ऑडीओ बुक रेकॉर्डिंग
गेले दोन दिवस 'बुकगंगा इंटरनॅशनल' इथं त्यांच्या छोटेखानी पण सुसज्ज अशा studio मध्ये आमच्या 'भारतीय जीनियस'च्या तिन्ही संचाचं ऑडीओ बुक करण्यासाठी रेकॉर्डिंग सुरु आहे. धमाल .....कॉलेजमध्ये असताना औरंगाबाद-परभणी आकाशवाणी केंद्र इथं निवेदक म्हणून, नाट्य कलावंत म्हणून तर कधी स्क्रिप्ट रायटर म्हणून मी काम केलेले दिवस आठवले. आज जीनियसचं पहिलं पुस्तक पूर्ण झालं. पुढल्या ४ दिवसांत राहिलेले दोन्ही संच पूर्ण करणार आहे.
बुकगंगाचे मंदार जोगळेकर, गौरी आणि पराग यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येतेय येत्या दोन महिन्यात जीनियस - पहिल्या १२ पुस्तिका, सुपरहिरो मधली ५ पुस्तकं, कॅनव्हास आणि मनात ही पुस्तकं रेकॉर्डिंग होऊन पूर्णत्वाकडे जातील असं नियोजन आहे.
या पुस्तकांमुळे प्रवासात किंवा कुठेही वेळ मिळेल तशी ही पुस्तकं वाचता येणार आहेत. विशेषतः 'आमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकताहेत त्यांना मराठी वाचता येत नाही' अशी अडचण असणाऱ्या पालकांचा प्रश्न आता या audio book च्या माध्यमातून बुक गंगा यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
Add new comment