मसान

मसान

मसान या चित्रपटात दुष्यंत कुमारची अप्रतिम गजल  आहे. बस्स, आत्ताच अनुराग कश्यपचा हा चित्रपट बघितला. यात विकी कौशल, रिचा चड्ढा, श्वेता त्रिपाठी, संजय मिश्रा यांनी अतिशय ताकदीचा सहज सुंदर अभिनय केला आहे. 
वाराणसी शहरात एकाच वेळी घडणाऱ्या दोन गोष्टी यात दाखवल्या आहेत. पहिल्या कथानकात देवी आपल्या मित्राबरोबर एका हॉटेल मध्ये जाते आणि त्या दोघांना एकांतात पोलीस पकडतात आणि असं टोर्चार करतात की देवीचा मित्र तिथेच आत्महत्या करतो आणि पोलीस देवीच्या वडिलांना blackmail करून पैसे उकळतात. यात masaan म्हणजे जिथे प्रेतावर अंतिम संस्कार किंवा क्रियाकर्म केले जातात तो स्मशानाचा घाट! एकीकडे रोज जळणाऱ्या चिता आणि त्याच वेळी जिवंत असणाऱ्यांची मृत व्यक्तीपेक्षाही होणारी फरफट, घुसमट....या घुसमटीतून देवी कशी बाहेर पडते, तिचे आणि वडिलांचे संबंध....नात्यातले तणाव आणि प्रेम, मुलीच्या इज्जतीसाठी पोलिसांना पैसे देणारा असहाय पिता संजय मिश्राने अप्रतिम रंगवला आहे. दम लगाके हैशा नंतर तर मी त्याची जबरदस्त fan झालेय.
दुसरं कथानक या चित्रपटातला ताण हलका करायचं काम करतं. त्याच घाटावर प्रेतं जाळण्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातला दीपक हा तरुण इंजिनियरिंग करतोय. पण त्याचं खालच्या जातीतल असणं त्याला सतत जाळत राहत. त्याच्या आयुष्यात हळुवार झुळुक यावी तशी शालू नावाची एक गोड तरुणी प्रवेश करते. स्वप्नाळू.....सुंदर....खंबीर...ठाम....कविता, बशीर बद्र निदा  फाजली  आणि  दुष्यंत कुमार यांची शेरोशायरी आवडणारी.....दीपकची जात कळल्यावरही त्याला साथ देण्याचं वचन देणारी....खरंच हा सिनेमा नसून एक सुंदर चित्रच आहे!!! दोघांचं प्रेम बहरण्याआधीच अचानक सगळ उद्ध्वस्त होतं.....दीपक कोलमडून पडतो....त्याचा आकांत आपणही सहन करू शकत नाही. 
चित्रपटाचा शेवट गोड , नेहमीच्या पठडीतला केला असला तरी तोच शेवट हवासा वाटतो. या चित्रपटातलं एक एक दृश्य टिपण्यासारख आहे. दुष्यंत कुमारच्या गझलेतल्या ओळी तर....वा, क्या कहने!!!! 
जरूर बघा. थांबण्यापूर्वी दुष्यंत कुमारची अप्रतिम गजल  ऐकाच!!!
मैं जिसे ओढ़ता-बिछाता हूँ
वो ग़ज़ल आपको सुनाता हूँ
एक जंगल है तेरी आँखों में
मैं जहाँ राह भूल जाता हूँ
तू किसी रेल-सी गुज़रती है
मैं किसी पुल-सा थरथराता हूँ
हर तरफ़ ऐतराज़ होता है
मैं अगर रौशनी में आता हूँ
एक बाज़ू उखड़ गया जबसे
और ज़्यादा वज़न उठाता हूँ
मैं तुझे भूलने की कोशिश में
आज कितने क़रीब पाता हूँ
कौन ये फ़ासला निभाएगा

दीपा देशमुख 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.