वनात-जनात, सृष्टीत गोष्टीत!
वनात-जनात, सृष्टीत गोष्टीत!
डॉ. अनिल अवचट यानेकी बाबा लिखित ‘वनात जनात’ आणि ‘सृष्टीत गोष्टीत’ ही दोन पुस्तकं नुकतीच 'बुकगंगा'ने ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांचं वाचन अर्थातच अस्मादिक दीपा देशमुख यांनी केलं आहे. बाबाच्या आवाजातलं मनोगत आहेच. बाबाबरोबर कायमस्वरूपी नातं असलं तरी जेव्हा बाबाचं पुस्तक वाचायची संधी मिळते, तेव्हा माझ्यासाठी तो अतीव आनंदाचा क्षण असतो.
अनिल अवचट यांची पुस्तकं वाचायला अतिशय सोपी, सुटसुटीत आणि रसाळ अशी असतात. एखादा चित्रपट जसा सगळ्या कुटुंबानं मिळून एकत्रितपणे पाहावा असं म्हटलं जातं, तसंच बाबाचं कुठलंही पुस्तकं कुठल्याही वयोगटाचा माणूस आपल्या कुटुंबासमवेत वाचू शकतो. त्यानं अनुभवलेली माणसं, त्याला सलणारा सामाजिक प्रश्न, हेच त्याच्या लिखाणात दिसतं. त्यानं मुलांसाठी लिहिलेलं लिखाण मोठ्यांनाही पुन्हा लहान व्हायला भाग पाडतं आणि तो लहानांच्या लिखाणात त्या मुंगीला, त्या कासवाला जे काय बोलायला लावतो ते सगळं विलक्षणच असतं. खरं तर त्याचं मुलांसाठी उभं केलेलं जग काल्पनिक राहतच नाही. कारण आपणही नकळत त्या सुंदरशा जगाचा हिस्सा बनतो.
त्यामुळे 'जरूर वाचा' असं म्हणत नाही, तर 'जरूर जरूर ऐका 'वनात जनात', 'सृष्टीत गोष्टीत!' आणि हो तिसरं ‘सरल तरल’ हेही पुस्तक लवकरच आपल्या भेटीला येतंय. तोपर्यंत ही दोन पुस्तकं घरातल्या सगळ्या मंडळींची ऐकून व्हायला हवीत हं.
दीपा देशमुख
२७ जुलै २०१७.
Add new comment