शब्दांचे जादूगार रवींद्रनाथ टागोर
एक छोटीशी मुलगी घराच्या खिडकीत बसून बाहेर चाललेली मिरवणूक बघत असते. त्या नगरीचा राजकुमार लवकरच तिच्या दारावरून पुढे जाणार असतो. एकाही कामात तिचं लक्ष लागत नसतं. छानसं तयार होऊन, गळ्यात माळ, कानात डूल घालून तिला खिडकीतून राजकुमाराला बघायचं असतं. खरं तर राजकुमाराला ती चिटुकली मुलगी दिसणार देखील नसते तरीही तिला मात्र सगळं दृश्य बघायचं असतं. इतकंच नाही तर तिच्या गळ्यातली माळही तिला राजकुमाराला द्यायची असते. जेव्हा राजकुमाराचा रथ तिच्या दारावरून जातो, तेव्हा खिडकीतून आनंदानं ती माळ खाली फेकते. क्षणार्धात तिची माळ रथाखाली चिरडली जाते. त्या माळेचं काय झालं कोणालाही कळत नाही. मुलगी मात्र खुश होते. पुढे वाचा