Book Reviews

भंगार

भंगार

'भंगार' पुस्तक कालपासून वाचायला घेतलं आणि आज संपलं. कितीतरी वेळापासून मनाला बधिरपणा आलाय. मन सुन्न झालंय. लहानपणी गोष्टीतून स्वर्ग कसा असतो आणि नरक कसा असतो हे ऐकलं होतं आणि वाचलं होतं. आज मात्र नरक कसा असतो आणि तो इथंच, आपल्या आसपास असतो हे लक्षात येऊन मनाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या आहेत. खरं तर उकिरडा ठाऊक होता, त्यावरचा कचरा वेचणारी मुलं-मुली, स्त्रिया बघितल्या नव्हत्या अशातलाही भाग नाही. पण त्यांच्या रोजच्या जगण्याविषयीचा विचार मनात कधी या तर्‍हेनं आला नव्हता. 'भंगार' या पुस्तकातून मी गोसावी समाजाचं जगणं अनुभवून आले. नरकापेक्षाही विदारक असं आयुष्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये. पुढे वाचा

ग्रीकपुराण

ग्रीकपुराण

रोहन प्रकाशनानं काही दिवसांपूर्वी ग्रीकपुराण या सुप्रिया सहस्त्रबुद्धे लिखित पुस्तकाची पोस्ट फेसबुकवर टाकली असताना मी कुतूहल म्हणून ‘या पुस्तकात काय आहे?’ असा प्रश्‍न केला. त्या प्रश्‍नाचं उत्तर तर त्यांनी मला दिलंच, पण कुरियरनं ग्रीकपुराणाची भेटप्रत अतिशय प्रेमानं पाठवली. त्याबद्दल रोहन प्रकाशनाचे खूप खूप आभार! मी पुस्तकाचं पान उलटवलं आणि प्रदीप चंपानेरकर यांची स्वाक्षरी असलेला माझ्यासाठी लिहिलेला मजकूर वाचून मी खूप वेळ प्रदीप चंपानेरकर यांच्या स्वाक्षरीकडे बघत राहिले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी असलेले प्रदीप चंपानेरकर या स्वाक्षरीतून कलाकार असल्याची साक्ष देत होते. पुढे वाचा

वुई द चेंज - आम्ही भारताचे लोक -संजय आवटे

वुई द चेंज - आम्ही भारताचे लोक -संजय आवटे

संजय आवटे ‘ज्यांना मी पाहायचो आणि मग भेटण्याचा मोह व्हायचा, अशा संजय आवटे सरांना कणकवलीच्या श्रमसंस्कार शिबिरात भेटलो. सरांसोबत खूप गप्पा झाल्या. माझी कविता सरांना ऐकवायची होती. तशी इच्छा मी व्यक्त केली. त्यांनी ती मान्य देखील केली. कविता ऐकून झाल्यावर सरांनी मीठीच मारली. आयुष्यात आत्तापर्यंत माझ्या कवितेला मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान मी मानतो. घरी आल्यावर डोळ्यांत आनंदाचे अश्रू घेऊन आयेला सांगितलं, तर ती म्हणाली, ‘ते तुला नोकरीला लावणार हायेत का?’ आयचा प्रश्न मनात पुन्हा माझ्या गरीबीची जाणीव करून देत होता. मग मी माझाच अश्रू हातावर घेऊन पाहिले. पुढे वाचा

जुगाड - नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा

जुगाड - नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा

आज सातत्यानं बदलणार्‍या, स्पर्धेशी तोंड देत पुढे जाणार्‍या कॉर्पोरेट अधिकार्‍यांना, व्यावसायिकांना, उद्योजकांना आणि खरं तर प्रत्येकालाच यशस्वी होण्यासाठी ‘जुगाड’ हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. हे जुगाड प्रकरण आहे तरी काय? खरं तर जुगाड हा एक हिंदी शब्द असून याला समानार्थी शब्द इंग्रजी भाषेत उपलब्ध नाही. जुगाड याचा अर्थ आपली दैनंदिन गरज भागवण्यासाठी सहज सोप्या काटकसरी पद्धतीनं आणि हुशारीनं केलेलं संशोधन! कमतरतेकडून विपुलतेकडे जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जुगाड! आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी शोधलेला आणि विचारपूर्वक अंमलात आणलेला जुगाड हा एक उपाय आहे. पुढे वाचा