आद्या !
तारीख
              आद्या !
ज्या वेळी मनाला मरगळ येते,
उदासीचं धुकं चौफेर संचार करतं
अशा वेळी अचानक कोवळ्या किरणांचा
हळुवार प्रवेश होतो
ती किरणं मला ‘आज्जी’ पुरस्काराने 
सन्मानित करतात.. 
आजी होण्यापूर्वी कधी वाटलंच नाही,
हे नातं इतकं इतकं सुंदर असेल, 
जगातलं सर्वोत्तम नातं असेल...
ही  नातवंड त्यांच्या स्पर्शातून मला 
अवर्णनीय असा आनंद देताहेत ...
खरंच कायम आजी असायला हवं...
आझाद, रिधान-रिध्दी, रुहा, ओनी आणि 
आज माझ्या कोमेजलेल्या मनाला 
ताजंतवानं करण्यासाठी आलेली आद्या
माझं गोडंबीचं झाड...
खूप खूप थँक्यू प्रतिमा-ऋषिकेश
अचानक येऊन वातावरण
प्रफुल्लित केल्याबद्दल!
दीपाआजी
        
Add new comment