खून, हत्त्या, कत्ल, मर्डर.....इत्यादी दिवाळी 2019
‘खून’ या शब्दाची उत्पत्ती फारसी भाषेतून झाली. याचा अर्थ रक्त, रुधिर, कत्ल आणि हत्या असा होतो. खून म्हणजे एक जीव जगातून नष्ट करणे. असं करण्याची भावना मनात कशी जन्म घेत असावी? जन्म-मृत्यूच्या खेळात कधी स्वतःच्या आयुष्याचा वीट आल्यानं, नाईलाज झाल्यानं, दुर्धर प्रसंग कोसळ्यानं, आर्थिक हतबलता आल्यानं, वैफल्य आल्यानं काही लोक स्वतःहून मृत्यूला कवटाळतात आणि आपलं आयुष्य संपवतात. सानेगुरूजींपासून ते गुरूदत्तपर्यंत आणि व्हॅन गॉघपासून ते हेमिंग्वेपर्यंत, हिटलर पासून फ्रॉईडपर्यंत, या सगळ्यांनी मृत्यूला आपलंसं केलं आणि आपलं जीवन संपवलं. पुढे वाचा