Book Reviews

शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!

शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!

रिचर्ड फाईनमन या अवली शास्त्रज्ञानं लिहिलेलं आणि माधुरी शानबाग यांनी अनुवादित केलेलं मधुश्री पब्लिकेशनचं ‘शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन!’ या पुस्तकाची मी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. नुकतंच हे पुस्तक हातात पडलं. हे पुस्तक लिहिणारा रिचर्ड फाईनमन हा अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ! जन्मानं ज्यू असला तरी मानवता हाच धर्म मानून त्यानं विज्ञानावर आयुष्यभर प्रचंड प्रेम केलं. रिचर्ड फाईनमन हा आपलं अस्थिर आणि वादळी आयुष्य, भरकटलेपण, पारदर्शी स्वभाव, खेळकर आणि खिलाडू संशोधक वृत्ती, बोलकी चित्रकारिता घेऊन जगासमोर आला. पुढे वाचा