डायरेक्टर्सचे निमित्त: हातमिळवणी प्रकाशकाशी..... परवाच 'डायरेक्टर्स' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आम्ही उपस्थित होतो. ती 16 मेची सायंकाळ होती. आम्ही काही तासांसाठी पुण्यात आलो होतो. पुण्याहून निघता निघता तिथे पोंचलो. कार्यक्रम दीपा देशमुख यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा होता.
#डायरेक्टर्स आताच अनेक अडचणींवर मात करून दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशित #डायरेक्टर्स हे अप्रतिम असं पुस्तक वाचलं. मुख्य अडचण म्हणजे मोबाईल. तो वाजला तरी त्रास होतो आणि का नाही वाजला म्हणूनही त्रास होतो. त्यावर मात केली तर इतर कामे मध्ये येत होतीच. पण आज ते पूर्ण केलं.
आदरणीय दीपाताई वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!
आजची एक ग्रेट भेट… 🌿📚 प्रसिद्ध लेखिका दीपा ताई देशमुख यांची आज सहकुटुंब भेट घेण्याचा सुंदर योग आला. मागील एक दशकाहून अधिक काळापासून दीपाताई आणि महामानव बाबा आमटे संस्था यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध.. नेहमीप्रमाणे आजही ताई सोबत मनमोकळा संवाद, झाला
प्रसिद्ध लेखिका दीपाताई देशमुख यांना आज माझे नवे पुस्तक ‘स्टार्टअप रोडमॅप’ भेट दिले. त्यावेळी शमा सुबोध मॅडम व मित्रवर्य संदीप केदार उपस्थित होते. ज्यांची स्वत:ची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत, अशा दिग्गज लेखिकेला स्वत:चे पुस्तक देतांना थोडेसे दडपण पण होते व भारी पण वाटत होते.
काही दिवसांपूर्वी माझ्या आवडत्या लेखिकेपैकी एक असलेल्या दिपा देशमुख मॅम यांना प्रथमच घरी जाऊन भेटलो . आपण ज्यांची पुस्तकं वाचतो , ज्यांच्या लिखाणातून विचारांना नवी दिशा मिळते, अशा लेखकांना प्रत्यक्ष भेटणं हा खरोखर खास नि आनंदाचा क्षण असतो.
दीपा देशमुखांचा लेखन प्रवास 'निवारा'मधे एक संध्याकाळ दीपा देशमुख यांचा लेखनप्रवास ऐकण्यात सुरेख बनून गेली. जुलै महिन्याच्या 'सखी साऱ्याजणी'च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २३जुलैला सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
दीपाने नेहमी प्रमाणे तिच्या कार्यक्रमाचे आमंत्रण फोन व पोस्ट टाकून केलेले होतेच अर्थात निंमत्रणानंतरच जायचे इतके आमचे नाते औपचारिक नाहीच. हा उपचार फक्त स्थळ व वेळ व दिनांक कळावा एवढ्या करताच ...
सरस वाचक चळवळ मागील सात वर्ष सुरु आहे.
त्यासोबत सरस भारत व्याख्यानमाला आणि संमलने, बैठका, परिषदा असे अनेक वैचारिक सांस्कृतिक उपक्रम अनेक वर्ष चालू आहेत.
उस्मानाबाद परिसरात नवीन वाचक नवीन श्रोते नवीन रसिक घडण्यात या दहा वर्षाचा मोठा इतिहास आहे.
जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख मनोविकास प्रकाशनाच्या अनेक ग्रंथाच्या लेखिका दीपा देशमुख यांचे त्यांच्या 'जग बदलवणारे ग्रंथ' या ग्रंथावरील व्याख्यान उस्मानाबादेत परवा सरस वाचक चळवळीने आयोजित केले होते. सरस वाचक चळवळीच्या सर्व पदाधिका-यांचे या आयोजनाबद्दल खूप खूप धन्यवाद.
काही माणसे आपल्या आयुष्यात आपल्या सोबतची वेव्हलेंथ भन्नाट जुळवून येतात. त्या माणसांची आपल्यावर पडणारी मोहिनी काहीतरी सॉल्लिड वेगळी असते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारची जादू असते. त्यांच्या लिहिण्यामध्ये जादू असते.
मंडलिकांच्या घरातलं मी शेंडेफळ अजुन पण मोठं न झालेलं, नाक सरळ असून पण 'नकट्या' असलेलं आणि मुन्नी ताई बहिणीनं मध्ये सगळ्यात मोठी ताई.