ग्रंथपेटी आणि पर्यावरण दिन

ग्रंथपेटी आणि पर्यावरण दिन

तारीख
-
स्थळ
Pune

आज विनायक रानडे यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाच्या 92 व्या ग्रंथपेटी चे वितरण म्हाळुंगे, बाणेर इथे पुराणिक सोसायटी मध्ये झाले. या प्रसंगी या उपक्रमाविषयी विनायक रानडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून हा पुस्तकवेडा आता महाराष्ट्रच नाही तर युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्वित्झर्डलँड, दुबई इथेही ग्रंथांसह जाऊन पोहचला आहे. आज ग्रंथपेटी पस्तेकर पतीपत्नीकडे सुपूर्त करताना खूप आनंद झाला, त्यानंतर लेखिका म्हणून लेखनातले अनुभव share करताना माणस अधिक जवळ आली.
आज पर्यावरण दिन असल्याने वृक्षारोपण केलं.

कार्यक्रमाला वाचक उपस्थित होतेच, शिवाय माझे मित्र कल्याण तावरे आणि डॉ. नीलिमा मोरे आवर्जून उपस्थित राहिले, त्यामुळे मला खूपच आनंद झाला.😊😊

कार्यक्रमाचे फोटो