सन्मानित सत्यजीत रे या असामान्य दिग्दर्शकाच्या हाताखाली तयार झालेल्या अपर्णा सेन हिचा हा चित्रपट! अपर्णा सेन हिनं बंगाली, हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलाच, पण तिचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजले. तिच्या प्रत्येक चित्रपटानं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिकं पटकावली.

Read More
मनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’ 0

मनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

माझी पिढी आताच्या पिढीशी कशी जोडून आहे हे तर या मुरांब्यात दिसतंच, पण आताच्या मुलांचे प्रश्‍न, त्यांची नाती, कामाच्या संधी आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, त्यात स्वतःचे अहंकार, बदलत्या काळानुसार लिंगभेद न करता, समानता मानत असतानाही स्त्रीचं आपल्यापेक्षा वरचढ असणं न रुचणं, आम्ही खूप बेफिकीर आहोत, आम्हाला कशाचंच काही वाटत नाही असा आव आणणारी पण मनातून हादरलेली तरुणाई, स्वतःलाच ‘स्व’ न सापडणं, गोंधळलेल्या मनाची चलबिचल हे सारं सारं वरूण नार्वेकर या दिग्दर्शकानं अचूक टिपलंय. कथा, पटकथा आणि संवाद हे सगळं त्याचंच! अप्रतिम! आणि त्याला सचिन खेडेकर, चिन्मयी सुर्वे, अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांनी सुरेल साथ दिलीये.
आलोक देशमुख (अमेय वाघ) या तरूणाचा इंदूबरोबर झालेला ब्रेकअप पासून या चित्रपटाचं कथानक वेग घेऊ लागतं. खरं तर वेग हा शब्द योग्य नाहीच इथं. छानपैकी घोळवत घोळवत हे कथानक हळुवारपणे पुढे सरकतं.

Read More
अनुपमा 0

अनुपमा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

हृषिकेश मुखर्जींचा ‘अनुपमा’ हा चित्रपट १९६६ या वर्षी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला राष्ट्रीय रजत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सत्यकाम, चुपके चुपके, आनंद, अभिमान, गुड्डी, गोलमाल, आशीर्वाद, बावर्ची, किसी से ना कहना, नमक हराम सारखे एकसे एक चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी प्रेक्षकांना दिले. त्यानी जवळजवळ ४२ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. हृषिकेश मुखर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन पदवी प्राप्त केली. त्यांनी काही काळ गणित आणि विज्ञान हे विषयही शिकवले. एक कॅमेरामन म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर काही काळ फिल्म एडिटिंगचं काम केलं. तसंच बिमल रॉय यांच्या हाताखालीही त्यांनी काम केलं. अनुपमा हा चित्रपट बिमल रॉय यांनाच समर्पित करण्यात आला आहे. भारत सरकारनं त्यांना ‘पद्मविभुषण’ आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवलं.
‘सत्यकाम’मध्ये जसा धर्मेंद्र आवडला, तसाच तो ‘अनुपमा’मध्येही तितकाच भावला. अगदी प्रेमातच पडले त्याच्या. दिसायला देखणा, कवी मनाचा, स्वाभिमानी, मूल्यं जपत जगणारा, कुठल्याही मुलीच्या हृदयात प्रेमाचे अंकुर फुलवू शकेल असा……!

Read More
अनुभव 0

अनुभव

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुभव’ या संजीवकुमार आणि तनुजा यांच्या भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटातलं हे गाणं मला इतकं आवडतं, इतकं आवडतं की ऐकल्यानंतर अनेक दिवस त्या गाण्यातून बाहेरच येता येत नाही. गीता दत्तचा मधाळ आवाज वेडं करतो, धुंद करतो, आस लावतो……केवळ या गाण्यासाठीच आज पुन्हा एकदा ‘अनुभव’ बघितला. निर्मिती, पटकथा, दिग्दर्शक सबकुछ बासू भट्टाचार्य यांच्या या चित्रपटानं राष्ट्रीय चित्रपटांचा सर्वश्रेष्ठ पुरस्कारही त्या वेळी मिळवला. हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. यातली अतिशय सुंदर गाणी गुलजारनं लिहिली तर कनू रॉय यांचं खूपच अनोखं संगीत यातल्या गाण्यांना लाभलं. ही गाणी मन्नाडे (फिर कोई फूल खिला) आणि मुझे जाँ न कहो मेरी जान (गीता दत्त) यांनी गायिली म्हणजे चार चॉंदच लागले की!

