दुःखालाही चिमटीमध्ये..
दुःखालाही चिमटीमध्ये
धरता येते
आणिक त्याचे फुलपाखरू
करता येते.......
आज दादांचा (वडलांचा) वाढदिवस! आठवण आली ....खरं तर दिवाळी असूनही ‘सिनेमे सुलगते है अरमॉं ऑखोंमे उदासी छायी है....’ या गाण्यानं मला औरंगाबादहून आल्यापासून व्याकुळ करून सोडलं होतं. कशातच मन लागत नव्हतं. सुवर्णसंध्या आणि आसावरी मला या गाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या. पण.....
आणि अचानक आसावरीनं फर्मान काढलं, 'दीपा आपल्याला पाडवा साजरा करायचाय.' आसावरी नटून थटून येणार म्हणून मीही 'सुलगते अरमान'चा दरवाजा बंद करून दिवाळी वाटावी अशी तय्यार झाले. तिला बघितलं तर ती मात्र साडीऐवजी टॉम बॉयसारख्या वेषात.....मग आम्ही वय वर्षं सहा ते दहाच्या झालो. बुढी का बाल दोघीत एक विकत घेऊन खाल्ला....कानातले विकत घेऊन कान दाखवत फोटो काढले. राजस्थानी नृत्य बघून मनातल्या मनात थिरकलो. चायनीज, मेक्सिकन पदार्थ खाल्ले. कोक प्यायलो (मी तिला दिलं नाही ...) आणि कमी म्हणून की काय टेंडर कोकोनट नॅचरलचं आईस्क्रीमही दोघींनी खाल्लं.
नाठाळ मनाला आनंदाच्या दारी आणून सोडल्याबद्दल आसावरी थँक यू ग! आणि थँक यू राधा भावे !
दीपा देशमुख,
२० ऑक्टोबर २०१७.
Add new comment