Narayan Dharap

 ‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’

‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’

भीती, गूढता, अतार्किक जग, मनोव्यापार आदी गोष्टींचा समावेश असलेलं साहित्यातलं एक नवं दालन नारायण धारप यांनी वाचकांसाठी खुलं करून दिलं आणि त्यात वाचकांना गुंतवलं. हे अनाकलनीय वाटणारं जग दाखवताना त्यांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही आणि विज्ञानाची कास सोडली नाही. आपल्या वाचकाला प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला लावली. अशा या लोकप्रिय लेखकाबद्दल प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेलं ‘नारायण धारप - एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर’ हे नवं पुस्तक बुकगंगा पब्लिकेशन्सद्वारे लवकरच प्रसिद्ध होत आहे. पुढे वाचा