नवी व्यवस्था नवे प्रयोग
शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातला मोहंजोदडो आणि हडप्पाचा धडा हा कायम लक्षात राहणारा. कारण, पाचेक हजार वर्षांपूवीर् तिथे वसलेली शहरं, रस्ते, दुमजलं घरं हे अनुभवणं थरारक होतं. हा धडा शिकताना, एकदा तरी तिथे जावं असं वाटतंच. त्या संस्कृतीचे अवशेष् आज फोटोतून बघायला मिळतात. त्या नगररचनेविषयी मला विलक्षण कुतूहल वाटतं आणि आजही मला त्यावेळच्या समाजजीवनात केलेला सार्वजनिक विचार खूपच भावतो. सांडपाण्याची व्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगररचना करत असताना सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य यांचा किती विचार त्याकाळी केलेला दिसतो. पुढे वाचा