बोकोबा आणि अपूर्व
काल अपूर्व त्याच्या मित्राला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला असताना तिथल्या कॅन्टीनमध्ये काही वेळ बोलण्यासाठी तो गेला. मांजर हा स्वतःवर अतोनात प्रेम करणारा स्वार्थी प्राणी! तरी मांजरं आम्हाला आवडतात आणि मांजरांनाही आम्ही आवडत असू! तिथे फिरणाऱ्या एका मुजोर मांजराकडे अपूर्वचं लक्ष गेलं. त्याने सहज त्याला 'पिस, पिस' केलं तर ते बोकोबा संधीची वाटच पाहत असावेत असे टुणकन उडी मारून अपूर्वच्या मांडीवर जाऊन बसले. अपूर्वकडे एकटक बघत त्यानं आपले लाड करावेत, गळ्यावरून, कपाळावरून हात फिरवावा ही अपेक्षा सुरु ठेवली..
मांजरी बऱ्यापैकी नीटनेटक्या आणि स्वच्छताप्रिय असतात, पण बोके कमालीचे आळशी, मस्तवाल आणि बहुतांश वेळा धुळीत लोळून आलेले....त्यामुळे अपूर्वला त्याला हात लावावा वाटेना. जरा वेळ ध्यानस्थ बसल्यावर नंतर बोकोबांनी आपली नखं बाहेर काढून अपूर्वच्या जिन्समध्ये घुसवून नखाला धार करणे कार्यक्रम सुरू केला... तो कार्यक्रम झाल्यावर बोकोबा चक्क मांडीवर झोपी गेले!!!! अनोळखी बोक्याची आहे न गम्मत!
Add new comment