न्यू इंग्लिश स्कूल पुणे

न्यू इंग्लिश स्कूल पुणे

तारीख
-
स्थळ
न्यू इंग्लिश स्कूल पुणे

नुकताच पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जीनियस' विषयी विद्यार्थ्यांशी गप्पा मारायचा योग आला. जीनियस वाचून शाळेचे उत्साही मुख्याध्यापक नागेश मोने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी मला फोन करून पुस्तकांविषयी प्रतिक्रिया तर दिली, पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी विज्ञान प्रसाराच्या हेतूनं 1000 जीनियस शाळेतर्फे विद्यार्थ्यांना भेट दिले.

या वेळी आमच्याबरोबर मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर हेही होते. ते स्वतः अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मुख्याध्यापकांचा विज्ञान प्रसाराचा हेतू लक्षात घेऊन 1000 जीनियसच्या पुस्तकांवर त्यांनी शाळेला खास सवलतही दिली.प्रख्यात संशोधक डी डी कोसंबी ज्या शाळेत शिकायला गेले अशा शाळेत जाण्याची संधी मिळाली त्याचा खूप आनंद झाला, त्याचबरोबर मुलांशी आणि त्यानंतर शिक्षक वर्गाशीही संवाद साधता आला. छान अनुभव!!!

कार्यक्रमाचे फोटो