मंगेश पाडगावकर
आज रात्री औंध इथे मैत्रिणीकडे- उज्वला आचरेकर हिच्याकडे- मंगेश पाडगावकर यांचा कार्यक्रम होता, कार्यक्रम
खूप अप्रतिम झाला
त्यांनी लहानपणच्या काही आठवणी सांगितल्या
वयाच्या चौदा वर्षाचे असताना त्यांनी बा भ बोरकर यांची एक कविता ऐकली आणि मग दिवसरात्र
तीच मनात घोळू लागली
तव चिंतनी मन गुंगुनी
मी हिंडतो रानीवनी
सतत या ओळी मनात येत असताना समोरून त्यांच्याच वयाची एक मुलगी समोर आली, तिला पाहिलं
आणि पाडगावकरांना त्यांची पहिली कविता सुचली
तुज पाहिले तुज वाहिले
नव पुष्प हे हृदयातले.....
घरी परतायला ११.३० वाजले
पाऊस भुरभुरत येत होता
आणि मनात त्यांची सगळी गाणी दरवळत होती
शुक्रतारा ....
दिवस तुझे फुलायचे ...
डोळ्यामधले आसू .....
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ....
तोपर्यंत घर आलेलं .....
Add new comment