गालिब
गालिब नयन या मैत्रिणीने फर्मान काढलं आणि मी तिच्याबरोबर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये भर पावसांत जाऊन पोहोचले. तोपर्यंत तिथे कुठलं नाटक आहे, कोणाचं आहे, कसं आहे याची मला काहीही माहिती नव्हती. अर्थातच आत गेल्यावर समजलं, व्यासपीठावर गालिबबद्दल काहीतरी होणार आहे. मनात आलं बहुतेक गालिबचे शेर यांचं वाचन विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे करणार असावेत. किंवा गालिबच्या आयुष्यावरचं नाटक असावं. मनातले तर्कविर्तक सुरू असतानाच पडदा वर गेला. पुढे वाचा