2022 : एक दंत कथा

2022 : एक दंत कथा

आवडता अभिनेता फहाद फासिल आणि कमल हसन हे दोघेही एकत्रित ‘विक्रम’ या चित्रपटात असल्याचं कळताच, अस्मादिकांनी  अपूर्वला मिळेल त्या शोचं तिकीट बुक करायला सांगितलं आणि जम्बो पॉपकॉर्न खात खात तरुणाईने हाऊसफुल केलेल्या वेस्ट एंड थिएटरमध्ये चित्रपट बघायला सुरुवात केली.
त्याच क्षणी माझ्या दंतकथेनं जन्म घेतल्याची जाणीव मला झाली. डाव्‍या बाजूचा सुळा हालचाल करत असल्याचं लक्षात आलं. हळूच त्या सुळ्याला बोट लावून बघितलं, तर ‘मी डोलकर डोलकर दरियाचा राजा’ असं त्याचं गाणं मला ऐकू आलं. मग बोटाऐवजी मिनिटामिनिटाला जीभेनं स्पर्श करत मी त्या गाण्याला आणखीनच वेगानं लय देण्याचं काम सुरू केलं.  पुढे वाचा

osmanabad

पुणे – उस्मानाबाद – लातूर – उमरगा – पुणे

उस्मानाबादचे सरस वाचक चळवळ आणि एशियन रायटर्स या संस्थांचे पुरस्कर्ते सुनिल बडूरकर उस्मानाबाद इथे मी यावं म्हणून काही वर्षांपासून मला बोलावत होते, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचणींमुळे ठरत नव्‍हतं. अखेर 2022 च्या जून महिन्यात 25 तारखेला उस्मानाबाद इथे सरस वाचक चळवळीचं उदघाटन आणि श्रोत्यांशी संवाद असा कार्यक्रम ठरला. निमंत्रण देण्यासाठी ते खास पुण्यात येऊन भेटले. उस्मानाबाद आणि जवळपासच्या वाचकांना पुस्तकं मिळावीत यासाठी सरस वाचक चळवळ काम करत राहावी या हेतूने त्यांनी मनोविकासचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर यांनाही निमंत्रित केलं होतं. पुढे वाचा

डोन्ट लूक अप

डोन्ट लूक अप

अमेरिकेत घडणारं कथानक दाखवलं असलं, तरी ते आपल्याही देशाला लागू पडतय  असं वाटावं अशी ही गोष्ट म्हणजे डोन्ट लूक अप हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट!अमेरिकेतल्या मिशिगन स्टेट युनिव्‍हर्सिटी मध्ये खगोलशास्त्रात पीएचडी करणारी विद्यार्थिनी केट डिबियास्की (जेनिफर लॉरेन्स) दूरवरचं निरीक्षण करू शकेल अशा दुर्बिणीने अंतरिक्षाचा अभ्यास करत असताना तिला एक धूमकेतू दिसतो. हा धूमकेतू बराच मोठा असतो. जवळजवळ 10 किमी व्‍यासाचा धूमकेतू वेगाने पृथ्वीकडे येताना तिला दिसतो. धूमकेतू हा उल्केसारखा असणारा एक खगोलशास्त्रीय पदार्थ असून ते सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात. पुढे वाचा

विवाहसंस्था: काल, आज आणि उद्या

विवाहसंस्था: काल, आज आणि उद्या

एका लोककथेप्रमाणे ‘ती’ पिंजऱ्यात बंदिस्त! रोजच्या जगण्याला कंटाळलेली. मोकळा श्‍वास घेण्यासाठी आणि पंखांनी भरारी मारण्यासाठी उत्सुक, पण पिंजऱ्याभोवतीचं आवरण तिला ती गोष्ट कधीच करू देत नाही आणि हळूहळू तीही आपल्याला पंख आहेत हेच विसरून जायला लागते. एके दिवशी मात्र असह्य होऊन आता पाऊल उचललंच पाहिजे असा मनाशी निर्धार करते. पण त्या विचारातच रात्र होते, मध्यरात्र होते. ती विचारच करते आणि मग एकाएकी ती मनाचा हिय्या करून पिंजऱ्याचं दार उघडून बाहेर पडते. तिला नदीच्या पलीकडल्या तिरावर जायचं असतं. ती नदीकाठच्या नावेत बसते आणि नाव वल्हवायला सुरुवात करते. पुढे वाचा

रागाचं व्यवस्थापन - राग का येतो ?- थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2020

रागाचं व्यवस्थापन - राग का येतो ?- थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2020

‘मर्यादा’ या हिंदी चित्रपटात राजेश खन्ना आणि माला सिन्हा यांच्यावर एक गाणं चित्रीत केलं होतं. ‘ग, ग, ग, गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा’ हे गाणं त्या वेळी खूपच लोकप्रिय ठरलं होतं. चित्रपटात रागाकडे एका रोमँटिक मूडमध्ये येऊन बघणं ठीक आहे, पण प्रत्यक्षात मात्र या रागाचे परिणाम भयंकर होतात. रागाच्या भरात माणूस स्वत:चं संतुलन गमावून बसतो आणि स्वत:बरोबरच इतरांचंही भरून न येणारं नुकसान करतो. कधी रागाच्या भरात मारामारी, तर कधी खून; कधी नातेसंबंधात दुरावलेपण, तर कधी नवरा-बायकोमध्ये घटस्फोट. हा राग अनेक कारणांमुळे येत असला, तरी हा राग येतो कुठून? पुढे वाचा