Read More
सत्यकाम 0

सत्यकाम

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Blog, Movie Reviews

सत्यकाम!
हृषिकेश मुखर्जींनी दिग्दर्शित केलेला १९६९ साली प्रदर्शित झालेला अतिशय उत्कृष्ट कथानक असलेला हा चित्रपट! या चित्रपटातली धर्मेंद्रची भूमिका त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतली अप्रतिम भूमिका! या चित्रपटात धर्मेंद्र, संजीवकुमार, शर्मिला टागोर, अशोक कुमार, डेव्हिड, असरानी, बेबी सारिका यांच्या भूमिका आहेत. नारायण सान्याल यांच्या ‘सत्यकाम’ नावाच्याच कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला होता. १९६६ साली धर्मेद्र आणि शर्मिला टागोर यांच्या जोडगोळीचा ‘अनुपमा’ हा चित्रपट खूपच गाजला होता. त्यामुळे हीच जोडी पुन्हा सत्यकामसाठी निवडण्यात आली. ‘आनंद’, ‘बावर्ची’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘खुबसुरत’ असे अनेक चित्रपट काढणार्‍या हृषिकेष मुखर्जींना मात्र ‘सत्यकाम’ हा त्यांचा आवडता चित्रपट वाटत असे. या चित्रपटानं राष्ट्रीय स्तरावरती अनेक पुरस्कार मिळवले. यातली गीतं कैफी आझमी यांनी लिहिली. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. संजीवकुमारसह सर्वांचाच अभिनय ‘वा’ असाच!
‘सत्यकाम’चं कथानक इतकं अप्रतिम आहे की त्याला चांगल्या दिग्दर्शनाची, चांगल्या अभिनेत्यांची गरजच पडू नये. अर्थात चांगला दिग्दर्शक चांगल्या कथानकाला कसा न्याय देऊ शकतो यासाठी हा चित्रपट जरूर बघायलाच हवा. पडद्यावर सुरुवातीलाच महात्मा गांधींचं वाक्य बघायला मिळतं. गांधीजी म्हणत, ‘सत्य आणि प्रेम या दोन गोष्टीच माझ्यासाठी परमेश्‍वरासमान आहेत’. आणि ‘सत्यकाम’ ही गोष्टही विवेक, निर्भयता, सत्य, प्रेम यांची गोष्ट!

Read More
लॉयन 0

लॉयन

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

गार्थ डेव्हिस दिग्दर्शित ‘लॉयन’ बघितला. चक्क खंडवा, कोलकता, भारत ही सगळी दृश्यं पाहून चित्रपट ऑस्ट्रेलियन आहे का हिंदी हेच क्षणभर कळेनासं झालं. सुरुवातीपासूनच चित्रपटानं पकड घेतली. कथानक, दृश्यं, पात्रं, परिस्थिती सगळ्यांनी मनाचा ताबा घेतला…..आजही शहराशहरांमधल्या फूटपाथवर झोपणारी माणसं, रस्त्यावर भीक मागत फिरणारी, बालपण हरवलेली शेकडो/हजारो मुलं, माणसाच्या रुपात असलेली जनावरं सगळं बघून मनाचं आक्रंदन सुरू झालं. डोळ्यातून अश्रू न जुमानता बाहेर पडू लागले.

Read More
ऑस्करच्या प्रतीक्षेत -‘अरायव्हल’ 0

ऑस्करच्या प्रतीक्षेत -‘अरायव्हल’

