Articles

खिलते है गुल यहॉं....

खिलते है गुल यहॉं....

किशोरकुमार हिन्दी चित्रपटसृष्टीतला एक यशस्वी पार्श्‍वगायक, कवी, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, पटकथालेखक अशा सगळ्याच क्षेत्रात त्यानं ठसा उमटवणारी मुशाफिरी केली. हिन्दीशिवाय अनेक प्रादेशिक भाषांमधून किशोर गायला. किशोरकुमारचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ साली मध्यप्रदेशमधल्या खांडवा या ठिकाणी एका बंगाली कुटुंबात झाला. त्याचं खरं नाव आभासकुमार गांगुली! फिल्म अभिनेता अशोककुमार, सतीदेवी, अनुपकुमार ही किशोरकुमारची भावंडं होती. अशोककुमारमुळेच किशोरकुमारला चित्रपटसृष्टीचं आकर्षण निर्माण झालं. पण तो त्यात करियर करण्याबाबत तितकासा गंभीरही नव्हता. पुढे वाचा

तुमको न भूल पायेंगे....... राजकपूर 

तुमको न भूल पायेंगे....... राजकपूर - पुरूष उवाच दिवाळी 2020

रणबीरराज कपूर हा ‘द ग्रेटेस्ट शोमन ऑफ इंडियन सिनेमा’ म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत गाजला. तो एक कसदार अभिनेता, यशस्वी निर्माता, कुशल दिग्दर्शक आणि संगीताची उत्तम जाण असणारा दर्दी रसिक होता. 1971 साली भारत सरकारद्वारा पद्मभूषण पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आलं. तसंच 1987 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात आलं. ‘बरसात’, ‘आवारा’, ‘आह’, ‘अनाडी’, ‘श्री. 420’, ‘जागते रहो’, ‘जिस देशमे गंगा बहती है’, ‘संगम’,‘मेरा नाम जोकर’ यातल्या काही चित्रपटांना फिल्म फेअर पुरस्कारानं गौरवलं गेलं, तर काही चित्रपटांच्या कलात्मकतेची समीक्षकांनीही भरभरून वाखाणणी केली. पुढे वाचा

Bertrand Arthur William Russell)

बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell) (18 May 1872 - 2 February 1970) - छंद दिवाळी 2018

एका गावात जे लोक स्वतःची दाढी करत नाहीत, त्यांची दाढी त्या गावातला एकमेव असलेला न्हावी करतो. आता याच गोष्टीकडे त्या गावाचा नियम म्हणून बघितलं तर मग तो न्हावी स्वतःची दाढी करतो की नाही? समजा, न्हावी स्वतःची दाढी करत नाही असं गृहीत धरलं तर वरच्या नियमाप्रमाणे तो स्वतःची दाढी करतो असं सिद्ध होतं. किंवा याउलट तो स्वतःची दाढी करतो असं गृहीत धरलं तर तो न्हावी त्याची स्वतःची दाढी करत नाही असं सिद्ध होतं. थोडक्यात आपण कुठल्याही गृहितकापासून सुरुवात केली तरी निष्कर्ष हे त्याच्या विरुद्धच जातात. या पॅरॉडॉक्स सोडवणं म्हणजे डोक्याला मस्त ताण देणारी गोष्ट आहे. पुढे वाचा

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

लॅरी पेज, सर्गी ब्रिन आणि गूगल सर्च इंजिन - वयम दिवाळी 2019

आपल्या मनात एखादी गोष्ट यावी आणि क्षणार्धात ती समोर येऊन हजर व्हावी....तसंच! आजच्या युगात माणसाला गूगल ही आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेली अनमोल अशी भेट आहे. गूगल नसेल तर आज जगण्याची कल्पनाही करता येत नाही. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसावं आणि कुठलीही इच्छा व्यक्त करावी की काही क्षणात इच्छापूर्ती होते म्हणतात, तसंच गूगलवरही काही सेकंदात घडतं. कुठल्याही अनोळखी शहरात गेल्यावर तिथे ठरलेल्या पत्त्यावर जाताना मोबाईलमध्ये गूगलमॅपला जाण्याचं ठिकाण सांगितलं की गूगल मॅप अगदी त्या माणसाच्या घराची बेल वाजवण्यापर्यंत आपल्याला न चूकता घेऊन जातो. पुढे वाचा