जग बदलणारे जीनियस-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक

जग बदलणारे जीनियस-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक

तारीख
-
स्थळ
नाशिक

काल २४ नोव्हेंबर २०१६ च्या पूर्वसंध्येला नाशिक इथे यशवंतराव चव्हाण यांच्या ३२ व्या पूण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक यांनी जग बदलणारे जीनियस या विषयावर अच्युत गोडबोले आणि मी - दीपा देशमुख -आमचं व्याख्यान आयोजित केलं होतं. 

या कार्यक्रमाला नाशिकची सर्व मान्यवर मंडळी प्रचंड संख्येनं उपस्थित होती. शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातल्या रसिक श्रोत्यांनी आमच्या व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद दिला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे नाशिकचे अध्यक्ष विनायकदादा पाटील आणि कार्याध्यक्ष विश्‍वास ठाकूर, कोषाध्यक्ष विनायक रानडे उपस्थित होते. पुण्याहून खास आमच्या व्याख्यानासाठी आमचे मित्र कल्याण तावरे, सुचेता उन्निथन, वंदना पोतेकर आणि मुंबईहून सुवर्णरेहा हेही आले होते. किशोरदांच्या आणि आमच्या आक्काही आल्या होत्या.

माझ्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट यासाठी होती की कॉलेजनंतर मी सामाजिक कार्यात पडले ती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची कार्यकर्ती म्हणून! औरंगाबादला सामाजिक आणि सांस्कृतिक कामाची जबाबदारी घेऊन महिला व्यासपीठाची स्थापना करून किशोरवयीन मुली, युवती आणि ज्येष्ठ महिलांसाठी अनेक कार्यक्रम त्या वेळी घेतले होते. पण नंतर मासवणला आदिवासींमध्ये काम करायला गेले आणि हळूहळू प्रतिष्ठानच्या कामातला सहभाग थोडा कमी होत गेला. प्रतिष्ठानच्या कामात असतानाच माझी अच्युत गोडबोले यांच्याशी ओळख झाली. सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षण देखील मी याच संस्थेतून घेतलं. या संस्थेचं माझ्या प्रवासातलं माझ्याबरोबर असणं मला खूपच मोलाचं वाटतं. विश्‍वास ठाकूर, विनायक रानडे, अनिता पगारे, अतुल खैरनार, राजू देसले, हंसराज, प्रियंका आणि कुटुंबीय  या  सगळ्यांची स्नेहभेट या निमित्तानं झाली. तसंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिकच्या विभागीय केंद्रानं मला आणि अच्युत गोडबोले यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करावं ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट होती/आहे. 

या प्रसंगी आम्ही आमचं लिखाण, सहलेखन आणि जीनियसचं अचाट कार्य यावर श्रोत्यांशी संवाद साधला.  या कार्यक्रमाला लोटलेली अलोट गर्दी आणि प्रतिसाद बघून आम्ही दोघंही भारावून गेलो. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं!

कार्यक्रमाचे फोटो