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

ऑस्करसाठी ८ नामांकनं मिळवलेला आणि टेड चिआंग या विज्ञान लेखकानं लिहिलेल्या ‘स्टोरी ऑफ युवर लाईफ’ या अतिशय गाजलेल्या कादंबरीवरचा ‘अरायव्हल’ हा ५ महिन्यांपूर्वी ्प्रदर्शित झालेला चित्रपट आज बघायचाच असं ठरवलं आणि बघितला. या चित्रपटात अॅमी अॅडम्स आणि जेरेमी रेनर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे एक सायन्स फिक्शन आहे. पृथ्वीवर परग्रहवासीयांचं आगमन, त्या घटना आणि नायिकेच्या आयुष्यातल्या घटना क्रमसुसंगत नाहीत, त्या का नाहीत, वेळ याकडे आपण कसे बघतो आणि परग्रहवासी कसे बघतात, परग्रहवासी आणि मानव यांच्यातला संवाद अशा अनेक गोष्टीचा उहापोह या चित्रपटात केलाय.
चित्रपट संपल्यावर काही वेळ त्या चित्रपटाचा अर्थ लावण्यात गेला. डोक्याला ताण द्यावा लागला. इन्टर्नसारखा हा चित्रपट साधा, सरळ, सहजपणे उलगडेल असा नव्हता.

Read More
इन्टर्न 0

इन्टर्न

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

रॉबर्ट डिनेरो हा अतिशय लोकप्रिय असलेला अभिनेता – त्यानं ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या १९७६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात धूम मचवली होती. अतिशय सहजसुंदर अभिनय हे त्याचं वैशिष्ट्य! त्याची मुख्य भूमिका असलेला 2015 साली प्रदर्शित झालेला ‘इन्टर्न’ हा चित्रपट नुकताच बघितला. ‘अनुभव कधीच जुना होत नाही’ हे या चित्रपटाचं मुख्य सूत्र!

Read More
आमीर खानचा बहुचर्चित ‘दंगल’!!!! 0

आमीर खानचा बहुचर्चित ‘दंगल’!!!!

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

आमीर खानचा सत्य घटनेवर आधारित बहुचर्चित ‘दंगल’ हा चित्रपट अखेर आज ई-स्क्वेअर इथं अपूर्वसह बघितला. हरियाणा राज्यातल्या एका छोट्याशा गावातल्या महावीर सिंह फोगाट यानं आपल्या मुलींना आंतराष्ट्रीय स्तरावर रेसलिंगमध्ये (पहेलवान) सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या मुलींचे परिश्रम या चित्रपटात चित्रित केले आहेत. ‘लगान’, ‘चक दे इंडिया’ याच पठडीतला हा तिसरा चित्रपट! ‘दंगल’ने एकाच आठवड्यात ३०० कोटींचा बिझिनेस केल्याचं बोललं जातं.

Read More
अलिगढ 0

अलिगढ

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

त्तर प्रदेशातल्या अलिगढ विद्यापीठात घडलेल्या – सत्य घटनेवर आधारित ‘अलिगढ’ हा हंसल मेहता दिग्दर्शित चित्रपट लावला. २६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘अलिगढ’ हा हिंदी चित्रपट समलिंगी संबंध आणि मनोज बाजपेयी याचा नितांत सुंदर अभिनय यानं अतिशय उत्कृष्ट असा झाला आहे. हा चित्रपट संथ असला तरी तो हळूहळू चढत जातो आणि एक अस्वस्थ वेदना कायमची देऊन संपतो. काही चित्रपट हे फक्त कथानकापुरते न उरता ते आपल्याला त्या घटनाक्रमात खेचून घेतात आणि ते जगणं, ती वेदना जगायला लावतात.

Read More
एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी 0

एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

एम. एस. धोनीः द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट बघितला. खरं तर मला क्रिकेट हा खेळ अजिबात आवडत नाही. दोन ते तीन लोक सक्रिय असतात आणि बाकी सगळे निष्क्रिय! त्यात बघणारे हजारो, लाखो लोक दिल की धडकन थामके वगैरे बसलेले असतात. त्यापेक्षा मला खो-खो, लंगडी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फूटबॉल, कबड्डी वगैरे खेळ आवडतात. मला काय आवडतं किंवा आवडत नाही हे इथंच थांबवते. पण चित्रपट होता, क्रिकेटचा भारतीय सर्वात लोकप्रिय कप्तान महेंद्रसिंग धोनी याच्यावरचा! त्यामुळे क्रिकेटवरचं भाष्य तोंडून सहजपणे निघून गेलं.
चित्रपट बघायला सुरूवात केली. ट्रेलर आणि गाणी काही वेळा बघितली होती. त्यातली हिरोईन आवडली होती आणि धोनीचं काम करणारा सुशांतसिंग राजपूत हाही! त्याला पवित्र रिश्ता मालिकेपासून बघत होतेच! बरं झालं त्यानं ती मालिका सोडली आणि त्यानंतर ‘पीके’ मध्ये अनुष्का शर्माबरोबर त्याचं एकदम आल्हाददायक दर्शन झालं. त्यातलं त्याच्यावर चित्रित केलेलं गाणं, ‘बिन कुछ कहे, बिन कुछ सुने हाथो मे हाथ लिए, चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे…’ हे गाणं खूप आवडलं. अजूनही आवडतं. वातावरण एकदम गुलाबी होऊन जातं!

