आरपार
आरपार
ललित प्रभाकर हा माझा अत्यंत आवडता अभिनेता असल्यामुळे त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘आरपार’ हा चित्रपट बघणं आवश्यकच होतं. तसं आजचे अनेक अभिनेते, त्यात चैतन्य सरदेशपांडे, पुष्कराज चिरपुटकर, सिद्धार्थ मेनन, गिरीश परदेसी, वैभव तत्ववादी मला आवडतात. ललितचे यापूर्वी चि. व चिसौंका, झोंबिवली, स्माईल प्लीज, आनंदी गोपाळ, हम्पी, असे काही चित्रपट मी बघितले होते. पण हा चित्रपट काही वेगळाच आहे. एक सुखद अनुभव देणारा. आजच्या तरुणाईची गोष्ट सांगणारा आहे. प्रेमात कोण काय सल्ला देत यापेक्षा मन काय कौल देत हे सांगणारा...प्रेमाचा खरा अर्थ प्रेमाचा प्रवासच सांगू शकतो याचा अनुभव देणारा. पुढे वाचा