गुजगोष्टी
दीपा देशमुख ह्या एक प्रथितयश लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्वांनाच परिचित आहेत. `गुजगोष्टी` ह्या कथासंग्रहातल्या 12 कथांमधूनही त्यांच्यातल्या सामाजिक जाणिवांचा सूर वाचकाला गवसतो. स्त्री जीवनाचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यावरून जाताना ह्या कथांमधून बघायला मिळतो. स्त्रीचं भावविश्व, तिच्या मनातली आंदोलनं, तिची घुसमट, तिचा लढा तिची स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चाललेली धडपड, तिचं सौंदर्य टिपणारं संवेदनशील मन ह्या कथांमधून बघायला मिळतं. ह्या कथा हलकं फुलकं वळण घेत अचानकपणे वाचकाला गंभीर कधी करतात ते कळतही नाही, इतका वाचक त्यात गुंतून जातो आणि अंतर्मुख होतो. दीपा देशमुख यांचं लेखन अत्यंत रसाळ, ओघवतं आणि रंजक असतंच. आणि सोबताच वाचकाला ते विचार करायलाही भाग पाडतं. थोडक्यात सांगायचं तर, ह्या `गुजगोष्टी` लेखिकेच्या अंतर्मनातून निघून वाचकाच्या अंत:करणात जाऊन पोहचतात हेच खरं!
Add new comment