Read More
सैराट 0

सैराट

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

नागनाथ मंजुळे निर्मित, दिग्दर्शित आणि कथित चित्रपट सैराट आज बघितला. अजय-अतुलची यड लागलंया आणि झिंगाट ही गाणी आणि संगीत लोकांना ठेका धरायला लावणारं तर आहेच, पण येड लावणारही आहे. २९ एप्रिल २०१६ या दिवशी प्रदर्शित झालेल्या या बहुचर्चित मराठी चित्रपटानं एकाच आठवड्यात ३२ कोटी रूपयांचा बिझिनेस केला. सध्या अनेक पोस्ट फिरताहेत, की संस्कारांना जपा. आई-वडिलांच्या कष्टाची आठवण ठेवा. इतक्या लहान वयात प्रेम नसतं, त्या आकर्षणापोटी आपले आई-वडील गमवू नका वगैरे वगैरे. कुठल्या संस्कृतीचे गोडवे गाणार आहोत आपण? मुलगी १८ वर्षाची झाली की कायद्यानं सज्ञान असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र तिच्या आयुष्याचे निर्णय तिला घेता येऊ नयेत किंवा तिनं ते घेऊच नयेत अशी व्यवस्था आम्ही करून ठेवतो. या चित्रपटाविषयी इतक्या उलटसुलट प्रतिक्रिया कानावर पडत होत्या की मनात कुठलाच पूर्वग्रह नको म्हणून सैराटच्या फेसबुकवरच्या असोत, वा व्हाट्सअपवरच्या असोत – जाणीवपूर्वक एकही पोस्ट वाचली नाही. खरं तर सैराट बघितल्यापासून आज सारखी स्वतःशीच चिडचिड होते आहे.
जातीबाहेर लग्न केलं की दैनंदिन जगणं किती अवघड होतं हेही सांगणारे अनेक असतात. पण तसं पाहिलं तर एकाच घरात राहणार्‍या रक्ताच्या नात्याच्या लोकांचं आपसांत किती पटतं हो! जाती-धर्माच्या भिंती कोसळून पडण्यासाठी आंतरजातीय-आंतरजातीय विवाह हे झालेच पाहिजेत हेही सैराटच्या निमित्तानं सांगावं वाटतं.

Read More
मिस्टर अँड मिसेस 55 0

मिस्टर अँड मिसेस 55

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

गुरुदत्त निर्मित आणि दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेस 55’ या चित्रपटाची गाणी लहानपणी अनेकदा ऐकली होती. औरंगाबादला शहागंज याभागातल्या ‘नरिमन’ नावाच्या दुकानातून माझ्या भावानं या चित्रपटाची एलपी रेकॉर्ड विकत आणली होती. यातली सगळीच गाणी एकसेएक होती. त्यातही ‘उधर तुम हसीं हो, इधर दिल जवॉं है’ हे गाणं मला इतकं आवडलं होतं की गाणी सुरु असताना त्या रेकॉर्डची पिन उचलून तेच तेच गाणं मी 50 वेळा तरी ऐकत असे. नंतर पुढे केव्हातरी कॉलेजला असताना हा चित्रपट दूरदर्शनवर बघितला तेव्हा तो खूपच आवडला. गुरुदत्त आणि मधुबाला यांच्यावर चित्रित केलेलं हेच गाणं आठवणीत राहिलं. आज हा चित्रपट पुन्हा बघितला आणि आजही तो आपल्याला तितकाच भावत असल्याचं जाणवलं.

