मैत्री - अनंत भावे
तारीख
              अनंत भावे यांची ही कविता. आजच्या मैत्रीदिनानिमित्त.  सुमारे ४० वर्षांपूर्वी बालदर्शिका या मुलांसाठीच्या कॅलेंडरमध्ये ती प्रसिद्ध झाली होती. 
मैत्री म्हणजे 
भर दुपारी तुमच्या वाटेवर पडणारे निळे चांदणे !
मैत्री म्हणजे 
तुमच्या गद्य जगण्यातले गहिरे गाणे !
मैत्री म्हणजे 
तुम्ही अधिक अधिक होणे !
मैत्री म्हणजे 
तुमचे साखरझोपेतले हसणे!
मैत्री म्हणजे 
तुमचे काटे झाकणारे मखमली फूल!
मैत्री म्हणजे 
तुमच्या शहाणपणाला लागलेले सुंदर खूळ !
        
Add new comment