नग्नसत्य - बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध #मुक्त्ता मनोहर - संवादक दीपा देशमुख
एका स्त्री वर झालेला अत्त्याचार हा त्या स्त्री सोबत ती बातमी ऐकणाऱ्या प्रत्येक स्त्री च्या मनावर खोलवर घाव करतो, आपण काय करू शकतो हे सर्व थांबविण्यासाठी ? 2013 ते 2020 या काळात 2,48,600 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली. अशा प्रवृत्तीचा नाश का होत नाही? बलात्कार हा विषय मांडताना तो सामाजिक रचनाशी कसा गुंतलेला आहे हे त्यांनी वेगळ्या स्वरूपात मांडलेलं आहे , हे सर्व ऐकताना हा प्रश्न अंतर्मनाला भिडतो. सामाजिक संबंधांचा संदर्भ घेतल्याशिवाय बलात्काराचं धगधगतं वास्तव आपल्याला उलगडणार नाही, हे नक्की. मुक्त्ता मनोहर यांचे हे पुस्तक या गंभीर विषयावर भाष्य करते.