Read More
बहारे फिर भी आयेगी 0

बहारे फिर भी आयेगी

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

१० ऑक्टोबर १९६४ या दिवशी गुरुदत्तनं स्वतःचं आयुष्य संपवलं आणि त्याचा अर्धवट राहिलेला ‘बहारे फिर भी आयेगी’ हा चित्रपट शाहीद लतिफ यानं पूर्ण केला. नाव जरी शाहीदचं असलं तरी प्रत्यक्षात अब्रार अल्वी आणि गुरुदत्तचा भाऊ आत्माराम यांनी दोघांनी मिळून हा राहिलेला चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र साहिब, बीबी और गुलाम च दिग्दर्शन करणारा आणि त्याबद्दल फिल्म फेयर अवार्ड मिळवणारा हाच का तो दिग्दर्शक अब्रार अल्वी असा प्रश्न मनात निर्माण होतो.
असं म्हटलं जातं की १०-१२ रीळपर्यंत चित्रिकरण झाल्यानंतरही गुरुदत्त अस्वस्थ होता. त्याच्या मनासारखं झाल्याचं समाधान त्याला मिळत नव्हतं. यात त्यानं चित्रित केलेल ‘वो हँसके मिले हमसे, हम प्यार समझ बैठे’ बघायला आणि ऐकायला खूपच आनंद मिळतो. माला सिन्हावर चित्रित झालेलं हे गाणं बघताना त्यात गुरुदत्त अदृश्यपणे जाणवत राहतो. त्याचा छायाप्रकाशाचा प्रभाव या गाण्यावर दिसतो आणि अशा वेळी हटकून रेम्ब्रा या चित्रकाराची आठवण होते. या चित्रपटातली ‘कोई कहदे’, ‘आपके हसीन रुख पे आज नया नूर है’, ‘दिल तो पहलेसे मदहोश है’ आणि ‘बदल जाये अगर माली’ ही सगळीच गाणी श्रवणीय असून संगीतकार ओ. पी. नय्यर आहेत. ओ. पी. नय्यरच्या उत्कृष्ट गाण्यांमध्ये या गाण्यांचा समावेश करता येईल.

Read More
साहिब, बीबी और गुलाम 0

साहिब, बीबी और गुलाम

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

बलराज साहनीनंतर गुरुदत्तनं मनावर मोहिनी घातली. त्याचा कागज के फुल आणि प्यासा बघितला. दोन्ही अनुभव सुन्न करणारे! त्यातला गुरुदत्त वेगळाच होता, जरा धीरगंभीर, संयमी आणिक काय काय…..त्यालाच डोळ्यासमोर ठेवून साहिब, बीबी और गुलाम बघायला सुरुवात केली… १९ व्या शतकाच्या अखेरची कलकत्त्यामधली गोष्ट….कधी काळी शानदार, वैभवानं नटलेल्या जमीनदार चौधरीच्या हवेलीला कळा आलेली आणि तिची पडझड झालेली. तिला आता पूर्णच जमीनदोस्त करण्यासाठी अनेक मजूर कामाला लागलेले आणि ते सगळं दश्य त्यांच्यावर देखरेख करत असलेला ओव्हरसिअर बघतोय….त्या हवेलीच्या परिसरात फिरत असतानाच तो भूतकाळात हरवतो आणि तीच हवेली त्याला नव्या नवरीसारखी अतिशय सुरेख दिसायला लागते. त्या हवेलीत सगळीकडे धांदल सुरू असतानाच समोरून कामाच्या शोधात खेडेगावातून आलेला एक तरूण हातात कपड्यांचं बोचकं घेऊन तिथं प्रवेश करतो. तो भाबडा तरूण शहरातलं झगमगतं वातावरण आणि त्यातही हवेलीतली चहलपहल बघून चकित होतो. त्याच्याकडे पाहून मीही तितकीच चकित झाले. अरे, हा तर गुरुदत्त! पण पूर्वी बघितलेल्या दोन्ही चित्रपटांपेक्षा हा एकदम वेगळा! एकदम हटके! त्याच्या त्या भाबड्या रुपाच्या प्रेमात कोणीही पडावं असा!

