ऐतिहासिक भेट - मिला है किसीका झुमका
मिला है किसीका झुमका....हे साधनावर चित्रीत झालेलं परख (दिग्दर्शक - बिमल रॉय) या चित्रपटातलं शैलेंद्र यांनी लिहिलेलं आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं जरूर ऐका आणि पहा. खूपच अप्रतिम असं गाणं आहे.
मिला है किसी का झुमका ठंडे-ठंडे हरे-हरे नीम तले
ओ सच्चे मोतीवाला झुमका ठंडे-ठंडे हरे-हरे नीम तले
सुनो क्या कहता है झुमका ठंडे-ठंडे हरे-हरे नीम तले
मिला है किसी का …
प्यार का हिंडोला यहाँ झूल गए नैना
सपने जो देखे मुझे भूल गए नैना
हाय रे बेचारा झुमका..ठंडे-ठंडे हरे-हरे …
जीवन भर का नाता परदेसिया से जोड़ा
आप गई पिया संग मुझे यहाँ छोड़ा
पड़ा है अकेला झुमका...ठंडे-ठंडे हरे-हरे …
हाय रे ये प्रीत की है रीत जाने कैसी
तन-मन हार जाने में है जीत जाने कैसी
जाने ने बेचारा झुमका.....ठंडे-ठंडे हरे-हरे …
संजय भास्कर जोशी कृपेने अमृता देशपांडेची मसाला पोस्ट वाचून तिला मी काही मसाल्यांची ऑर्डर फेसबुकावरच दिली होती आणि तिनेही ती तत्परतेनं माझ्यापर्यंत पोहोचती केली. मात्र या भेटीत तिनं मला सुरेखसे कानातले भेट दिले. (सेल्फी बघावा) आणि मन लगेचच गायला लागलं की ‘मिला है किसीका झुमका’ .........थँक्स संभा आणि थँक्स अमृता!
तर आता वळूया ऐतिहासिक भेटीकडे! मला ती गाणी आठवताहेत, म्हणजे खरं तर मीच ‘राजेश खन्ना’ होऊन त्या 'दुश्मन'मधलं गाणं राजेश खन्नाच्या अविर्भावात गात होते, 'वादा तेरा वादा, वादे पे तेरे मारा गया, बंदा मै सिधासाधा वादा तेरा वादा..........' मला मी 'हम किसिसे कम नही' मधला ‘तारीक’ही झाल्यासारखं काही काळ वाटलं आणि दर्दभरा आवाज काढत, काल्पनिक गिटार वाजवत, ‘क्या हुआ तेरा वादा’ असं गात राहिले. राजेश खन्ना, तारीक वगेरे मला व्हावं लागलं याला कारणीभूत असलेली व्यक्ती म्हणजे बुकगंगाची सर्वेसर्वा मंदार जोगळेकर! हा माणूस दर वेळी एखादा कसलेल्या सराईत वकिलासारखा मला भेटीच्या तारखावर तारखा देत होता, पण प्रत्यक्ष भेटत मात्र नव्हता....मग मी तरी काय करणार, असली गाणी गाण्याशिवाय?
अखेर त्या वरच्याला....(वरचा कोण हे ठाऊक नाही, पण अशा प्रसंगी अशी वाक्य पेरायची असतात म्हणून.........) दया आली आणि त्यानं त्या मंदारला सुबुद्धी दिली....मंदारचा चक्क फोन आला आणि अनेक दिवसांची ती ऐतिहासिक भेट अखेर आज संपन्न झाली.
या ऐतिहासिक भेटीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, सल्लामसलत झाली. दस्तावेजावर (लाल लाल रंगाच्या) मोहरा ठोकण्यात आल्या....असं जे जे काही ऐतिहासिक करता येईल ते आम्ही गंभीर चेहरे न करता केलं. म्हणजे कामाच्या बाबतीत 'फ्युचर प्लॅनिंग' केलं हो! खाण्यापिण्याच्या पदार्थांवरही ताव मारला.
आता मालिका सुरूच झाली म्हटल्यावर आजच्या ऐतिहासिक भेटीत बुकगंगाची 'गोड गौरी' हिने मला सुरेखसे कानातले (कुड्या) भेट दिले आणि त्याहीपेक्षा अतिशय बोलकं आणि मनातल्या भावना व्यक्त करणारं पत्र! मी नकार देण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता....मी आनंदात सगळं काही स्वीकारलं. या ऐतिहासिक भेटीची सांगता अशा रीतीनं खूपच चांगली झाली.
थोडक्यात, मोगँम्बो खुश हुआ!
दीपा देशमुख, पुणे ६ ऑगस्ट २०१८.
Add new comment