दीपा देशमुखांचा लेखन प्रवास 'निवारा'मधे एक संध्याकाळ दीपा देशमुख यांचा लेखनप्रवास ऐकण्यात सुरेख बनून गेली. जुलै महिन्याच्या 'सखी साऱ्याजणी'च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २३जुलैला सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
दीपाने नेहमी प्रमाणे तिच्या कार्यक्रमाचे आमंत्रण फोन व पोस्ट टाकून केलेले होतेच अर्थात निंमत्रणानंतरच जायचे इतके आमचे नाते औपचारिक नाहीच. हा उपचार फक्त स्थळ व वेळ व दिनांक कळावा एवढ्या करताच ...
सरस वाचक चळवळ मागील सात वर्ष सुरु आहे.
त्यासोबत सरस भारत व्याख्यानमाला आणि संमलने, बैठका, परिषदा असे अनेक वैचारिक सांस्कृतिक उपक्रम अनेक वर्ष चालू आहेत.
उस्मानाबाद परिसरात नवीन वाचक नवीन श्रोते नवीन रसिक घडण्यात या दहा वर्षाचा मोठा इतिहास आहे.
जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख मनोविकास प्रकाशनाच्या अनेक ग्रंथाच्या लेखिका दीपा देशमुख यांचे त्यांच्या 'जग बदलवणारे ग्रंथ' या ग्रंथावरील व्याख्यान उस्मानाबादेत परवा सरस वाचक चळवळीने आयोजित केले होते. सरस वाचक चळवळीच्या सर्व पदाधिका-यांचे या आयोजनाबद्दल खूप खूप धन्यवाद.
काही माणसे आपल्या आयुष्यात आपल्या सोबतची वेव्हलेंथ भन्नाट जुळवून येतात. त्या माणसांची आपल्यावर पडणारी मोहिनी काहीतरी सॉल्लिड वेगळी असते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारची जादू असते. त्यांच्या लिहिण्यामध्ये जादू असते.
मंडलिकांच्या घरातलं मी शेंडेफळ अजुन पण मोठं न झालेलं, नाक सरळ असून पण 'नकट्या' असलेलं आणि मुन्नी ताई बहिणीनं मध्ये सगळ्यात मोठी ताई.
यमाजी सर, धनूचे 'संगीत दहन आख्यान', डावकिनाचा रिच्या, समुद्र, 'शौकीन'मधलं कलकत्ता पान अन दीपाचे पुस्तक 'जग बदलणारे ग्रंथ'....! आजची संध्याकाळ खूपच आगळीवेगळी.... खूप खूप Happening आणि चिरस्मरणीय म्हणावी अशी 👍
“मला लिहायला आवडतं. मी पुस्तकं लिहीन…” माझ्या एका शिक्षकांशी बोलताना मी म्हणालो. “काय साध्य होणार पुस्तकं लिहून? किती लोक पुस्तकं वाचतात?” ते म्हणाले.
जगभरात जेव्हा जेव्हा क्रांती झाली... तेव्हा तेव्हा त्यात लेखणीचा मोठा वाटा होता. किंबहुना त्यामुळे च क्रांतिकारक बदल घडून आले. चांगल्या पुस्तकांनी माणसाला नेहमीच विचारांच्या नवनव्या परिमाणांची दालनं खुली केली.
पुस्तकं.. कोणी त्यांना मित्र म्हणतं, कोणी गुरू… आपलं भावविश्व, आपलं व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी ही पुस्तकं.. ज्याला वाचनाची आवड आहे, त्याला जीवनात कधीच एकटेपणा वाटत नाही… मात्र हीच पुस्तकं असतात एखाद्या अवजाराप्रमाणे, समाजाला आकार देण्यासाठी ज्यांचा मानवाकडून वेळोवेळी वापर होत गेला आहे.
नमस्ते Deepa Deshmukh मॅम 🙏🏼 सर्वांत अगोदर तर आपल्याला दिपावलीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा...❤️
एक धोकादायक पुस्तक ! ******** एक धोकादायक पुस्तक बाजारात आले आहे, त्याची जाणीव करून देणे आमचे कर्तव्य आहे. हे धोकादायक पुस्तक म्हणजे आमची मैत्रीण दीपा देशमुख यांचे मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले 'जग बदलणारे ग्रंथ' हे होय. ते धोकादायक का आहे ? सांगतो.