Read More
प्यासा 0

प्यासा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

गुरुदत्तनं ‘प्यासा’ या चित्रपटात तर अनेक वेगवेगळी तंत्र आणि शैली वापरली. गुरुदत्त या चित्रपटात एक अभिनेता म्हणून, संगीतकार म्हणून, गीतकार म्हणून आणि छायाचित्रणकार म्हणूनही आपल्याला पदोपदी दिसतो. ‘प्यासा’ हा चित्रपट छायाचित्रणासाठी एकदा, दिग्दर्शनासाठी एकदा, अभिनयासाठी एकदा, गीतांसाठी एकदा, संगीतासाठी एकदा अशा अनेक गोष्टींसाठी एकदा – एकदाच नव्हे तर अनेकदा पाहावा आणि अनुभवावा असा चित्रपट आहे.
‘टाईम’ च्या सर्व्हेक्षणात जगभरातल्या १०० सर्वश्रेष्ठ चित्रपटांमध्ये ‘प्यासा’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर जाऊन बसला. असं म्हटलं जातं की भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी हा चित्रपट बघितला, तेव्हा त्यांना देखील आपले अश्रू आवरता आले नव्हते!

Read More
कागज के फूल 0

कागज के फूल

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

२ जानेवारी १९५९ साली प्रदर्शित झालेला आणि फिल्म फेअर ऍवार्डनं पुरस्कृत केलेला हा गुरूदत्त दिग्दर्शित कागज के फूल हा चित्रपट त्या वेळी मात्र एक आठवडाभरही हा चित्रपट चालला नाही. इतक्या सुंदर कलाकृतीचं भरभरून यश बघणं गुरुदत्तच्या नशिबी नव्हतं. आज मात्र जगभरातल्या १३ नामांकित विश्‍वविद्यालयांमधून हा चित्रपट अभ्यासासाठी ठेवलेला आहे. २० वर्षांनी या चित्रपटानं लोकांना जाणीव झाल्यावर आणि या चित्रपटाचं महत्त्व पटल्यावर अक्षरशः डोक्यावर घेतलं. राजकपूर या दिग्दर्शक आणि अभिनेत्यानं तर म्हणूनच ठेवलं होतं. की कागज के फूल या चित्रपटाचं कलामूल्य लोकांना उशिरा कळेल. हा चित्रपट काळाच्या आधीच प्रदर्शित झालाय आणि तसंच झालं. गुरुदत काळाच्या पुढचा विचार करणारा कलावंत होता. त्याच्या कलेचं मूल्य त्या काळातल्या लोकांना समजणंच शक्य नव्हतं. चुकीच्या वेळी तो जन्मला आणि त्याचं मोल जगाला फार उशिरा समजलं.
कागज के फूल हा चित्रपट मनाला बेचैन करून सोडतो. गुरुदत्तच्या वेदनांनी आपल्या हदयात जाऊन कधी जागा घेतली आपल्यालाही कळेनासं होतं हेच खरं!

Read More
दो बिघा जमीन 0

दो बिघा जमीन

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

‘दो बिघा जमीन’ हा चित्रपट खरोखरच हिन्दी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो. भारतातल्या १० उत्कृष्ट चित्रपटात ‘दो बिघा जमीन’ ची गणना होते. पण हा चित्रपट गल्ला भरू नसल्यानं त्या वेळी फारसा चालला नाही. या चित्रपटानं भारतीय सिनेमात नवयर्थाथवादाची सुरुवात केली. खरं तर हा चित्रपट म्हणूच नये. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी – कशा अवस्थेत आजही जगतोय याचं डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं वास्तव आज ६० वर्षांनतर तसंच बघायला मिळतं आहे. एकीकडे या चित्रपटातून परस्परातलं प्रेम, माणुसकी, परिश्रम, आशावाद, मूल्यांवरची अढळ श्रद्धा हे सगळं दिसत असतानाच आजही गरीब, दलित वर्गाची दयनीय अवस्थाही बघायला मिळते. भारतीय शेतकर्‍याच्या भीषण अवस्थेचं चित्रण या चित्रपटात आहे. यात रोजच्या पोटाचा प्रश्‍न निर्माण झाल्यानं गावाकडून शहराकडे धावणार्‍या मनुष्याचं जगणं बघायला मिळतं. पण त्याचबरोबर शहरात जाऊनही त्याच्या हाती काहीच लागत नाही. मिळतं ते फक्त बकाल जीवन! त्याचं सुख संपल्यातच जमा होतं. सुखाची स्वप्नंही तो बघू शकत नाही कारण ती स्वप्नं बघायलाही त्याच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही, इतका तो त्या घाण्याच्या बैलासारखा कामाला जुंपला जातो. त्या वेळी बिमल रॉयनं या चित्रपटाच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्‍न आजही ६० वर्षानंतर उत्तराच्या शोधात तसेच उभे आहेत हेच खरं!

