सावरकर प्रतिष्ठानच्या व्याख्यानमाला सांगली

सावरकर प्रतिष्ठानच्या व्याख्यानमाला सांगली

तारीख
-
स्थळ
सांगली

26, 27 आणि 28 फेब्रुवारी २०१६ मध्ये सांगलीत होणाऱ्या सावरकर प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेच आमंत्रण सुबोध कुलकर्णी यांच्या आग्रहामुळे एक दीड महिन्यांपूर्वी स्वीकारलं होतं. त्यामुळे काल तब्येत बरी नसतानाही आयोजकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी लवकर निघून रात्री २ वाजता पुन्हा पुण्यात परतले.

सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजावा या हेतूने गेली १८ वर्षं ३ दिवस साजरी होणारी ही व्याख्यानमाला सुरु आहे. त्यानिमित अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शनाचं देखील आयोजन केलं होतं. सौरऊर्जा या विषयाला घेऊन मुलांनी आपले प्रयोग मांडले होते. कार्यक्रम खूपच छान झाला. विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन देखील एक कळ दाबताच समोरची रिबन उलगडली गेली. तसंच दीप प्रज्वलन करताना विजेचं बटन दाबताच समईतले विजेचे दिवे लुकलुकले. काल जागतिक मराठी दिन आणि आजचा विज्ञान दिन या दोन्ही दिवसाचं महत्व मनात तर होतंच, पण सांगलीतल्या त्या उत्साही वातावरणातही जाणवत होतं.

या कार्यक्रमात अध्यक्ष सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी होते. काल भारत-पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना असूनही विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रवी जाधव हा माझा आयटी क्षेत्रात इंजिनियर असलेला गोड मुलगाही बरोबर होता. रात्री १२-१२.३० वाजता हायवे वर गाडी puncture झाल्यावर driver ला त्याने खूपच मदत केली.

कार्यक्रमाचे फोटो