जवाहर वाचनालय कळवा
तारीख
-
स्थळ
कळवा ठाणे
काल सायंकाळी ठाण्यातल्या कळवा इथल्या जवाहर वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात अच्युत गोडबोले आणि मी आमचा लेखनप्रवास हा विषय श्रोत्यांसमोर उलगडला. कार्यक्रम खूपच चांगला झाला. अनेक वाचक भेटले आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या. या वाचनालयाला ५० वर्ष पूर्ण झाली असून चांगल्या वाचकांचा गौरव दरवर्षी वाचनालयातर्फे केला जातो.
यात वेगवेगळ्या विषयावर वाचन करणारे मुले आणि प्रौढ यांची निवड केली जाते.
या कार्यक्रमाला प्रेमापोटी आवर्जून आलेल्या अनेक वाचकांबरोबरच रंजन आणि जनार्दन यांचेही आभार!!!
दीपा देशमुख