दोन शून्याची बेरीज
आज सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे माझ्या मित्राची धनंजय सरदेशपांडे याची प्रमुख भूमिका असलेलं दोन शून्याची बेरीज हे दोन अंकी नाटक बघायला गेले. कॉलेजपासून बरोबर असलेला माझा हा मित्र खूप कष्टाळू आणि स्वभावाने एकदम साधा सरळ ....नाटकाची आवड असणारा ...आम्ही बरोबर देखील काही नाटकं केली...अभिनय हा माझा भूतकाळ झाला पण तो मात्र बालनाट्य आणि लेखन कार्यशाळा आणि इतर अनेक गोष्टी सातत्त्याने करत राहिला.
त्याने काही मराठी चित्रपटातूनही लहानमोठ्या भूमिका केल्या. पण आजचं नाटक आणि त्याची लेखकाची त्यातली भूमिका खूपच जबरदस्त होती
संहिता विनिता पिंपळखरे यांची.....कथानक आणि संवाद खूपच प्रभावी होते.
पतीपत्नी मधले नातेसंबंध ....आर्थिक बाजूचं आयुष्यातलं स्थान ...सभोवतालची प्रलोभन ...
दुटप्पीपणा ...स्वार्थ .....व्यक्तीकेद्री असणं....प्रतिमेच्या प्रेमात असणं....दत्तक मुलाचे प्रश्न ...
अशा अनेक प्रश्नांना खूप चांगल्या पद्धतीने सादर केलं गेलं.
विशेषतः खर्या आयुष्यातला लेखक त्याची बायको त्या दोघांची मैत्रीण आणि त्यांचा दत्तक मुलगा एवढीच पात्र या नाटकात आहेत ...पण गम्मत ही की खर्या पात्रांबरोबरच लेखक लिहितो ती खोटी पात्रही प्रेक्षकांना घेऊन प्रवास करत राहतात....खूपच उत्कृष्ट सादरीकरण आणि खरी चार पात्र आणि खोटी चार पात्र अशा एकूण आठ पात्रांचा अभिनय खूपच सशक्त होता.
राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या या दोन अंकी नाटकास नक्कीच पारितोषिक मिळेल.
पण त्याआधीच सर्वांचं मनापासून अभिनंदन!!!! खूप दिवसांनी इतकं चांगलं नाटक बघायला मिळालं.
धनंजय खूप खूप शुभेच्छा!!!!
Add new comment