मानवतेच्या इतिहासाचे आणि विज्ञानविश्वाचे विलोभनीय दर्शन घडवणारे बारा “जीनियस”
खरं तर ‘जीनियस’ हा प्रकल्प अनेक दिवसांपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून मनात घोळत होता. या संदर्भातले तीन प्रकल्प आमच्या मनात होते आणि आहेत. लवकरच बाकी दोनही प्रकल्प वाचकांसमोर येतील. यातला पहिला प्रकल्प म्हणजे असे जीनियस की ज्यांनी जग बदलवलं. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, समाज/राज्यशास्त्र, व्यवस्थापन, संगीत, साहित्य, चित्र/शिल्पकला अशा अनेक क्षेत्रातले ७२ जगातले युगप्रवर्तक जीनियस आम्ही निवडले. त्यापैकी १२ जीनियस वैज्ञानिकांचा संच यंदाच्या दिवाळीत प्रत्येकी ६०-७० पानी १२ पुस्तकांच्या संचात आपल्यासमोर येतोय. पुढे वाचा