मनात रेंगाळणार्या लोककथा
लोकांची, लोकांसाठी, लोकांना सांगितलेली कथा म्हणजेच लोककथा! ही कथा किंवा गोष्ट जो ऐकतो ती त्याचीच होऊन जाते. वार्याच्या झुळकेसारखी, संगीताच्या सुरावटीसारखी ती लहरत, विहरत जगभर प्रवास करते. या कथेला बांधून ठेवण्याची मुळी गरजच पडत नाही. म्हणजे ती कथा लिहून ठेवलीये, तिच्या लेखकाचं नाव त्याखाली उदृत केलंय वगैरे. जो ऐकतो तो तिला घेऊन पुढे जातो आणि म्हणून अशा अनेक कथा किंवा गोष्टी जगभर एकसारख्याच ऐकायला मिळतात. फक्त नावं वेगळी, गावं वेगळी असतात. पण त्या कथेचा आत्मा मात्र तोच असतो. पुढे वाचा