दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी - बालाजी सुतार
लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी असे सगळे कथांचे प्रकार वाचताना त्या त्या प्रकारांची वैशिष्ट्यं, त्यांच्यातलं सौदर्यं, त्यांच्यातली बलस्थानं, तर लक्षात येतात आणि वाचक आपापल्या पिंडाप्रमाणे एका विशिष्ट प्रकाराकडे जास्त खेचला जातो. मला स्वत:ला कथा हा प्रकार आवडतो, याचं कारण तो नेमका आणि सुटसुटीत असून तो वाचकाच्या सगळ्या अपेक्षाही पूर्ण करतो, असं मला वाटतं. पुढे वाचा