‘नारायण धारप - एका गूढ, अदभुत, चित्तथरारक जगाची सफर’
गूढ, थरारक, अतार्किक अशा वातावरणानं भारलेल्या जगात नेणारे 60 च्या दशकातले एकमेव लेखक म्हणजे नारायण धारप. नारायण धारप यांनी वाचकांना आपल्या कथा-कादंबर्या वाचण्यासाठी अक्षरश: खेचून घेतलं. त्यांच्या वाचकवर्गात कुमारवयापासून ते ज्येष्ठ वयोगटांपर्यंत सगळेच मोडतात. वयाच्या त्या त्या टप्प्यात प्रत्येक वाचकाला तो तो लेखक आवडत असतो. पण नारायण धारप एकमेव असे साहित्यिक होते, की त्यांचा वाचक एकदा त्यांच्याशी बांधला गेला की त्याची पुन्हा त्यांच्यापासून दूर होण्याची सूतराम शक्यता नव्हती आणि आजही नाही.
म्हणूनच नारायण धारप हे एक व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचा लेखन प्रवास कसा सुरू झाला, त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या, त्यांना प्रेरित करणार्या व्यक्ती कोण, त्यांच्या लेखनप्रवासाची ठळक वैशिष्टयं कोणती, त्यांच्या निवडक लिखाणाचा आढावा, त्यांचे वाचक त्यांच्याविषयी-त्यांच्या लिखाणाविषयी काय विचार करतात, त्यांची आजपर्यंतची ग्रंथसंपदा याबद्दल बुकगंगा पब्लिकेशन्स द्वारा दीपा देशमुख लिखित ‘नारायण धारप - एका गूढ, अदभुत, चित्तथरारक जगाची सफर’
Add new comment