Read More
सीमा 0

सीमा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

१९५५ साली अमिय चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेला एक क्लासिक चित्रपट म्हणजे बलराज साहनी आणि नुतन यांच्या अभिनयानं नटलेला ‘सीमा’! आज ६० वर्षांनतरही हा चित्रपट मनाला तितकाच भिडतो. त्याचं कथानक, त्यातली मूल्यं, त्यातला मानवतावाद, त्यातली गाणी, त्यातलं संगीत त्यातल्या पात्रांचा अभिनय काय काय सांगावं?

‘सीमा’ हा चित्रपट मी लहानपणापासून कितीतरी वेळा बघितला, पण त्याची जादू आजही तसूभरही कमी होत नाही. तो मनावर तितकाच परिणाम साधत राहतो. गौरी असलेल्या नुतनच्या सुखदुःखाशी प्रेक्षकाला समरस करून सोडतो. बलराज साहनीसारखा आर्दशवादी माणूस शोधण्यासाठी आपण सगळेच आतुर असतो. नुतनमधली बंडखोर, हट्टी मुलगी, आपल्या सगळ्यांमध्येच असते. त्यामुळे तिचं पळून जाणं, खोट्या आरोपाविरुद्ध न्यायासाठी बंड करणं, रागामुळे तोडफोड करणं, ‘मी वाईट आहे तर आहेच वाईट’ म्हणून ओरडणं हे सगळं बरोबरच वाटायला लागतं. त्याच क्षणी आपल्याही चेहर्‍यावर जणू काही ती आपलीच प्रतिकृती असावी इतकं साम्य वाटतं. तिसरी-चौथीत असताना हा चित्रपट मी पहिल्यांदा बघितला. तेव्हा तो सगळाच कळला असा भाग नव्हता, पण आवडला होता. त्यानंतर १० वीत असताना मी ‘सीमा’ बघितला, तेव्हा थोडा कळला आणि खूप आवडला. मग ३५ च्या वयात पुन्हा हाच सिनेमा बघितला, तेव्हा त्यातले अनेक कंगोरे कळत गेले, आणखीनच आवडला आणि आज पुन्हा पाहतानाही त्यातली ताकद कळत गेली.

Read More
अनुराधा 0

अनुराधा

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

‘अनुराधा’ हा चित्रपट मी अनेकदा बघितलाय. काल परत एकदा बघितला. १९६० साली हृषिकेष मुखर्जींनी दिग्दर्शित आणि प्रदर्शित केलेला आणि पंडित रवीशंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अनुराधा’ या चित्रपटाचं बलराज सहानी आणि लीला नायडू यांनी अक्षरशः सोनं केलंय. आपल्या मूल्यांना प्राधान्य देणारा एक डॉक्टर आणि संगीत हेच जगणं मानणारी अतिशय संवेदनशील गायिका असलेली तरुणी यांच्यातल्या हळुवार प्रेमाची कहाणी यात आहे. बलराज सहानी आणि लीला नायडू यांचं प्रेम इतकं तरलपणे फुलत जातं, की बघणारा त्या प्रेमाचा साक्षीच नव्हे, तर त्याचा हिस्सा होऊन जातो.

Read More
garam hava 0

garam hava

Posted by on Feb 18, 2018 in Articles by Me, Movie Reviews

हर सिनेमे तुफान
वहॉं भी था यहॉं भी
हर घरमे चिता जलती थी
लहराते थे शोले,
हर शहरमे शमथान
वहॉं भी था, यहॉं भी
गीता की कोई सुनता,न कुरान की सुनता
हैरान था इमान
वहॉं भी था, यहॉं भी

Read More