जीनियस प्रकाशन

जीनियस प्रकाशन

तारीख
-
स्थळ
मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स पुणे

शनिवारी सायंकाळी ६ वाजता जीनियस मालिकेतल्या १२ पुस्तकाचं प्रकाशन डॉ दत्तप्रसाद दाभोळकर आणि डॉ अनिल अवचट यांच्या हस्ते पुण्यातल्या मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स इथे झालं. आपण सगळे आलात आणि कार्यक्रमाचा आनंद वाढवलात त्यामुळे खूप खूप -----वाटलं. कॅनव्हासनं माझं इंग्रजी भाषेतलं वाचन वाढवलं, तर जीनियसनं वक्तृत्व!!! कलावंताचं मनस्वीपण कॅनव्हास लिहिताना अनुभवलं, तर जीनियसच्या वेळी वैज्ञानिकांमधला कलावंत अनुभवता आला. कार्यक्रमाच्या वेळी माझ्यासाठी असलेले अनेक सुपरहिरो समोर बघून लई भारी वाटत होतं. बाबा (अनिल अवचट), दत्तप्रसाद दाभोळकर, भानू काळे, आनंद करंदीकर, डॉ यामिनी, कल्याण तावरे, सीमा तावरे, यशोधन गोखले, प्रसाद मणेरीकर, स्नेहा अवसरीकर, आशा साठे, सुधीर महाबळ, धनु, रंजन भावसार, दुष्यंत......मुंबई,बंगलोर, ठाणे, अहमदनगर आणि परगावावरून आलेले आमचे अनेक मित्र..... सूत्रसंचालन करायला आलेली माझी मैत्रीण आसावरी,..... सुनंदा, आणि अंजली.....आणि माझी लाडकी मुलं...शास्त्री, रवी, सनत, सायली, शंकर, किरण, वैभव, मयूर, अमृता, श्रुती, मंदार, पीडी, .....उपस्थिती आणि विक्री यासाठी आपण सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप Thanks!!!!!

दीपा देशमुख 

कार्यक्रमाचे फोटो