आउटहाऊस
आउटहाऊस दोन लेख लिहून संपले आणि ते मेल केल्यावर एक प्रकारचा बधीरपणा आला. मग हॉलमध्ये शांतपणे बसून टीव्ही ऑन केला. प्राईमवर चित्रपटांची नावं दिसायला लागली. त्यात साउथचा ‘थ्री बीएचके’ दिसला, मग राजकुमार रावचा ‘मालिक’ दिसला. दोन दोन मिनिटं ओझरती नजर टाकून ते चित्रपट बंद केले, आणि मला एकदम स्क्रीनवर ‘आउटहाऊस’ हा चित्रपट दिसला. कोणाचा आहे, कसा आहे, काहीही न बघता मी रिमोटने क्लिक केलं आणि बघायला सुरुवात केली. पुढे वाचा