अडलंय का?
पुणे शहराचं भूषण सांगणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी एक म्हणजे नाट्यकर्मी अतुल पेठे. सूर्य पाहिलेला माणूस, दिवाकरांच्या एकांकिका, सत्यशोधक, समाजस्वास्थ्य, शब्दांची रोजनिशी या त्यांच्या कलाकृतींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. पण कोरोनाचं संकट आलं आणि जवळजवळ दोन वर्षं सगळं जनजीवन कडीकुलुपात बंदिस्त झालं....हळूहळू वातावरण निवळत असताना अचानक ‘अडलंय का?’ हा नाट्यप्रयोग पुण्यातल्या भरत नाट्य मंदिरमध्ये प्रत्यक्ष अनुभवता येणार हे कळलं आणि खूप बरं वाटलं. अपार उत्सुकता मनात होती, ‘अडलंय का?’ नाव वाचल्यानंतर, काय असेल विषय? हे कुतूहल वाटत होतं. पुढे वाचा