#मैत्रिण पसंत आहे...

#मैत्रिण पसंत आहे...

#मैत्रिण पसंत आहे...
मी आणि शरद मुलगी पाहायला गेलो . मुलगी पोहे घेऊन आली. नाजूक, सुंदर,  ठेंगणी , ठुसकी मुलगी समोर आली आणि बसली.
मी: नाव? 
ती: दीपा
मी: शिक्षण?
ती: M.Com., नेचरोपॅथी मध्ये डॉक्टर.
( शरद चा लूक असा की  त्याला काही देणं घेणं नाही.)
मी: स्वयंपाक येतो?
ती: सगळं येतं पण कंटाळा. 
( हडकोत यायची तेंव्हा करायची स्वयंपाक आणि सगळं आवरून पण ठेवायची)
मी: शिवणकाम येतं?
( शरद आता कपाळावर हात मारून शांत)
ती: हो. काही दिवस मी शिवणाचा व्यवसाय करत होते.
शरद: चला निघुयात. छान.
मी: थांब. गाणं येतं?
ती: हो. मी संगीत विशारद आहे.
मी: छान. नाटकात काम?
ती: हो. मी हैया हमला बोल, लक्षी ची फिर्याद, बिरोबाची वाडी इत्यादी नाटकात कामे केली आणि बक्षिसे सुद्दा मिळवलीत.  तसेच मी अभिवाचनाचे पण कार्यक्रम करते, त्या शिवाय मी मुलाखती पण घेते. ते पण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या.
शरद: चला. आवडली तू आम्हाला. येतो.
( तो उठतो. मी त्याच्या हाताला धरून बसवतो. तो नाईलाजाने खाली बसतो)
मी: लिखाण? 
ती: हो. तुमचे आमचे सुपरहिरो’, कॅनव्‍हास, जीनियस ,सिंफनी’, ‘पाथफाइंडर्स’, ‘नारायण धारप’, जग बदलणारे ‘ग्रंथ’  ईत्यादी पुस्तकं प्रकाशित झाले आहेत.
( शरद ने डोळ्या वरील चष्मा डोक्यावर लावला. डोळे बंद केले, आसन स्थिती घेऊन सोफ्यावर बसला. आता तुला काय विचारायचं ते विचार असला अविर्भाव .)
मी : सामाजिक काही काम?
दीपा: हो मी अनेक सामाजिक चळवळीत सहभागी झाले होते. मासवन येथे काही काळ राहिले आहे.
(शरद ध्यानमग्न)
मी:  दीपा, वाचायला, लिहायला, नाटकात काम करायला, गाणं म्हणायला, लोकांना गिफ्ट द्यायला, खाऊ घालायला आवडतं, सिनेमा, नाटक पाहायला त्यावर चर्चा करायला आवडतं, पर्यटन आवडतं हे सगळं ठीक पण पोहायला येतं का?
( माझ्या ह्या प्रश्नावर शरदची समाधी भंग)
ती: ( शांतपणे) नाही. शिकते. येईल पंधरा दिवसात.
मी: ( जोरात ओरडत) आम्हाला दीपा पसंत आहे मैत्रीण म्हणून.
( तिघेही आम्ही खुश. एकमेकांना टाळी देत जेवायला बाहेर पडलो)
हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे दीपा ने एक पुस्तक लिहिलं " डायरेक्टर्स " . त्याचा प्रकाशन समारंभ दिनांक 16 मे ला पुण्यात होत आहे
गेल्या 35- 40 वर्षांची आमची निखळ, निर्मळ मैत्री अबाधित आहे. तिचा प्रवास मी अगदी जवळून पहिला आहे. अनेक चढउतार तिच्या आयुष्यात आले पण न डगमगता ती त्याला सामोरी गेली. आज ती मोठी लेखिका आहे पण आमच्या साठी ती आमची जवळीची खास मैत्रीण आहे. तिच्या नवीन पुस्तकासाठी शुभेच्छा.
धनंजय सरदेशपांडे.💐💐

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.