आपटे वाचनालय - इचलकरंजी

आपटे वाचनालय - इचलकरंजी

तारीख
-
स्थळ
Ichalkaranji

काल सकाळी कोल्हापूर -  तिथे रिया, वनिता, जान्हवी, ऋतुभावजी,  नीलिमा बरोबर धमाल आणि नंतर इचलकरंजी .....आपटे वाचनालय हे १४६ वर्षापूर्वी सुरु झालेलं अतिशय अप्रतिम वाचनालय!!  तसच ४६ वर्षांपासून  सातत्य राखून त्यांनी अतिशय सुरेख अशी व्याख्यानमाला सुरु केली. प्रत्येक वर्षी ८दिवस सुरु असणाऱ्या या व्याख्यानमालेत गंगाधर गाडगीळ, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते,  पु. भा. भावे, पद्मावती गोळे, छाया दातार, व्यंकटेश माडगुळक, गो. नी. दांडेकर, शांता शेळके, कुमार सप्तर्षी, राजन गवस, विश्वास पाटील, आनंद यादव, रा. रं,   बोराडे, दया पवार, बा. भ. बोरकर, यू. म. पठाण, पुष्पा भावे, ज्ञानेश्वर मुळे, आ. ह. साळुंखे, नरेंद्र दाभोलकर आणि देवदत्त दाभोलकर यासारखे अनेक व्याख्याते येऊन गेले. त्यात मला बोलायची संधी मिळाली याचा मला खूपच आनंद वाटतोय. 

व्याख्यान संपल्यानंतर श्रोत्यांची भेट आणि प्रतिक्रिया यांनी मन सुखावून गेलं. ग्रंथालयात दिमाखात उभी असलेली स्वताची सुपर हिरो, कॅनवास आणि जीनियस पुस्तकं बघून खूप झकास वाटलं. तसच ग्रंथालयातल चित्रदालन खूपच सुरेख! 

दीपा 

खूप मजाआली कारण बरोबर होती, धाकटी जाऊ नीलिमा,  दीर ऋतू आणि पुतणी जान्हवी!!!
नीलिमा  उवाच - दीपा ताई !!! ...मोठ्ठ्या जाऊ बाई ...त्यांच व्याख्यान होतं इचलकरंजीला ...मग काय त्या निमित्ताने कोल्हापुरातील सगळ्या आर्याबाग मैत्रिणी पण भेटलो एकमेकीना ...चहापाणी गप्पा ...मग दीपा ताईच ओघवत आणि गुंगवून ठेवणार व्याख्यान ... धाब्यावरच जेवण मज्जा आली ....!!!! खरच आमच्या जाऊ बाई जोरात आहेत .... अभिमान वाटावा अशा !
ऋतूभावजी - दीपावहिनीचं आजचं व्याख्यान अप्रतिम झालं. सखोल चौफेर अभ्यास, अनेक विषयांची उत्तम जाण, ओघवती भाषाशैली आणि खिळवून ठेवणारे लाजवाब वक्तृत्व. खूप दिवसांनी इतके सुरेख अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकायला मिळाले. सव्वा तास कुठलाही पॉज नाही की काही नाही... शब्दांचा एक शीतल झरा अविरत वाहत होता. सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले... 
सर्वच अभ्यासकांना आपले विचार इतके प्रभावीपणे मांडता येतातच असे नाही; दीपावहिनी मात्र याला अपवाद आहे. तिचा लेखन प्रवास तिच्याच आवाजात ऐकताना कमाल वाटत राहिली तिच्या अभ्यासू वृत्तीची. एक व्यक्ती इतक्या वेगवेगळ्या विषयांचा इतका सखोल अभ्यास कसा काय करू शकते?! खरोखर कमाल आहे! दीपावहिनी, खूप खूप अभिमान वाटतो तुझा!

कार्यक्रमाचे फोटो